Skip to main content

Posts

Showing posts from November, 2009

मी गाताना गीत

मी गाताना गीत तुला लडिवाळा हा कंठ दाटुनी आला मी दुःखाच्या बांधुनी पदरी गाठी जपले तुज ओटी-पोटी कधी डोळ्यांना काजळ तूज भरताना गलबला जीव होताना खोप्यात जिथे चिमणी रोज पिलांना सांगते गोष्ट नीजताना ते ऐकुनी का मन तडफड होई पाळणा म्हणे अंगाई आयुष्याला नको सावली काळी इश्वरा तूच सांभाळी झुलता झोका जावो आकाशाला धरतीचा टिळा भाळाला कवी - ना. धों. महानोर

बाळपणींचा काळ सुखाचा

बाळपणींचा काळ सुखाचा, आठवतो घडिघडी । तशि नये फिरुन कधिं घडी ॥ किति हौसेनें टाकिलि असती त्यांत मागुती उडी । परि दुबळी मानवकुडी । (चाल) मनिं नव्हति कशाची चिंता । आनंद अखंडित होता । आक्रोश कारणापुरता । जें ब्रम्ह काय तें मायबाप ही जोडी । खेळांत काय ती गोडी ॥ कवी - गोविन्द बल्लाळ देवल

प्रतिमा उरी धरोनी

प्रतिमा उरी धरोनी मी प्रीतिगीत गावे ते गीत प्रीतिचे रे हळूवार मी म्हणावे अस्फूट भावनांच्या स्वप्नात गुंग व्हावे पुष्पात गंध जैसा, गीतात भाव तैसा अद्वैत प्रीतिचे हे मम जीवनी असावे तू सप्तरंग धनुचे, स्वर सात बासरीचे संगीत जीवनाचे, अळवीत मी बसावे का रोहिणीस वाटे चंद्रासवे असावे हे भावस्वप्न अपुरे साकार तू करावे कवी - दत्ता केसकर

पूर्तता माझ्या व्यथेची

पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी, जीवनापासून माझ्या ह्या मला मुक्ती मिळावी. वेदनेला अंत नाही अन्‌ कुणाला खंत नाही गांजणाऱ्या वासनांची बंधने सारी तुटावी. संपली माझी प्रतीक्षा, गोठली माझी अपेक्षा कापलेले पंख माझे .... लोचने आता मिटावी. सोबती काही जिवाचे मात्र यावे न्यावयाला तारकांच्या मांडवाखाली चिता माझी जळावी. दूर रानातील माझी पाहुनी साधी समाधी .... आसवे साऱ्या फुलांची रोज खाली ओघळावी. कोण मी आहे ? मला ठाऊक नाही नाव माझे ! शेवटी माझ्या धुळीने चौकशी माझी करावी. हे रिते अस्तित्व, माझे शोध शून्यातील वेडा माझियामागेच माझी सर्व ही ओझी रहावी ! काय सांगावे तुला मी ? काय मी बोलू तुझ्याशी ? राख मी झाल्यावरी गीते तुला माझी स्मरावी ! कवी - सुरेश भट

नच साहवतो...

नच साहवतो हा भार गीतामधुनी गेला निघुनी दूर आज गंधार ओठ जरी हे माझे होते सूर उरी हे तुझेच होते तुझ्यावाचुनी जीवन माझे करूण आर्त उद्‌गार स्वप्नावाचुन आता डोळे चंद्रावाचुन अंबर काळे वाट तृषेची कठीण, नसता जवळ मेघमल्हार सरले दिन ते मंतरलेले पुन्हा परीची शिळा जाहले तुझ्यामुळे मी वीज जाहले, तुझ्यामुळे अंधार : वसंत निनावे 

दिवस तुझे हे फुलायचे

दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्यावाचून झुलायचे  स्वप्नात गुंगत जाणे  वाटेत भेटते गाणे  गाण्यात हृदय झुरायचे  मोजावी नभाची खोली घालावी शपथ ओली  श्वासात चांदणे भरायचे  थरारे कोवळी तार  सोसेना सुरांचा भार  फुलांनी जखमी करायचे  माझ्या या घरच्यापाशी  थांब तू गडे जराशी पापण्या मिटून भुलायचे :  मंगेश पाडगावकर

तू दूर दूर तेथे

तू दूर दूर तेथे, हुरहूर मात्र येथे विरहात रात्र मोठी, प्रेमी जनांस वाटे शब्दात सांगु कैसे, ते दुःख अंतरीचे ओलावले दवांत, हे काठ पापण्यांचे भरला स्वरात कंप, कंपात भाव दाटे मी भाबडी मनाची, आहेच स्वप्नवेडी विरुनी तुझ्यात जावे, ही एक आस वेडी राहो अभंग प्रीती, राहो अभंग नाते भाळावरी असे हे, सौभाग्य लाल कुंकू विक्राळ काळ येता, दोघे तयास जिंकू फुलता मनात आशा, ओठांत गीत येते : मधुकर जोशी 

