Skip to main content

Posts

Showing posts from April, 2015

केवळ

या रस्त्याला फांदीवरती लागुनिया धस चिरून पडले नाव तुझे या वाटेवर कुण्या नदीने नेले वस्त्रापरी ओढुनी गाव तुझे या मुलुखातील पंचभूतानी ओरबडोनी सर्व तोडले मखर तुझे केवळ माझ्या नभांत स्त्रीपण अंबरात ज्वालेपरी उरले प्रखर तुझे : केवळ : वादळवेल : कुसुमाग्रज

अशा क्षणाला

अखेर माझे जीवन म्हणजे माझे कळणे तिमिरहि माझा दिवाहि माझा माझे जळणे परंतु केव्हा अशा क्षणाला लाख गवाक्षे भवती खुलली उचलुनी घेती रस्त्यावरूनी प्रकाश काही काही माती आणि पुन्हा विवरात चालते जुनेच जळणे परंतु त्या ज्वलनात उमलते नवीन कळणे : अशा क्षणाला : वादळवेल : कुसुमाग्रज

जगायास तेव्हा खरा अर्थ होता

जगायास तेव्हा खरा अर्थ होता , निरर्थासही अर्थ भेटायचे , जगायास तेव्हा खरा अर्थ होता , निरर्थासही अर्थ भेटायचे मनासारखा अर्थ लागायचा , अन मनासारखे शब्दही यायचे ... नदीसागराचे किनारे कधीही मुक्याने कितीवेळ बोलायचे , नदीसागराचे किनारे कधीही मुक्याने कितीवेळ बोलायचे , निघुनी घरी शेवटी जात असता , वळूनी कितीदा तरी पाह्यचे .... उदासी जराशी गुलाबीच होती , गुलाबातही दुखः दाटायचे उदासी जराशी गुलाबीच होती , गुलाबातही दुखः दाटायचे जरा एक तारा कुठेही निखळता , नभाला किती खिन्न वाटायचे .... असेही दिवस कि उन्हाच्या झळांनी जुने पावसाळे नवे व्हायचे असेही दिवस कि उन्हाच्या झळांनी जुने पावसाळे नवे व्हायचे ऋतूंना ऋतूंनी जरा भागले कि नव्याने जुने झाड उगवायचे ऋतूंना ऋतूंनी जरा भागले कि नव्याने जुने झाड उगवायचे मनाचा किती खोल काळोख होता , किती काजवे त्यात चमकायचे मनाचा किती खोल काळोख होता , किती काजवे त्यात चमकायचे मनाभोवती चंद्र नव्हता तरीही मनाला किती

मी तुला विसरत चाललोय एवढ मात्र खर........

हिच्या मिठीत तुझी ऊब शोधण नाही बरं , मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं हिचा हात घट्ट हातात ठेवला जरा धरून , तुझ्या माझ्या सारया जागा पाहिल्या पुन्हा फिरून , विसर विसर विसरताना पाहिलं तुला स्मरून तू होतीस , नव्हतीस , पण हिचं हसणं होतं , सोबत माझ्या हिचं असणं तुझं नसणं होत , खर सांगू ? हिच्या डोळ्यात माझंच फसणं होतं , हिच्याच सोबत बांधीन म्हणतो मनामधली घरं , मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं . असे तसे कसेतरी जगतात काहीजण तसं हिला जरा जरा कळत माझं मन , संध्याकाळी गप्प होतो हे हि हिला कळलं , तुझी बाजू घेऊन हिने खूप मला छळल खरच मला ठाऊक नाही हिचं जुनं काही , कुणास ठाऊक का मी विचारला हि नाही आई म्हणते सोडून द्याव सगळ भलं बुरं , मी तुला विसरत चाललोय एवढ मात्र खर तुझ्यासारखा आता मी कारण नसता हसतो कुणास ठाऊक तेव्हा मी हिला कसा दिसतो , तुझी आठवण येते आहे हिला आधी कळत , माझ्या आधी डोळ्यांमधून हिच्या पाणी गळत ,

समुद्र

माझ्यासोबत समुद्राच्या खाऱ्या खाऱ्या बाता येतील मला शोधत जाल तर अनेक वळणवाटा येतील मी जसा आहे तसा प्लीज नका पाहू मला माझा फोटोच काढाल तर त्यांत फक्त लाटांच येतील अश्रूंमध्ये मिसळलेल्या पाण्याच्या या गाण्याचं वयासोबत आणखी आणखी खारट खारट होण्याचं आभाळाला प्रश्न पडतो रोज वरून बघताना वय काय असेल बरं समुद्राच्या पाण्याचं ? माझ्यासोबत समुद्राच्या खाऱ्या खाऱ्या बाता येतील कधी गॉसिप्स , कधी गप्पां कधी तुम्हाला गातां येतील माझ्यामध्ये भिजायचं तर किनाऱ्यावर उभे रहा जेव्हां भरती येईल तेव्हां लाटाच उठून स्वतः येतील

