Skip to main content

Posts

Showing posts from May, 2014

किती उबावे उबावे

किती उबावे उबावे  फिक्या लाल उबेपाशी ; कधी उसळेल गंगा  माझ्या मनाच्या काठाशी ; किती खेळावे खेळावे  क्षणक्षुद्र  ठिणग्यांशी : कधी ढळेल प्राजक्त  गंगेवरील वाऱ्याशी ; अणुअणुतून कधी  तेज देईल स्पंदन : स्वच्छ सोनेरी उन्हाने  कधी झळालेंल  मन ; केव्हा कधी संपणार  माझ्या मनातली रात: किती काळ शेकोटीशी  असे बसावे तिष्टत ….  : किती उबावे उबावे  : रंगबावरी  : इंदिरा संत