Skip to main content

Posts

Showing posts from March, 2020

Pu. L.

शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी ... वांग्याचे भरीत ... गणपती बाप्पा मोरया ची मुक्त आरोळी . केळीच्या पानातली भाताची मूद आणि त्यावरचे वरण . उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ ... मारुतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातले उडालेले पाणी ... दुस - याचा पाय चुकून लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार ...... दिव्या दिव्या दिपत्कार ... आजीने सांगितलेल्या भुताच्या गोष्टी ... मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेंव्हा लहानमोठी होणारी शेपटी ... दस - याला वाटायची आपट्याची पाने ... पंढरपुरचे धुळ आणि अबीर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखरफ़ुटाणे ... सिंहगडावर भरुन आलेली छाती आणि दिवंगत आप्तांच्या मुठभर अस्थींचा गंगार्पणाच्या वेळी झालेला स्पर्श ... कुंभाराच्या चाकावर फिरणा - या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजूक हात लागून घाटदार मडके घडावे तसा हया अदृश्य पण भावनेने भिजलेल्या हातांनी हा पिंड घडत असतो . कुणाला देशी मडक्याचा आकार येतो . कुणाला विदेशी कप

तरीही वसंत फुलतो

प्रत्येक जन्मणारा क्षण शेवटास ढळतो तरीही वसंत फुलतो..................... ..!! उमले फुले इथे जे, ते ते अखेर वठते लावण्य, रंग, रूप, सारे झडून जाते तो गंध, तो फुलोरा, अंती धुळीस मिळतो तरीही वसंत फुलतो..................... ..!! जे वाटती अतूट, जाती तुटून नाते आधार जो धरावा, त्यालाच कीड लागे ऋतू कोवळा अखेरी, तळत्या उन्हात जळतो तरीही वसंत फुलतो..................... ..!! तरीही फिरून बीज, रुजते पुन्हा नव्याने तरीही फिरून श्वास, रचती सुरेल गाणे तरीही फिरून अंत, उगमाकडेच वळतो....... उगमाकडेच वळतो...................... ....!! प्रत्येक जन्मणारा क्षण शेवटास ढळतो तरीही वसंत फुलतो..................... ..! :सुधीर मोघे

ध्यास

चांदण्यांचा झोत       झरे नभातून  माझ्या मनातून       ध्यास तुझा.  निर्झराचा नाद       घुमे पहाडांत  माझ्या अन्तरात       हाक तुला.  जुन्या देवालयात       उजळते वात  माझ्या जिवनात       प्रीति तुझी.  निळ्या आभाळात       पाखरांचे थवे  वेडी माया धावे      तुझ्याकडे.  निशी स्मशानांत       रात्रींचर रडे  उरी धडधडे       तुझ्यासाठी.  : ध्यास  : विशाखा  : कुसुमाग्रज 

तरीही केधवा

दोघांत आजला  अफाट अंतर  जुळून पाकळ्या  उडाल्या नंतर - जीवनावाचून  जळला अंकुर  प्रश्नही राहिला  राहिले उत्तर ! संग्राम आजला  शोधतो जीवित  उरीचे ओघळ  दाबून उरात - उठती भोवती  धुळीचे पर्वत  अखंड फिरते  वरून कर्वत ! वादळी रणात  करणे कोठून  नाजूक भावांचे  लालनपालन  तरीही केधवा  पडता पथारी  थडगी दुभंग  होतात अंतरी - आठवे तुझ्या ते  प्रीतीचे मोहळ  आणि हो बिछाना आगीचा ओहळ ! : तरीही केधवा  : विशाखा  : कुसुमाग्रज 

स्वप्नाची समाप्ती

स्नेहहीन ज्योतीपरी मंद होई शुक्रतारा काळ्या मेघखंडास त्या किनारती निळ्या धारा . स्वप्नासम एक एक तारा विरे आकाशांत खिरे रात्र कणकण प्रकाशाच्या सागरांत . काढ सखे , गळ्यांतील तुझे चांदण्याचे हात क्षितिजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत . रातपाखरांचा आर्त नाद नच कानीं पडे संपवुनी भावगीत झोंपलेले रातकिडे . पहांटचे गार वारे चोरट्यानें जगावर येती , पाय वाजतात वाळलेल्या पानांवर . शांति आणि विषण्णता दाटलेली दिशांतुन गजबज गर्जवील जग घटकेनें दोन ! जमूं लागलेले दंव गवताच्या पातीवर भासतें भू तारकांच्या आसवांनीं ओलसर . काढ सखे , गळ्यांतील तुझे चांद्ण्यांचे हात क्षितिजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत प्राजक्ताच्या पावलाशीं पडे दूर पुष्प - रास वार्यावर वाहती हे त्याचे दाटलेले श्वास . ध्येय , प्रेम , आशा यांची होतसे का कधीं पूर्ती वेड्यापरी पूजतों या आम्ही भंगणार्या मूर्ती खळ्यामध्यें बांधलेले बैल होवोनिया जागे गळ्यांतील घुंगरांचा नाद
disawar satta king