उंबरा

उतरून आली रात्र दिवा ठेवी उंबऱ्याशी जरतारी पायघडी येणाऱ्याच्या   पावलांशी येतो मिश्कीलसा वारा टाकी मालवून ज्योत चांदण्याचे पाय ज्याचे त्याला कायसा हा झोत ? दवे न्हाणीला उंबरा वर रेखिली रांगोळी कुंकू - हळदीची तशी बोटे लाविली कोवळी आला मिश्किल किरण वर शिंपतो गुलाल जडभारी जाते पाय पंख रंगीत होतील : उंबरा : चित्कळा : इंदिरा संत

असे शब्द असे अर्थ

असे शब्द , असे अर्थ …. मेघ उदार वाहती , माझ्या धूळ - पाचोळ्याला कस्तुरीचे दान देती . अशा शब्दांचे चंदन कशी भाळावरी लावू ? चकमकीचे मी फुल कशी चांदणीशी   होऊ ? असे शब्द असे अर्थ … निळे आकाश मंथर , माझ्या दीपकळीसाठी व्हावें शेल्याचे पाखर . : असे शब्द असे अर्थ : चित्कळा : इंदिरा संत

वेणी

कसा वेचला काळोख ज्यांत अमृताच्या कळा देह माझा झळा … झळा           वारियाचा . --- आणि ठिबकते जेव्हा चंद्र सारंगाचे पाणी रक्त सुगंधाची वेणी           सुकलेली . : वेणी : सांजभयाच्या साजणी : ग्रेस

अभिषेक

एक पाऊल घेवून जावे त्याचा स्पर्श मातीला क्षितिजाला गुंगी … तरीही अगम्य जरासे माझे मन या पूजेत सजून बसलेले दगडांवर शेवाळ : निसरडी घसरण जपून ने ना या मेण्यात सुखावर फोड आणणारे काहीतरी … अभिषेक … चंद्रमांडातील कलत्या पाण्याचा तुझ्यातून दूर …. तुझ्यातून . : अभिषेक : सांजभयाच्या साजणी : ग्रेस

लक्ष लक्ष

लक्ष लक्ष तू अन लक्ष लक्ष वेळ … मी एक अनंताचा चुकला लक्ष लक्ष वेळ तुला रिकामीच पाठवावे ; लक्ष लक्ष वेळ तुला साठवावे आठवावे मिठी पडताच तुझी तुझ्याहून दूर व्हावे कुण्या बाहुलीचे दुःख तुझ्या डोळ्यात रचावे पहाटेच्या कळ्यापाशी थोडे मागावे इमान तुला सांगावे तुलाही माझ्या मनाचे प्रमाण लक्ष लक्ष तू अन लक्ष लक्ष वेळ … मी एक अनंताचे चुकले   पाऊल  : लक्ष लक्ष : जोगवा : आरती प्रभू

ढग लागून जिव्हारी

आली सर गेली सर रिकामीच राही चोच गढूळंच कुठे जरा आडोशाला डबकेच श्रांत झाला नाही संथ , ऋण नाहीच फिटले माळावर जरा कुठे त्रुण नाहीच वाकले दाटलेली अजूनही काळी गळ्यात ओकारी कुणावर फिदा झाला ढग लागून जिव्हारी ? : ढग लागून जिव्हारी : जोगवा : आरती प्रभू

डाग पदे चंद्रा

मालवली देखता देखतां डोळ्यापास मिठी धुंदपणे … चाळवली मिटता मिटता हर्षगर्व दिठी मंदपणे … आर्जवाचे तुटले अंतर मनामनांतून संथपणे … मोकळ्याने फुलू झुलु झाल्या रक्तजास्वंदीच्या                              कळ्या ऊन ऊन नग्नपणे … डवरली भोळी भोगतंद्रा … अमृताचां डाग पडे चंद्रा … परी म्यां पाहिले , जहाले दुथडे चुंबनउष्ट्या पापण्यात मिठ्पानी . मालवली देखता देखतां डोळ्यापास मिठी खिन्नपणे … : डाग पदे चंद्रा : जोगवा : आरती प्रभू

फेडुन घळली

सखी पारखी होता होता उसने देई मज परकेपण ; जपता जपता इथे मोगरा फेडुन घळली जुई गंधऋण शिंपण झाली होती जेव्हा सुस्त सुखाची अघळपघळशी दुखली होती खोल बाहुली काजळ रेखांतून जिवाशी माझ्यापाशी नव्हते काही दुरून जगणे होते केवळ आरशातले महाल सारे उल्लंघून मज आली भोवळ सखी पारखी होता होता घेत हिरावून अथांग मीपण फक्त किनारा पायांखाली दिसते थोडे क्षितीज - लांबून : फेडुन घळली : जोगवा : आरती प्रभू
disawar satta king