Skip to main content

Posts

Showing posts from January, 2021

बहरला पारिजात दारीं

 बहरला पारिजात दारीं  फुले का,  पडती शेजारी ?  माझ्यावरती त्यांची प्रीती  पट्टराणी जण तुला म्हणती  दुःख हें , भरल्या संसारी ! ।। असेल का हें नाटक त्यांचे ,  मज वेडीला फसवायचे ? कपट कां , करिती चक्रधारी ? ।। वारा वाही जगासारखा  तिलाच झाला पाठीराखा  वाहतो , दौलत तिज सारी ! ।। : गदिमा  : निवडक गदिमा  : संपादक : वामन देशपांडे 

विठ्ठलाचे पायीं ,

 विठ्ठलाचे पायीं , थरारली वीट  राउळींची घाट , निनादली ।। ज्ञानोबाच्या दारीं , शरारे पिंपळ  इंद्रायणी -जळ, खळाळलें  ।। उठला हुंदका , देहूच्या वाऱ्यात  तुका समाधीत , चाळवला ।। सज्जनगडात , टिटवी बोलली  समाधी हालली,  समर्थांची ।। एका ब्राम्हणाच्या , पैठणीपुरीत  भिजे मध्यरात्र , आसवांनी ।। चालत्या गाडीत , सोडून पार्थिव  निघाला वैष्णव , वैकुंठासी ।। संत - माळेतील, मणी शेवटला  आज ओघळला , एकादशी ।। : ग दि मा  : निवडक गदिमा  : संपादन : वामन देशपांडे 

सुधागड

 किल्ला : सुधागड  जिल्हा : रायगड  डोंगररांग : लोणावळा  श्रेणी : सोपी  जाण्यासाठी लागणारा वेळ : धोंडसे गावातून अडीज तास ,  ठाकूरवाडी मार्गे दीड तास  दिनांक : २५/०८/२०१३, २८/०२/२०१६, ०५/१२/२०२०

काय म्यां द्यावें

 राहिलेली ही फुले घे ; काय म्यां द्यावें दुजें ?  जन्मजन्मीं मी दिलेलें सर्व जे होतें तुझें .  ती गवाक्षांतील शिक्षा , त्या प्रतीक्षा आंधळ्या,  सांध्यछायांच्या किनारी . त्या लकेरी राहिल्या.  प्रीत केली , शुष्क झाली पाकळी अन पाकळी ,  व्यर्थ गेलें मी जळाची गुंफिण्या रे साखळी .  धुपदाणीतील झाला धूर आता कापरा ,  पानजाळीचा फुलेंना शुद्ध आत्ता मोगरा.  हे जुने पोशाख झाले, संपलेली ही  तनु,  दागिने उतरुं निघाल्ये, काय मी माझे म्हणू ?  दीप जो तू लाविलेला तो ही मंदावला,  या अखेरी येथ आला पूर - आता वाढला.  राहिलेली ती फुले ने ... काय म्यां द्यावें दुजें ?  त्या प्रवाहांतून गेलें सर्व रे माझे तुझें .  : काय म्यां द्यावें  : नक्षत्रांचे देणे  : आरती प्रभू 

कुठल्या कवितेसाठी

 कुठल्या कवितेसाठी न कळे  कुंठित झाले शब्द पुराणे ,  किरण लांबता लांबच गेले  डाळिंबांतच पडून दाणे.  पडून दिनमणी रंगी, व्यंगी  काय वेंचितां येइल हाती ? दरीत घंटेचा ध्वनी भरतो ,  थरकापत पण दिव्यात ज्योती .  विचित्र आकारांच्या आडून  कोण हलवतो छातीवरचा  दगड नि झाडुन मोहर सारा  वेध घेतसे त्या कवितेचा ?  : कुठल्या कवितेसाठी  : नक्षत्रांचे देणे  : आरती प्रभू 
disawar satta king