Skip to main content

Posts

Showing posts from 2011

वाऱ्यावरती थिरकत आले झाडावरूनी पिंपळपान....

आठवणींचा लेवून शेला नटून बसली माय मराठी  दिवस झेलतो सुसाट वारा तरीही दिव्यात जिवंत वाती  जगण्यामधल्या अर्थासंगे बहरून गेले अक्षर रान   वाऱ्यावरती थिरकत आले झाडावरूनी पिंपळपान....

पावसाचं नेहमी हे असंच असतं

पावसाचं नेहमी हे असंच असतं. अनाहूतपणे येणं आणि अकस्मितपणे जाणं! सकाळच्या कोवळ्या किरणांनी तशी चुगली केलेली असते, पण सगळेच आपापल्या नादात. त्यांचं कुजबुजणं कोण ऐकणार? दुपारी दिसणाऱ्या कलत्या सावल्याही पावसाची चाहूल घेऊनच आलेल्या असतात. पण मनाच्या बंद कवाडातून त्यांना आत शिरता तरी कसं येणार? हुरहूरत्या कातरवेळी कोसळणाऱ्या सरी क्षणात आपल्यात ओढतात. बेभान पदन्यास करत, आपल्याला नखशिखांत भिजवत, निलाजरेपणानं अंग-प्रत्यंगाशी चुम्बत या धारा आपल्यालाही बेभान करतात. थेंबा-थेंबांशी धसमुसळेपणानं खेळत, पावलांनी तुषार उडवत, चेहऱ्यावरून अलगद निसटणाऱ्या थेंबांना भावपूर्ण निरोप देत आपणही तर झेलतच असतो अंगावर त्याला!

स्वप्नचित्र

गाण्याच्या काठावर  नारिंगी चंद्र हळू झुकलेला , रूमझुमत्या झाडांतून, शब्दांविण अर्थ गहन पिकलेला. वाऱ्याच्या बोटांवर  दवओल्या गवताचा मंद वास, खडकातून पाझरतो  विरघळल्या जाईचा शुभ्र भास. रात्रमग्न डोंगरात  सोनेरी जाळ मंद झीळमिळतो, पाण्यातून बिंब हले : स्वप्नातून रंग जसा झुळझुळतो. : मंगेश पाडगावकर      : भटके पक्षी 

विश्वास

उच्चार करू नये विश्वासाचा , तो डोळ्यात जपून धरावा शब्दातीत : पहाटेच्या सुकुमार आभाळासारखा  हक्कांच्या हिशोबी हुकमतीतून विश्वास पहावा उडून जाताना  पाखराच्या कुडीतून प्राण जावा तसा  विश्वास असावा लय जगण्यातली, जगणे व्यापणारी अतर्क्य बंदिश  हिवाळ्यातल्या झाडांची सुजाण समजूत  थंडगार धुक्याचे ढग वहाताना अंगावरून  दिसत नव्हतो एकमेकांना. शब्द नव्हते. विश्वास होता. जसे आपण होतो. : मंगेश पाडगावकर  : भटके पक्षी 

तरीसुद्धा

समूहात बसून हि गाणी  ऐकावीशी वाटली तर त्यात काय चूक आहे? शब्दांचं नादरूप असं मिळून भोगणं ही प्रत्येकाची अटळ अशी भूक आहे! तरीसुद्धा डोळे मिटून मनोमय तालावर  आपल्याच मनात नाचता आलं पाहिजे; एकट बसून एकट्याने  प्रत्येक गाणं  आपल्याच मनात वाचता आलं पाहिजे!

निःशब्द

पाखरू निमूट बसलेलं डोळे मिटून गच्च रानात तसे शब्द माझ्या मनात! चांदण्यांचं अबोलपण हिरव्या स्तब्ध पानात तसे शब्द माझ्या मनात! म्हणूनच शब्द असे भिजून येतात खोल खोल निश्ब्दात  रुजून येतात! : मंगेश पाडगावकर 

श्रेय

कधी कधी  सगळंच कसं चुकत जातं! नको ते हातात येत, हव ते हुकत जातं! अशा वेळी काय करावं? सुकलेल्या झाडांना  न बोलता पाणी द्यावं! : मंगेश पाडगावकर 

अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती

अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती दोन दिसांची रंगत सांगत,दोन दिसांची नाती. चंद्र कोवळा पहिला वाहिला झाडामागे उभा राहिला जरा लाजुनी जय उजळूनी काळोखाच्या राती फुलून येत फुल बोलले,मी मरणावर र्हुदय तोलले नव्हते नंतर,परी निरंतर,गंधित झाली माती हात एक तो हळू थरथरला,पाठीवर मायेने फिरला देवघरातील समईमधुनी अजून जळती वाती कुठे कुणाच्या घडल्या भेटी,गीत एक मोहरले ओठी त्या जुळल्या र्हुदायांची गाठ,सूर अजूनही गाती... :मंगेश पाडगांवकर 

जगणे म्हणजे

आत आपुल्या झरा झुळझुळे निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे र्हुदयातील आनंद. घनधारांतून ख्याल ऐकतो रंगुनी मल्हाराचा बघता बघता मोरपिसारा सार्या संसाराचा मनात पाउस बरसे उधळीत मातीचा मधुगंध जगणे म्हणजे उधळीत जाणे र्हुदयातील आनंद दु:खाला आधार नको का?तेही कधीतरी येते दोस्त होवुनी हातच माझा अपुल्या हाती घेते जो जो येईल त्याचे स्वागत दार न कधीही बंद  जगणे म्हणजे उधळीत जाणे र्हुदयातील आनंद झाडाची झुलणारी फांदी कधी लावणी भासे  साधा कोरा कागदही कधी चंद्र होऊनी हसे सर्वत्रच तो बघतो धुंदी,डोळे ज्याचे धुंद जगणे म्हणजे उधळीत जाणे र्हुदयातील आनंद कधी कुणाचे आसू पुसता बोटांनी हळुवार हात होतसे वाद्य:सुरांचे पाझरती झंकार प्रेमाच्या या गाण्यासाठी प्रेमाचा हा चंद जगणे म्हणजे उधळीत जाणे र्हुदयातील आनंद. : मंगेश पाडगांवकर 

विश्वास ठेवा

भिऊन पावलं टाकू नका, भिऊन डोळे झाकू नका! भिनार्याला प्रकाश कोणी बघू देत नाहीत; भिनार्याला इथे कोणी जगू देत नाहीत! गरुडाहुन झेपावणारा प्रत्येकाला प्राण आहे; विश्वास ठेवा ,तुमच्या पायात न संपणारं त्राण आहे! विश्वास ठेवा, विश्वास ठेवा, नवा दिवस प्रकाश घेऊन येतो आहे, नवा दिवस विकास घेऊन येतो आहे..

अवतीभोवती कोणीच नसेल,

अवतीभोवती कोणीच नसेल, काळाकुट्ट काळोख असेल! पायापुढची वाटसुद्धा दिसणार नाही, 'ओ'द्यायला कोणीसुद्धा असणार नाही! प्रत्येक पाउल हरलेले, जग उलट फिरले! शरण न जाण्याची  हीच वेळ असते; आपले आपण असण्याची हीच वेळ असते! अशा वेळी छातीवरती ठेवा आपला हात, ''भिऊ नको!मी आहे!'' म्हणेल कोणी आत!

एक दिवा लाव!

ज्याच्या घरी अंधार असेल, अश्रुवाचून काहीच नसेल,त्याच्या घरी एकदा तरी एक दिवा लाव! तेल नाही, वात नाही; आधाराचा हात नाही; त्याच्या घरी एकदा तरी  एक दिवा लाव!

रडतच आलो येताना,पण हसत जावे जाताना

रडतच आलो येताना,पण हसत जावे जाताना अंगावर आसूड विजेचे  झेलून घेती घन वर्षेचे सार्थक झाले कोसळण्याचे,तृषित धरित्री न्हाताना रडतच आलो येताना पण हसत जावे जाताना  हसत हसत ज्योई जळली काळोखाची रात्र उजळली पाहत झाली तेव्हा नव्हती,तेजोमय जग होताना रडतच आलो येताना पण हसत जावे जाताना बीज आतुनी फुटून गेले  वेदनेत या फुल जन्मले अमरपणाचा अर्थ आकळे,मरण झेलुनी घेताना रडतच आलो येताना पण हसत जावे जाताना कुणी दुखाचा घोट घेतला  खोल व्यथेने प्राण पेटला त्या दुखाचे झाले गाणे,जीव उधळूनी जाताना रडतच आलो येताना पण हसत जावे जाताना

प्रेमात कोणी पडलंय का?

