अंधारात आपणंच अंधार होऊ शकत नाही.
दुःख प्यायलाही दुःखाची ओंजळ लागते .
कवितेत मानवी मनाचे सूक्ष्मांत सूक्ष्म तरंग असतात.
सतत जे जवळ होतं
कुणालाही कळत नव्हतं
ते माझं .. फक्त माझं मन होतं .....
मनातले सल सांगायला माणसाची सोबत अपुरी वाटू लागली कि मन शब्दांच्या पाऊलवाटेकडे वळतं.
शब्दचं आधार होतात ! शब्दचं श्वास होतात ! शब्दच निःस्वास होतात!
अशा शब्दातूनच व्यक्त झालेली निर्मिती हि जणू कलावंताचं शब्दरूप मनचं असतं.
अशी मन चुरगळणारी पाशवी मन भोवती असतात.
ज्यांना आपल्या सानिध्यात असलेल्या अशा तरल मनाची पर्वा नसते .
इतकचं काय , अशा हळुवार जगण्याचं पायपुसणं करण्यांतच अनेकांना पुरुषार्थ वाटतो !
मग आयुष्यातील सुखदुःखाची सखी जी कविता त्या कवितेबद्दलही बधिर सहचाराला
मत्सर वाटू लागतो . "आपल्या व्यतिरिक्त कोणाची सोबत या मनाला लाभेलच कशी?"या
आकसापोटी कवितेंच्या कळ्यांचे श्वास , निःश्वास खुडून टाकण्यात काहींची उभी हयात जाते.
Comments
Post a Comment