आधार

चिंब चिंब  भिजतो आहे  भिजता भिजता  मातीमद्ये  पुन्हा एकदा रुजतो आहे  हिरवे कोवळे कोंब माती  माझ्याभोवती बांधते आहे  विरते पाश सरते नाते  पुन्हा पुन्हा सांधते आहे...  अहो माझे तारणहार,  जाम्भळे मेघ धुवाधार  तेवढा पाउस माघार घ्या  आकाशातील प्रवासाला  आता तरी आधार द्या  आधार म्हणजे  निराधार... : आधार  : छंदोमयी  : कुसुमाग्रज 

देण

मातीपण मिटता मिटत नाही आकाशपण हटता हटत नाही आकाश मातीच्या या संघर्रषयात माझ जखमांच देण काही सुटत नाही... : छंदोमयी  : कुसुमाग्रज 

वेड

जे वेड मजला लागले, तुजलाहि ते लागेल का ? माझ्या मनीची ही व्यथा कोणी तुला सांगेल का ? मी पाहतो स्वप्नी तुला, मी पाहतो जागेपणी जे मी मुकेपणि बोलतो शब्दात ते रंगेल का ? हा खेळ घटकेचा तुझा, घायाळ मी पण जाहलो जे जागले माझ्या मनी, चित्ती तुझ्या जागेल का ? माझे मनोगत मी तुला केले निवेदन आज, गे सर्वस्व मी तुज वाहिले, तुजला कधी उमगेल का ? शांता शेळके

फागुन

रंग डालो तनमनकी बगियाँ फागुन बनके आ जाओ...  बरस पडो दिलके आंगनमे रंगोंकी बरसात लिए...

नक्षत्रांचे देणे***

गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्रांचे देणे; माझ्यापास आता कळ्या, आणि थोडी ओली पाने आलो होतो हासत मी, काही श्वासांसाठी फक्त; दिवसांचे ओझे आता, रात्र रात्र शोषी रक्त आता मनाचा दगड, घेतो कण्हत उशाला; होते कळ्यांचे निर्माल्य, आणि पानांचा पाचोळा : आरती प्रभू 

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे ?

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे ? कशासाठी उतरावे तंबू ठोकून कोण मेले कोणासाठी रक्त ओकून जगतात येथे कुणी मनात कुजून तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे दीप सारे जाती येथे विरुन विझून वृक्ष जाती अंधारात गोठून झडून जीवनाशी घेती पैजा घोकून घोकून म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे अंत झाला अस्ताआधी जन्म एक व्याधी वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी देई कोण हळी त्याचा पडे बळी आधी हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे : आरती प्रभू 

अलवार तुझी चाहूल

अलवार तुझी चाहूल का धडधडते हे ऊर मनास का उमगेना तू समीप की रे दूर घन वादळवाऱ्यातून मी जपले सारे सूर कोंदणात आनंदाच्या लपविले असे काहूर अलवार तुझी चाहूल का धडधडते हे ऊर मनास का उमगेना तू समीप की रे दूर गीत - अजेय झणकर

हे बंध रेशमाचे

पथ जात धर्म किंवा नातेहि ज्या न ठावे ते जाणतात एक प्रेमास प्रेम द्यावे हृदयात जागणाऱ्या अतिगूढ संभ्रमाचे तुटतील ना कधीही हे बंध रेशमाचे ! विसरून जाय जेव्हा माणूस माणसाला जाळीत ये जगाला विक्राळ एक ज्वाला पुसतात डाग तेही धर्मांध आक्रमाचे तुटतील ना कधीही हे बंध रेशमाचे ! क्षण एक पेटणारे हे युद्धवेड आहे देहाहुनी निराळी रक्तास ओढ आहे तीर्थाहुनी निराळे पावित्र्य संगमाचे तुटतील ना कधीही हे बंध रेशमाचे ! हे बंध रेशमाचे ठेवी जपून जीवा धागा अतूट हाच प्राणात गुंतवावा बळ हेच दुर्बळांना देती पराक्रमाचे तुटतील ना कधीही हे बंध रेशमाचे ! : शांता शेळके 

स्वप्नातल्या कळ्यांनो

स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा रेखाकृती सुखाच्या चित्ती चितारलेल्या साशंक कल्पनांनी सहजी विरून गेल्या कधि सोशिला उन्हाळा कधि लाभला विसावा नैराश्य कृष्णमेघी, आशा कधी बुडावी विरहात चिंब भिजुनी प्रीती फुलोनि यावी काट्याविना न हाती केव्हा गुलाब यावा सिद्धीस कार्य जाता, येते सुखास जडता जडतेत चेतनेला उरतो न कोणि त्राता अतृप्त भावनांनी जीवात जीव यावा : म पा भावे 

स्वर आले दुरुनी

स्वर आले दुरुनी जुळल्या सगळ्या त्या आठवणी निर्जीव उसासे वाऱ्यांचे आकाश फिकटल्या ताऱ्यांचे कुजबुजही नव्हती वेलींची हितगुजही नव्हते पर्णांचे ऐशा थकलेल्या उद्यानी विरहार्त मनाचे स्मित सरले गालावर आसू ओघळले होता हृदयाची दो शकले जखमेतुन क्रंदन पाझरले घाली फुंकर हलकेच कुणी पडसाद कसा आला न कळे अवसेत कधी का तम उजळे संजीवन मिळता आशेचे निमिषात पुन्हा जग सावरले किमया असली का केलि कुणी : यशवंत देव 

