Skip to main content

Posts

Showing posts from September, 2012

ऋणमुक्त

सहज सहज टाकुन गेलास ओंजळीमधे एक ऋणाचा क्षण..एका जन्मासाठी. दहा बोटांची उधळली फुलपाखरे आणि, पांच प्राणाचे झाले संपुष्ट…. कितिदा तुला वाऱ्याने सांगितले असेल; कितिदा फुल चिमणिने सांगितले असेल; झुंजु मुंजु धुक्यातुन कधीच का फिरला नाहीस? जांभळ्या फुलाच्या शामलीजवळून कधिच का गेला नाहीस? त्या फुलावरचा दवाचा थेंब कधिच का पाहिला नाहीस ? कधिही न ढळणारा तो दवाचा थेंब तुझ्यासाठी. तुझ्या पापण्या भिजवण्यासाठी. कितीदा तुला हे वाऱ्याने सांगितले असेल फुल चिमणिने सांगितले असेल.. – इंदिरा संत