Skip to main content

Posts

Showing posts from July, 2010

soulmates

We are, each of us angels with only one wing; and we can only fly by embracing one another. For it was not into my ear you whispered, but into my heart. It was not my lips you kissed, but my soul. Whatever our souls are made of, his and mine are the same. Love makes your soul crawl out from its hiding place. A soul-mate is the one person whose love is powerful enough to motivate you to meet your soul, to do the emotional work of self-discovery, of awakening.

Love

"Love is a temporary madness. It erupts like an earthquake and then subsides. And when it subsides you have to make a decision. You have to work out whether your roots have become so entwined together that it is inconceivable that you should ever part. Because this is what love is. Love is not breathlessness, it is not excitement, it is not the promulgation of promises of eternal passion. That is just being "in love" which any of us can convince ourselves we are. Love itself is what is left over when being in love has burned away, and this is both an art and a fortunate accident. Your mother and I had it, we had roots that grew towards each other underground, and when all the pretty blossom had fallen from our branches we found that we were one tree and not two." -St. Augustine

प्रिय सरो,

प्रिय सरो , समजलं .. आई अत्यवस्थ आहे . पण ईथे पाऊस लागलाय . पाऊस आमेरिकेतला - तुला काय समजणार म्हणा , मी इथून निघणार कसा ? पण आईच्या म्रुत्यूची व्हिडीओ कसेट नक्की पाठव शेवटच्या आचक्यापासून क्रियाकर्मापर्यंत सगळं अगदी व्यवस्थित नोंदव . इथल्या मित्रांना अंत्यविधी आवडतो . भारतीय लग्न , लग्नाची पार्टि , मधुचंद्र , घटस्फ़ोट , सती असलं सगळं पाहून झालंय . श्वास थांबल्यानंतरचं क्रियाकर्म जसं प्रेताला आंघॊळ घालणं कोरे कपडे चढविणं , तोंडात भाताचा गोळा ठेवणं , अग्नी देणं , मडकं फ़ोडणं असलं अजून नाही पाहिलं म्हणून पहायचंय पण ब्ल्यक आणि व्हाईट आणि रंगीत अशा दोन्ही कसेट वेगवेगळ्या काढा ब्ल्यक आणि व्हाईट आवड्ते मर्लीनला ज्यक्लीनच्या मते कलरशिवाय ' चिता - फ़िल्म ' ला काय मजा व्हिडीओवाला आधीच बुक कर . वेळेवर व्हिडीओ मिळाला नाही किंवा आईनं वेळ दिला नाही कुठलीच सबब ऎकणार नाही . हवं तर चांगली कसेट मी इथून पाठवितो , पाऊस नसता तर मी सुध्दा आलो असतो कसेट

मेणा

डोळ्यांत तरारून आला अश्रूचा इवला थेंब जग धूसर झाले तेव्हा कायाही गेली लांब मी होते तशीच होते काही ना कळले कोणा अश्रूच्या अल्याड होता व्याकूळ सखीचा मेणा तिज मीच घातली होती ती साद आर्त हाकांनी सामोरी जाऊ न शकले पण मातीच्या हातांनी डोळ्यात तरारून आला नग थेंब अश्रुचा इवला मी सावरले जग तेव्हा तो मेणा निघून गेला. :आसावरी काकडे

अजुनि चालतोंची वाट !

अजुनि चालतोंची वाट ! माळ हा सरेना! विश्रांतिस्थळ केव्हां यायचें कळेना ! त्राण न देहांत लेश, पाय टेकवेना, गरगर शिर फिरत अजी होय पुरी दैना ! सुखकर संदेश अमित पोंचविले कोणा, भार वाहुनी परार्थ जाहलों दिवाणा ! कांटयांवरि घातलाचि जीव तयासाठीं हंसवाया या केली किति आटाआटी! हेंच खास घर माझें म्हणुनि शीण केला, उमगुनि मग चूक किती अश्रुसेक झाला; दिन गेले, मास तसे वत्सरेंहि गेलीं, निकट वाटतें जीवनसंध्या ही आली ! कुठुनि निघालों, कोठें जायचें न ठावें, मार्गांतच काय सकल आयु सरुनि जावें ! काय निरुद्देश सर्व जीवन मम होतें मरुसरितेपरि अवचित झरुनी जायचें ते? पुरे! पुरे ही असली मुशाफरी आतां, या धूळिंत दगडावर टेकलाच माथा ! : ए. पां. रेंदाळकर

