Skip to main content

Posts

Showing posts from November, 2010

आभाळ चांदण्यांचे

अंगणातील पारिजातावर छानसे घरटे चिमण्यांचे त्या घरट्या खाली सांडते रोज आभाळ चांदण्यांचे वेचून त्या चांदण्या फुले माळ केसात लांब तुझ्या चांदणे पसरेल निशेवर भिनेल रुधीरात गंध माझ्या सांज रूप घेउन यावस मग विझतील रवीकिरणे म्लान सांजेच्या उंबरठ्यावर निशा घेत असेल चांदण्यांचे स्नान असेल हात तुझा हातात सर्वदूर चांदण्यांचे आभाळ होइल चांदणेही रुपेरी पाहून रंग तुझा गव्हाळ मग क्षण येइल तो हळूवार सोडवून घेशील हात मग कित्येक रात्री जागवणारी हासत निरोप घेइल रात. . .

आई

'आई' म्हणोनी कोणी,  आईस हाक मारी  ती हाक येई कानी, मज होय शोककारी  नोहेच हाक माते, मारी कुणी कुठारी  आई कुणा म्हणू मी, आई घरी न दारी  ही न्यूनता सुखाची , चित्ती सदा बिदारी  स्वामी तीन्ही जगाचा आईविना भिकारी..... चारा मुखी पिलांच्या, चिमणी हळूच देई गोठ्यात वासराना, या चाटतात गाई वात्सल्य ते पशुंचे, मी रोज रोज पाही पाहून अंतरात्मा, व्याकुळ मात्र होई वात्सल्य माऊलीचे, आम्हा जगात नाही दुर्भाग्य याविना का, आम्हास नाही आई ..... शाळेतुनी घराला, येता धरील पोटी  काढून ठेवलेला, घालील घास ओठी उष्ट्या तश्या मुखाच्या, धावेल चुंबना ती  कोण तुझ्याविना गे,का या करील गोष्टी  तुझ्याविना गे कोणी, लावील सांजवाती  सांगेल न म्हणावा, आम्हा "शुभं करोती"..... ताईस या कशाची, जाणीव नाही काही त्या सान बालिकेला, समजे न यात काही  पाणी भरतानां , नेत्रात बावरे ही  ऐकून घे परंतु  आम्हास नाही आई  सांगे जे मुलीना आम्हास नाही आई ते बोल येत कानी, आम्हास नाही आई..... आई, तुझ्याच ठायी, सामर

If we hold on together...

Don't lose your way   With each passing day   You've come so far   Don't throw it away   Live believing   Dreams are for weaving   Wonders are waiting to start   Live your story   Faith, hope & glory   Hold to the truth in your heart   If we hold on together   I know our dreams will never die   Dreams see us through to forever   Where clouds roll by   For you and I   Souls in the wind   Must learn how to bend   Seek out a star   Hold on to the end   Valley, mountain   There is a fountain   Washes our tears all away   Words are swaying   Someone is praying   Please let us come home to stay   If we hold on together   I know our dreams will never die   Dreams see us through to forever   Where clouds roll by   For you and I   When we are out there in the dark   We'll dream about the sun   In the dark we'll feel the light   Warm our hearts, everyone   If we hold on together   I know our dreams will never die   Dreams see us t

Thought

                  As a single footstep will not make a path on the earth, so a single thought will not make a pathway in the mind. To make a deep physical path, we walk again and again. To make a deep mental path, we must think over and over the kind of thoughts we wish to dominate our lives.

U n I

you and I... in this beautiful world..... green grass blue skies... you and i in this beautiful world.. winding lanes as streams go by... u and i..... in this beautiful world...

नट..

नांदीनंतर पडदा उघडला तेव्हा मी तुडुंब भरलेला होतो हजारो रंगीबेरंगी शब्दांनी, शरीरभर रोरावणार्‍या असंख्य आविर्भावांनी, भीतींनी, आशांनी, अपेक्शांनी; आता भरतवाक्य संपल्यावर सर्व प्रेक्षालय रिते झाले आहे आणि संहितेत नसलेल्या प्रयानाची तयारी करीत मी उभा आहे रंगमंचावर, एकटा, समोरच्या प्रेक्षालयाप्रमाणेच संपूर्ण रिकामा मी उच्चारलेले काही शब्द, अजूनही प्रेक्षालयातील धूसर मंदप्रकाशित हवेवर पिंजारलेल्या कापसासारखे तरंगत आहेत, माझे काही आविर्भाव रिकाम्या खुर्च्यांच्या हातांना बिलगुन बसले आहेत, मी निर्माण केलेले हर्षविमर्षाचे क्षण पावसाने फांद्यांवर ठेवलेल्या थेंबांसारखे भिंतीच्या कोपर्‍यावर थरथरत आहेत अजूनही. हा एक दिलासा माझ्या रितेपणाला. नाटक संपल्याची खंत ती आहेच. नाटक नव्हे, तीन तासांचे एक अर्करुप अस्तित्व संपले आहे. पण संपले आहे ते फक्त इथे- माझ्याजवळ. माझ्या त्या अस्तित्वाच्या कणिका घेऊन हजार प्रेक्षक घरी गेले आहेत; मी एक होतो तो अंशा अंशाने हजारोंच्या जीवनात -कदाचित स्मरणातही- वाटला गेलो आहे. -- कुसुमाग्रज

दु:ख ना आनंदही

दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही, नाव आहे चाललेली कालही अन आजही. मी तसा प्रत्यक्ष नाही, ना विदेशी मी जसा, मी नव्हे की बिंब माझें, मी न माझा आरसा. एकला मी नाहि जैसा, नाहि नाहि मी दुणा, मी नव्हें स्वामीहि माझा, मी न माझा पाहुणा. प्रश्न की उद्गार नाही, अधिक नाही वा उणा, जीवनाला ऐल नाही, पैल, तैसा मध्य ना. याद नाही, साद नाही, ना सखी वा सोबती, नाद आहे या घड्याला अन घड्याच्या भोवती. सांध्यछाया आणि काया जोडुनी यांचा दुवा नाव आहे चाललेली, दूरची हाले हवा. दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही, नाव आहे चाललेली कालही अन आजही. -- आरती प्रभू

रचना

स्वप्नामध्ये रचिल्या ओळी  यमक मला नच सापडले!  अर्थ चालला अंबारीतुन  शब्द बिचारे धडपडले;  प्रतिमा आल्या उंटावरुनी;  नजर तयांची पण वेडी;  शब्द बिथरले त्यांना;  भ्याले  स्वप्नांची चढण्या माडी!   थरथरली भावना मुक्याने  तिला न त्यांनी सावरले;  स्वप्नामध्ये रचिल्या ओळी  यमक मला नच सापडले!  : विंदा करंदीकर

सकाळी उठोनी

सकाळी उठोनी | चहा-काँफी घ्यावी, तशीच गाठावी| विज-गाड़ी|| दाती तृण घ्यावे | हुजूर म्हणून; दुपारी भोजन| हेची सार्थ || संध्याकाळ होता | भूक लागे तरी, पोराबाळांवरी | ओकू नये|| निद्रेच्या खोपटी | काळजीची बिळे, होणार वाटोळे| होईल ते|| कुण्याच्या पायाचा | काही असो गुण; आपुली आपण| बिडी प्यावी|| जिथे निघे धूर| तेथे आहे अग्नी; आम्ही जमद्ग्नी | प्रेतरुपी|| : बा.सी.मर्ढेकर
disawar satta king