Skip to main content

Posts

Showing posts from January, 2013

तुझ्या पथावर

तुझ्या पथावर  तुझ्या पदांच्या  पाउलखुणांच्या शेजारी मम  पाउलखुणा या उमटत जाती  खरेच का हे? मातीमधल्या मुसाफिरीतून  हात तुझा तो ईश्वरतेचा  चुरतो माझ्या मलिन हाती  खरेच का हे? खरेच का आहे - बरेच का हे - दोन जगांचे तोडूनी कुंपण  गंधक -तेजाबसम आपण  मिळू पाहावे  आणि भयानक दहन टाळण्या  जवळपणातही दूर राहुनी स्पोटाच्या या सरहद्दीवर  सदा राहावे ? : तुझ्या पथावर  : वादळवेल  : कुसुमाग्रज 

क्षणिक

मस्तक ठेवुनी  गेलीस जेव्हा  अगतिक माझ्या  पायावरती..... या पायांना  अगम्य इच्छा  ओठ व्ह्यायची  झाली होती..... : क्षणिक  : वादळवेल  : कुसुमाग्रज 

सये आत्ता सांग

येण्याआधी वाट ,आल्यावर सर  आणि गेल्यावर , रिक्त मेघ  इतके लाडके , असू नये कोणी  डोळ्यातून पाणी , येते मग  रातराणी बोल , 'परत कधी' चे  उत्तर मिठीचे , संपू नये  सये आत्ता सांग , सांग तुझे घर  आहे वाटेवर, माझ्याच न ???.... : संदीप खरे 

हे गगना

हे गगना तू माझ्या गावी  आणि तिच्याही गावी  तुला उदारा, पहिल्या पासून  सर्व कहाणी ठावी  अशी दूरता अपार घडता  एक तुझीच निळाई  अंतरातही एकपणाचे  सांत्वन जगवित राही  घन केसांतुनी तिच्या अनंता  फिरवीत वत्सल हात  सांग तिला कि दूर तिथेही  जमू लागली रात ..... : हे गगना  : छंदोमयी  : कुसुमाग्रज 

येईन एकदा पुन्हा

पल्याड काळोखाच्या जाण्याआधी घेऊन अंगभर ओळख : सगळ्या फुलल्या खुणा येईन एकदा पुन्हा घुंगुरवाळ्या पाण्यापाशी निःशब्द भरारिपरि पक्षांच्या असतील डोळे पंखोत्सुक असतील झाडे सारी असेल तेव्हा पहाटहि पिसाहूनही हलका वारा पाण्यावरती तशी तंद्री आभाळाची आणिक तुझ्या डोळ्यांच्या काठाशी वाजेल न वाजेल असे पाउल माझ्या श्वासांचे सांगाण्याही आधी अबोल होतील शब्द कळ्यास तेव्हा असेल घाई फुलण्याची अर्ध्या उघड्या डोळ्यांचा बावरा सुगंधही असेल थबकून घुटमळताना श्वास तुझे ओठांवर... गालांवर ... होता पक्षी निळ्याभोर पंखांचा लुकलुक खळखळ डोळे ओठांवर शीळ चांदणी इवली पर्युत्सुक पिसे..... आणि एकदा काळोखाच्या वेळी निळ्याभोर पंखांचा पक्षी खिळवून बसला डोळे दृष्टीच्याही पल्याड अगदी ...... पंखही हलविणा शीळहि फुलविना फांदीच्याही डोळा आले दाटुनिया दंव का अवचित झाले डोळे तिन्साञ्जेच्या पाण्यापरी ते भयस्तब्ध अनं खोल ? का शिळहि भिरभिर झाली प्रौढ अबोल ? का मिटुनी पाने फांदीने हळूच लपविले अश्रू ? येईन एकदा पुन्हा घेऊन अंगभर ओळख सगळ्या फुलत्या खुणा ..... मनभर सगळी फुले त्यांच्याही पाकळ्या कोमेजती का लागून धग ओंजळीची ? विसरतील का

मिठी

अश्या उन्हाला  बांध नसावा ... उडण्यासाठी  गवताचे आकाश असावे  तुडुंब हिरवे ..... या बकुळीला  मखर नसावे ... फुलण्यासाठी  पानांच्या पापण्यांत मिटल्या  शहारता एकांत असावा  अबोल बुजरा ... अशा तुला अन् भान नसावे ... बुडण्यासाठी  माझी गहिरी मिठी असावी  उत्कट दुखरी ...... : उत्सव : मंगेश पाडगावकार 
disawar satta king