सखी शेजारिणी, तू हसत रहा
हास्यांत पळे गुंफीत रहा
हास्यांत पळे गुंफीत रहा
दीर्घ बदामी श्यामल डोळे
एक सांद्रघन स्वप्न पसरले
'धूपछांव' मधि यौवन खेळे
तू जीवनस्वप्ने रचित रहा
एक सांद्रघन स्वप्न पसरले
'धूपछांव' मधि यौवन खेळे
तू जीवनस्वप्ने रचित रहा
सहज मधुर तू हसता वळुनी
स्मित-किरणी धरि क्षितिज तोलुनी
विषाद मनिचा जाय उजळुनी
तू वीज, खिन्न घनि लवत रहा
स्मित-किरणी धरि क्षितिज तोलुनी
विषाद मनिचा जाय उजळुनी
तू वीज, खिन्न घनि लवत रहा
मूक जिथे स्वरगीत होतसे
हास्य मधुर तव तिथे स्फुरतसे
जीवन नाचत गात येतसे
स्मित-चाळ त्यास बांधून पहा
हास्य मधुर तव तिथे स्फुरतसे
जीवन नाचत गात येतसे
स्मित-चाळ त्यास बांधून पहा
सखी शेजारिणी, तू हसत रहा
हास्यांत पळे गुंफीत रहा
हास्यांत पळे गुंफीत रहा
: वा रा. कांत
Comments
Post a Comment