सर्व सर्व विसरु दे

सर्व सर्व विसरु दे गुंतवू नको पुन्हा येथ जीव जडविणे हाच होतसे गुन्हा हे धुके, अशी हवा, ही उदासता भरे सूर सूर मिटुनिया लोपलीत पाखरे हास हास लाडक्या श्रावणातल्या उन्हा रात्र रात्र जागुनी वाट पाहिली कुणी मंद होऊनी विरे अन्‌ पहाटचांदणी, स्वप्न संपुनी असे ये कठोर वंचना काय मोर थांबतो मेघ दाटता शिरी ? भान राधिके नुरे ऐकताच बासरी बंधनात जन्मतो मुक्तिचा खरेपणा हाक धुंद ही तुझी अंग अंग वेढिते होऊनी प्रवाह या बंधनात ओढिते मी मला अजाणता गुंतले अशी पुन्हा हास हास लाडक्या श्रावणातल्या उन्हा धुंद धुंद गंध ये दाटुनी फुलाविना : मंगेश पाडगांवकर 

शुक्रतारा

शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी चंद्र आहे, स्वप्न वाहे धुंद या गाण्यातुनी आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा तू अशी जवळी रहा मी कशी शब्दात सांगू भावना माझ्या तुला ? तू तुझ्या समजून घे रे लाजणाऱ्या या फुला अंतरीचा गंध माझ्या आज तू पवना वहा तू असा जवळी रहा लाजऱ्या माझ्या फुला रे गंध हा बिलगे जिवा अंतरीच्या स्पंदनाने अन्‌ थरारे ही हवा भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हा तू अशी जवळी रहा शोधिले स्वप्नात मी ते ये करी जागेपणी दाटुनी आलास तू रे आज माझ्या लोचनी वाकला फांदीपरी आता फुलांनी जीव हा तू असा जवळी रहा :  मंगेश पाडगांवकर 

शब्दावाचुन कळले सारे

शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले प्रथम तुला पाहियले आणिक घडू नये ते घडले अर्थ नवा गीतास मिळाला छंद नवा अन्‌ ताल निराळा त्या दिवशी का प्रथमच माझे सूर सांग अवघडले ? होय म्हणालिस नकोनकोतुन तूच व्यक्त झालीस स्वरातुन नसता कारण व्याकुळ होऊन उगिच हृदय धडधडले आठवते पुनवेच्या रात्री लक्ष दीप विरघळले गात्री मिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य मज उलगडले : मंगेश पाडगांवकर 

शब्द शब्द जपून ठेव

शब्द शब्द जपून ठेव बकुळिच्या फुलापरी काय बोलले नकळे तू समजुन घे सगळे लाविलीस ज्योत तूच या उदास अंतरी दुःख नको तुटताना अश्रु नको वळताना मी मिटता लोचन हे उमलशील तू उरी साक्ष लाख ताऱ्यांची स्तब्ध अचल वाऱ्याची ज्योत बनुन जळले रे मी तुझ्या पथावरी : मंगेश पाडगांवकर

भरारी

स्पंदने या माणसांची येवू दे शब्दात माझ्या चांदने संवेदनाचे वाहू देत रक्तात माझ्या घेतली नाही भरारी मी जरी तेव्हा दिशांनो, एक मी आभाळ आहे ठेवले पंखात माझ्या...

मी

जीवनातल्या तुझ्या एक मूर्त भास् मी वाटतो तुला खरा तो तुझा कयास मी राहिलो कसे गडे, जीवनात गुंतुनी? बोलणे तुझे दिशा, अन् मुका प्रवास मी post scrap cancel

तू पण ना !

भलते सलते विचारतोस, तू पण ना ! वर उत्तरही मागतोस, तू पण ना! (मग डोळ्यात काय वाचतोस? तू पण ना!) ...बस पुरे कर ती नजरेची सैर आता, तू पण ना! किती किती रे न्याह्याळतोस, तू पण ना! (काय काय रे न्याह्याळतोस, तू पण ना!) मनी तुझेच रूप, ओठी तुझेच नाव, सदा सोबतीस रहातोस, तू पण ना! (अन् स्वप्नातही जागतोस? तू पण ना!) तू आठवत असशील मला सारखा उचकी होवुन भेटतोस, तू पण ना! (भेटीची ओढ़ लावतोस, तू पण न!) पहिला पाउस... बदलून गेला ह्रुतु मोर होवुन नाचतोस, तू पण ना! (रंग हिरवा अंगी बाणतोस, तू पण ना!) तुझ्या रंगात रंगल्याच्या खुणा माझ्या देहभर आणिक मेंहदी लाव बोलतोस, तू पण ना ! (रंगाला गंध आणतोस, तू पण ना!) : संदीप मसहूर