Skip to main content

Posts

Showing posts from February, 2021

आवडीने भावे हरिनाम घेसी

  आवडीने भावे हरिनाम घेसी , तुझी चिंता त्यासी सर्व आहे || १ || नको करू खेद कोणत्या गोष्टीचा | पती लक्ष्मीचा जाणतसे || २ || सकळ जीवांचा करितो सांभाळ | तुज मोकलिल ऐसे नाही || ३ || जैसी स्थिती आहे तैशापरी राहे | कौतुक तू पाहे संचिताचे || ४ || एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा | हरिकृपे त्याचा नाश झाला || ५ || : संत एकनाथ 

ब्रम्हा विष्णू आणि महेश, सामोरी बसले

  ब्रम्हा विष्णू आणि महेश , सामोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले || धृ ||   माय उभी हि गाय होवुनी , पुढे वासरू पाहे वळूनी कृतज्ञेतेचे श्र्वान बिचारे पायावर झुकले || १ ||   चरण शुभंकर फिरता तुमचे , मंदिर बनले उभ्या घराचे घुमटा मधुनी हृदय पाखरू , स्वानंद फिरले || २ ||   तुम्हीच केली सारी किमया , कृतार्थ झाली माझी काया तुमच्या हाती माझ्या भवती , औदुंबर बसले || ३ ||

निष्प्रेम

 आता नसून आहे , तेव्हा तुला नकोसे  शृंगारसाज झाले आताच का हवेसे ?  तेव्हा असून बाग नव्हता फुलांस गंध ,  हृदयास का धरावे गजरे अतास बासे ? तेव्हा असून आग तापू दिली न तयार ,  आता जीवास मार देतेस का मुकेसे? तेव्हा असून सज्ज खेळू दिले न रंग ,  आता उदास होशी काळ्यानिळ्या प्रकाशे ? पाऊस श्रावणाचा तेव्हा उन्हास येतां  गेलीस कोरडी कां होऊन कां असेसे ? कंठात चातकाची तेव्हा तहान होती ,  डोळ्यात मीठपाणी आत्ता कशास ऐसें ? आता नसून आहे , तेव्हा असून नव्हतो,  सलगी कशास आता ? निष्प्रेम हे उसासे ! : निष्प्रेम  :नक्षत्रांचे देणे  : आरती प्रभू 
disawar satta king