झाले कोकण पारखे

झाले कोकण पारखे आता पुन्हा भेट नाही आत्याबाईच्या मायेची आता पुन्हा गाठ नाही. आता नाही व्हावयाचा हवाहवासा प्रवास आता जाईल उन्हाळा कसा उदास उदास नाही पोफळीच्या बागा आणि नारळाची झाडे आता दर्शन का ह्यांचे फक्त स्वप्नातून घडे निळे हिरवे डोंगर पुन्हा नाही दिसायचे झुळझूळत्या झर्यात पुन्हा कधी डुंबायाचे? कैक वर्षांचा शिरस्ता बघा आता चुकणार मने ताजी करणारी यात्रा नाही घडणार आता शेवटची खेप द्याया तिला तिलांजली कोकणची माती आता लागणार नाही भाळी योग सरता भेटीचा कधी भेटते का कोणी आता राहतील फक्त कोकणच्या आठवणी :जयंत खानझोडे

माय

हंबरून वासराले चाटती जवा गाय तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय आयाबाया सांगत व्हत्या व्हतो जवा तान्हा दुस्काळात मायेच्या माजे आटला व्हता पान्हा पिठामंदी पानी टाकून पाजत जाय तवा मले पिठामंदी दिसती माझी माय कन्या-काट्या येचायाला माय जाई रानी पायात नसे वहान तिच्या फिरे अनवानी काट्याकुट्यालाही तिचं नसे पाय तवा मले काट्यामंदी दिसती माझी माय बाप माझा रोज लावी मायच्या मागं टुमनं बास झालं शिक्षान आता घेऊ दे हाती काम शिकुनश्यानं कुठं मोठ्ठा मास्तर हुनार हायं तवा मले मास्तरमंदी दिसतो माझी माय दारु पिऊन मायेले मारी जवा माझा बाप थरथर कापे आन लागे तिले धाप कसायाच्या दावनीला बांधली जशी गाय तवा मले गायीमंदी दिसती माझी माय बोलता बोलता येकदा तिच्या डोळा आलं पानी सांग म्हने राजा तुझी कवा दिसंल रानी भरल्या डोल्यान कवा पाहील दुधावरची साय तवा मले सायीमंदी दिसती माझी माय म्हनून म्हंतो आनंदानं भरावी तुझी वटी पुना येकदा जलम घ्यावा तुजे पोटी तुझ्या चरनी ठेवून माया धरावं तुझं पाय तवा मले पायामंदी दिसती माझी माय‍ : नारायण सुर्वे

देणे

सरी श्रावणाच्या येती शेला पाण्याचा उडतो पंखा उन्हाचा मधून थोडा थोडा उमलतो चिंब भिजून कर्दळ लाल फुलांनी पेटते ओल्या आगीत फुलांच्या शीळ साळुंकी पेरते मग कलत्या उन्हात होते आभाळाचे गाणे जेथे संपून उरते उभ्या जन्माचे या देणे : वा. रा. कान्त

बोलली अबोली

बोलली अबोली ग बोलली अबोली काय होते पोटात आज आले ओठात असा होता निर्धार नाही काही बोलणार परी होता अनिवार बोलली अबोली .... बोलता परी तिला समजुनी गेले आपले आहे काहीतरी चुकले.... सारे पाणी गेले पालथ्या घड्यावरी तरी करुनी निर्धार बोलली अबोली ग बोलली अबोली अबोलीचे बोल लागले जिव्हारी परी नव्हते तिला त्याचे ग काही तिच्या त्या जखमा वहाती भळाभळा त्यांची न होई जाण कुणा... बोलली अबोली ग बोलली अबोली :सुनील जोशी

आमच्या मरणाचा सोहळा

कस सांगू कसा सोसावा, दुष्काळांचा उभा उन्हाळा कस सांगू कसा सरावा, महापुरांचा निर्दय पावसाळा किड्या-मुंगीच जगण आमच, कसही मारा कितीही वेळा इथे रोज घडे आमच्या....आमच्या मरणाचा सोहळा सर झडे घामाची, पाउस तरी येईना भेगाळल्या भूईची या, तहान परी भागेना भूक मारी पोट अन, पीळ आतडीचा सुटेना बाया-पोरांच्या पायी हे, आयुष्यही संपवेना विस्कटला संसार सारा, आयुष्याचा चोळा-मोळा इथे रोज घडे आमच्या....आमच्या मरणाचा सोहळा बाळगला उरी अंधार, आता प्रकाश काही दिसेना उजाडावी कशी पहाट, काळी रात ही सरेना करपल्या पायांचा मग, जाळ तो सुटेना अंग जाळी दिस अन, राती झोप येईना कधी चिंता मिटून साऱ्या, लागणार सुखान हा डोळा इथे रोज घडे आमच्या....आमच्या मरणाचा सोहळा जगण झाल महाग तरी, मरण देव देईना भिकार उपेक्षित लेकराची परी, दया त्याला येईना तिरडी झाली लाचार अन, खांदा कुणी देईना अखेरच्या वाटेवरही कुणी, साथ द्याया उरेना जितेपणीच लचक तोडाया, बघ गिधाड झाली गोळा इथे रोज घडे आमच्या....आमच्या मरणाचा सोहळा

