काही बोलायचे आहे पण बोलणार नाही देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे पण पाकळी त्याची कधी खुलणार नाही नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गुज परी अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही मेघ जांभळा एकाला राहे नभाच्या कडेला त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही दूर बंदरात उभे एक गलबत रुपेरी त्याचा कोष किनाऱ्यास कधी दिसणार नाही तुझ्या कृपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी त्याच्या नीखारयात कधी तुला जाळणार नाही