फांदी फांदी झुलतेय का? ताल कोणी धरतंय का? काकणं किणकिण किंकिंतायत, कळशीत पाणी भरतंय का? सुवास असं घाम्घाम्तोय, झाड फुलात गढलय का? वारा गाणं का म्हणतोय? प्रेमात कोणी पडलंय का?

Love

Love is like the sun coming out of the clouds and warming your soul.

LOVE love l

There is no difficulty that enough love will not conquer, no disease that enough love will not heal, no door that enough love will not bridge, no wall that enough love will not throw down, no sin that enough love will not redeem... It makes no difference how deeply seated may be the trouble, how hopeless the outlook, how muddled the tangle, how great the mistake. A sufficient realization of love will dissolve it all. If only you could love enough, you could be the happiest and most powerful being in the world..."

All everything that i understand

All everything that i understand , i understand only b'coz i love :)

If you would b loved , love n b lovable .....

If you would b loved , love n b lovable .....

life n love

Live with no excuses Love with no regrets 

आपलं माणूस किती दूर असलं तरी आपल्या अगदी जवळ असतं!

आपलं माणूस किती दूर असलं तरी आपल्या अगदी जवळ असतं! दिसत नाही फुल तरी वास येतो! तुम्ही म्हणाल भास होतो! भास नव्हे:अगदी खरा गालांवर श्वास येतो! मनातल्या फांदीवर गुणी पाखरू येवून बसतं; आपलं माणूस किती दूर असलं तरी आपल्या अगदी जवळ असतं! किलबिल करीत जाग्या होतात  त्याच्या सगळ्या हालचाली, कधी शब्द तर कधी शब्दावाचून त्याची बोली धूपासारखी भरून टाकते सगळी खोली! ज्याचं त्याला कळत असतं  त्याच्याशिवाय,तिच्याशिवाय जीवाला इतकं बिलगून कुणीच नसतं! आपलं माणूस किती दूर असलं तरी आपल्या अगदी जवळ असतं! आपण आपलं काहीवाही करत असतो, सगळ्यांसाठी हे करीत ते करीत वेळ आपला भरीत असतो! जरा थांबा  आठवून बघा: एकटेच आपण आपल्याशी हळूच हसतो, खरतर आजूबाजू कुणीच नसतो! हसता हसता कोण आपले डोळे पुसतं? आपलं माणूस किती दूर असलं तरी आपल्या अगदी जवळ असतं! संध्याकाळच्या गूढ सावल्या, रात्र होते खिन्न काळी पाखरं गाणी मिटून घेतात,मुकी होते रानजाळी! घराच्या पायरीवर कोण तेव्हा एकट बसतं? आपलं माणूस किती दूर असलं तरी आपल्या अगदी जवळ असतं! खिडकीतून दिसणारा निळा तुकडा कुणाचा? फांदिमागे चंद्र आहे हसरा मुखडा कुणाचा? एकांतात उगवणारा एक तर कु

पावसाळ्यातली संध्याकाळ

पावसाळ्यातली संध्याकाळ, आभाळ आलं अंधारून, हवा अशी उदास उदास कुंद आहे; पहा ना,तरीसुद्धा मन कसं धुंद आहे... फांद्यांचे हिरवे रावे भिजून गेले, ओले चिंब पंख मिटून निजून गेले! समोर सगळं धुक धुक पसरलंय, पायाखालची वाटसुद्धा विसरलंय! पाखरांची चाहूल नाही: प्रत्येकाच्या घरट्याच  दार जणू बंद आहे! हवा अशी उदास उदास कुंद आहे; पहा ना,तरीसुद्धा मन कसं धुंद आहे... सांगायचं ते कळलं आहे इतकं खोल, इतकं खोल: तुही अबोल  मीही अबोल! तुझं माझं असणं हीच भाषा आहे! हवा अशी उदास उदास कुंद आहे; पहा ना,तरीसुद्धा मन कसं धुंद आहे... भरून आल्या मौनाला मातीचा ओला ओला गंध आहे! हवा अशी उदास उदास कुंद आहे; पहा ना,तरीसुद्धा मन कसं धुंद आहे... हातात हात गुंफून असं चालताना, अबोलपणात अपर असं होताना, नाच रे मोरा, नाच रे मोरा, शब्द आज विसरून गेलेत आपला तोरा! मी आज तुझ्यावरच्या कवितेचा हळुवार छंद आहे! हवा अशी उदास उदास कुंद आहे; पहा ना,तरीसुद्धा मन कसं धुंद आहे...