जुनीच पत्र

जुनीच पत्र पुन्हा पुह्ना ................ वाचत असतं कुणीतरी दिवे सगळे विझल्यावर ................. जळत असतं कुणीतरी अशांत खिडकीत चंद्र होऊन, टपटपण्यात मजा आहे. कुणीतरी ऐकत असं दिठीतून, म्हणून तर गाण्यात मजा आहे : प्रवीण दवणे

पाऊस

............केव्हा पाऊस जीवल्गासारखा वेल्हाळ होतो , हवा तेव्हा येत नाही . डोळे पार शिनावतो, मनाच्या मातीला तडे पडतात , आतला टाहो पार गगनाला भिडतो अन हे सगळ विरहकाव्य सोसून झाल्यावर ....... ओलसर वारे वाहू लागतात न ' तो येतोय' याची ललकारी देऊ लागतात , अन 'तो येतोय ' याची ललकारी देऊ लागतात , अन तो येतो ......... अशा पावसाच स्वागत कवी अनिलांच मन कस करत ? असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा टिपून ल्यावा पापण्यांवरती कपालीच्या घामामध्ये मिळवावा . : प्रा. प्रवीण दवणे

भोवरा

विरहाची आर्तता जितकी आर्त तितक मन अन्न्याशारण होत , स्वतःच्याच पायाशी बसत : अगदी साधसुध होऊन जात. न कुणाशी लढ्न्याच बळ , न तक्रार करण्याच न जगण्याच ! विरह मनाला पार पार अगतिक करतो . एकच शोध...... एकंच ओढ........ जिवलग कुठाय ? पण तेच तर ठाऊक नाहीये न आता आठवनिसाठीही बळ नाहीये, इंदिराबैच्या ' भोवरा' मधून हेच अगतिक आर्तपण प्रतीत होत कशी हाक घालू तरी कुठे आहेस कळे ना ; पडसाद उठे लाख तुझी साद उमटेना कशी तुला शोधू तरी कुठे आहेस दिसेना डोळ्यांतली काळी झेप तुझ्यापर्यंत पोचेना कसे तुला मी आठवू आठवाया नाही बळ मीच बुडाले माझ्यात भोवरयाची ओढ खो ल

चिंब

माणसाला , प्रत्येक माणसाला एक ठिकाण हवं असतं हरवून जाण्यासाठी . व्यवहारी जगातली सारी प्रतिष्ठेची उंची हे एक प्रकारचं ओझं असतं पाठीवरचं.ते ओझं फ़ेकुन खुप लहान व्हावं असं एक ठिकाण हवं असतं माणसाला .बक्षिसाची रंगीत जादू मिरवत आणण्यासाठी त्यात एक घर हवं असतं आणि त्या घरातही एक स्पर्श हवा असतो की,जो क्षणात माणसाचा भरजरी मोर करुन टाकतो. आपल्या पुढे काळ ही पिसं जपून ठेवतो.त्या पिसांमधले निळे-जांभले डोह आपल्याला व्याकूळ करत असतात . पुस्तकाच्या आवडत्या कवितेच्या कुशीत पहुडलेल्या या रेशीमखुणा आपण एकटे असताना बोलक्या होतात .एकेका शब्दागणिक आषाढाचा भरलेला मेघ घेउन येतात आणि रसरंगाच्या पावसात आपण चिंब होतो : प्रविण दवणे

निर्झर

क्षण येतात- क्षण जातात ; पण येणारा प्रत्येक क्षण क्षणाला विचारतो,काय दिलंस तू गेलेल्या क्षणांना ? काही वाचलं ? पाहीलं, एकलं, समोरच्या एका -फ़क्त एका हुंदक्याला थोपाटलसं ? विश्वासाचा हात सहजतेनं दिलास ? प्रत्येक क्षण नव्या क्षणाला विचारत राहतो. नाही उत्तर मिळालं की हिरमुसतो. ' नव्या अथक प्रयत्नांनी पुन्हा आयुष्य सुंदर करणार ’ असं नुसतं मनात उच्चारा,चैत्रबीजांची अंकुरती सळसळ तुम्हाला ह्र्दयात जाणवेल. प्रकाशात्मक निश्चयातच नव्या उर्जेचे असंख्य निर्झर आहेत : .........प्रवीण दवणे

