ऐसे नव्हे की भारती या बुद्ध नुसता जन्मला, नुसताच नाही बुद्ध येथे आहे शिवाजी जन्मला विरतेची भारती या ना कमी झाली कधी, आमचा इतिहास नुसता इतिहास ना झाला कधी तीच आहे हौस आम्हा व्हावया समरी शहीद, बाजी प्रभूही आज आहे आज तो अब्दुल हमीद बोलला इतुकेच अंती आगे बढो आगे बढो, देउन गेला मंत्र जसा आगे बढो आगे बढो धर्माहुनी श्रेष्ठ आपल्या देशास जो या समजला, मानु आम्ही त्यालाच आहे धर्म काही समजला जन्मला जो जो इथे तो वीर आहे जन्मला, अध्यात्म ही या भारताच्या युद्धात आहे जन्मला कुठला अरे हा पाक याचे नावही नव्हते कुठे, कळणारही नाही म्हणावे होता कुठे गेला कुठे हे म्हणे लढणार यांच्या दाढ्या मिश्या नुसत्या बघा, पाहिली नसतील जर का बुजगावणी यांना बघा पाहण्याला सैन्य त्यांचे जेव्हा आम्ही गेलो तिथे, नव्हते कोणीच होते फ़क्त पैजामे तिथे आहे ध्वजा नक्कीच आमुची पिंडीवरी लहरायची, फ़क्त आहे देर त्यांनी समरी पुन्हा उतरायची हाच आहे ध्यास आता अन्य ना बोलू आम्ही, बोलु आम्ही जयहिंद आणि जयजवान बोलू आम्ही : भाऊसाहेब पाटणकर