या झोपडीत माझ्या

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥१॥ भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥२॥ पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या॥३॥ जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला भितीनं यावयाला, या झोपडीत माझ्या॥४॥ महाली माऊ बिछाने, कंदील शामदाने आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या॥५॥ येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या॥६॥ पाहून सौख्यं माझे, देवेंद्र तोही लाजे शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या॥७॥ : संत. तुकडोजी महाराज

आनंदयात्री मी आनंदयात्री

अफाट आकाश हिरवी धरती पुनवेची रात सागर-भरती पाचूंची लकेर कुरणाच्या ओठी प्रकाशाचा गर्भ जलवंती-पोटी अखंड नूतन मला ही धरित्री आनंदयात्री मी आनंदयात्री मेघांच्या उत्सवीं जाहलों उन्मन दवांत तीर्थांचे घेतलें दर्शन दूर क्षितिजाची निळी भुलावण पाशांविण मला ठेवी खिळवून अक्षयवीणाच घुमे माझ्या गात्री आनंदयात्री मी आनंदयात्री हलके कढून कंटक पायींचे स्वरांत विणिले सर मीं स्वप्नांचे हासत दु:खाचा केला मी स्वीकार वर्षिलें चादंणें पिऊन अंधार प्रकाशाचें गाणें अवसेच्या रात्रीं आनंदयात्री मी आनंदयात्री. : मंगेश पाडगावकर

हा दीप तमावर मात करी

अंधार दाटला घोर जरी हा दीप तमावर मात करी पुसुनि आसवे हसुनि जरा बघ अनंत तार्याची वर झगमग ये परत, परत ये तुझ्या घरी अंधार दाटला घोर जरी हा दीप तमावर मात करी पिसाट वारे, वन वादळले सूड घ्यावया जळ आदळले ध्रुवतारा आहे अढळ तरी अंधार दाटला घोर जरी हा दीप तमावर मात करी घावावचुन नसे देवपण जळल्यावाचुन प्रकाश कोठुन? कां सांग निराशा तुझ्या उरी? अंधार दाटला घोर जरी हा दीप तमावर मात करी : मंगेश पाडगावकर

रात्रीं झडलेल्या धारांची

रात्रीं झडलेल्या धारांची ओल अजूनहि अंधारावर निजेंत अजुनी खांब विजेचा भुरकी गुंगी अन तारांवर भित्र्या चिमणीपरी, ढगांच्या वळचणींत मिणमिणे चांदणी मळक्या कांचेवरी धुक्याच्या वाऱ्याची उमटली पापणी कौलावरुनी थेंब ओघळे हळुच, सांचल्या पाण्यावरतीं; थेंब ध्वनीचा हवेंत झुलतो गिरकी घेऊन टांचेवरतीं गहिऱ्या ओल्या कुंदपणांतच गुरफटलेली अजुन स्तब्धता कबूतराच्या पंखापरि अन राखी...कबरी ही अंधुकता अजून आहे रात्र थोडिशी, असेल अधिकहि...कुणि सांगावें? अर्धी जाग नि अर्धी निद्रा इथेंच अल्गद असें तरावें! : मंगेश पाडगावकर

प्रीति हवी तर

प्रीति हवी तर जीव आधि कर अपुला कुरबान, प्रीति हवी तर तळहातावर घे कापुनि मान ! तलवारीची धार नागिणी लसलसती प्रीत, याद ठेव अंगार जगाला लाविल निमिषांत ! प्रीति निर्मिली तुला वाटते का दुबळ्यासाठी? प्रीतिदेवि जगदेकवीर जो जाय तयापाठी ! नव्हे प्रीतिला रंग लाविला लाल गुलाबांचा, परि रुधिराचा, धडधडणाऱ्या जळत्या जीवाचा. गुल गुल बोले प्रीति काय ती? काय महालांत? प्रीति बोलते काळ घालिता कलिजाला हात ! स्त्रैणपणाच्या चार भावना नच पचती ज्याला हीन जिवाने घेउ नये त्या जहरी प्याल्याला ! सह्य जिवाला होय जाहला जरि विद्युत्पात, परी प्रीतिचा घात भयंकर दुसरा कल्पांत ! जीवंतपणी मरण घेउनी फिरणे जगतात; साठविली ब्रम्हांडदाहिनी दाहकता यांत ! : बालकवी