Skip to main content

Posts

Showing posts from November, 2015

गगनि उगवला सायंतारा

बैस जवळि ये , बघ ही पश्चिम कोमल रंगी फुलली अनुपम ये नेत्री ते घेउ साठवुनि गालावरती गाल ठेवुनी गगनि उगवला सायंतारा उदासीनता विसर जगाची तुझाच मी , तू माझि सदाची विरले हृदयांतरि , बघ अंतर तू अणिक मी जवळ निरंतर ! गगनि उगवला सायंतारा : आ . रा . देशपांडे ’ अनिल ’

जीवन त्यांना कळले हो…

जीवन त्यांना कळले हो … मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तेथे मिळले हो चराचराचे होऊनी जीवन स्नेहासम पाजळले हो सिंधुसम हृदयात जयांच्या रस सगळे आकळले हो आपत्काली अन दीनांवर घन होऊनी जे वळले हो दुरित जयांच्या दर्शनमात्रे मोहित होऊनी जळले हो पुण्य जयांच्या उजवडाने फुलले अन परिमळले हो सायासावीन ब्रह्म सनातन घरीच ज्या आढळले हो उरीच ज्या आढळले हो ! :   बा . भ . बोरकर

तू येशील म्हणून मी वाट पहातो आहे

तू येशील म्हणून मी वाट पहातो आहे , ती ही अशा कातर वेळी , उदाच्या नादलहरी सारख्या संधी प्रकाशात … माझी सर्व कंपने इवल्याशा ओंजळीत जमा होतात …. अशा वेळी वाटेकडे पाहाणे , सर्व आयुष्य पाठीशी बांधून एका सूक्ष्म लकेरीत तरंगत जाणे ; जसे काळोखातही ऎकू यावे दूरच्या झऱ्याचे वहाणे …. मी पहतो झाडांकडे , पहाडांकडे , तू येशील म्हणून अज्ञाताच्या पारावरती एक नसलेली पणती लावून देतो ….. आणि आई नसलेल्या पोरासारखे हे माझे शहाणे डोळे , हलकेच सोडून देतो नदीच्या प्रवाहात … : संध्याकाळच्या कविता : ग्रेस

आज उदास उदास दूर पांगल्या साउल्या

आज उदास उदास दूर पांगल्या साउल्या एकांताच्या पारावर हिरमुसल्या डहाळ्या काही केल्या करमनां , कसा जीवच लागंना बोलघेवडी साळुंकी , कसा शब्द ही बोलंना असा रुतला पुढ्यात भाव मुका जीवघेणा चांदण्याची ही रात , रात जळे सुनी सुनी निळ्या आसमानी तळ्यांत लाख रूसल्या ग गवळणी दूर लांबल्या वाटेला रूखी रूखी टेहाळणी दूर गेले घरधनी बाई , दूर गेले धनी : ना . धों . महानोर

लागेल जन्मावें पुन्हां

माझी न घाई कांहिही , जाणून आहे अंतरी , लागेल जन्मावें पुन्हां नेण्या तुला मझ्या घरी . तूं झुंजुमुंजू हासशी , जाईजुईचें लाजशी ; मी वेंधळा मग सांडतॉ थोडा चहा बाहीवरी . तूं बोलतां साधेसुधें सुचवुन जाशी केवढें , मी बोलतो वाचाळसा अन् पंडीती कांहीतरी . होशी फुलासह फूल तूं अन् चांदण्यासह चांदणे , – तें पाहणें , इतकेंच मी बघ मानलें माझ्या करीं . म्हणतेस तूं , ” मज आवडे रांगडा सीधेपणा !” विश्वास मी ठेवूं कसा या हुन्नरी शब्दावरीं . लिहिती बटा भालावरी ऊर्दु लिपींतिल अक्षरें ; हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी . – विंदा करंदीकर

भुतावळ

किर्र रात्री सुन्न रात्री झर्र वारा भुर्र पानी ; शार वाडा गार भिंती , दार त्याचे हस्तिदंती . कोण आले ? कोण आले ? दार आपो - आप खोले ! आली आली भुताबाई ; तीन माणसे रोज खाई स्मशानामध्ये घालते फेरी पहाटेपूर्वी करते न्हेरी न्हेरीसाठी होतात चट्ट दोन पोरे लठ्ठ मठ्ठ पण प्रत्येक एकादशीस रताळ्याचा खाते कीस . किर्र रात्री सुन्न रानी झर्र वारा भुर्र पानी ; शार वाडा गार भिंती दार त्याचे हस्तिदंती . कोण आले ? कोण आले ? दार आपोआप खोले ! आला आला महासमंध ; त्याची चाल संथ संथ त्याची उंची दहा फूट अंगावरती काळा सूट , डोक्यावरती हँट बीट , तुम्ही फसाल ! पहा नीट वळवळणारे गळ्यात काय ? नागोबाचा लंबा टाय ! किर्र रात्री सुन्न रानी झर्र वारा भुर्र पानी ; शार वाडा गार भिंती , दार त्याचे हस्तिदंती . कोण आले ? कोण आले ? दार आपोआप खोले ! आले आले थातूमातू ; खाते सातू जर सातू नसले घरात तर बसते नखे खात . रोज रात्री मांजरावरुन हे येते जग

परयांच्या गप्पा

जाईतून गेली जुईतून गेली ही काय चालण्याची रीत का झाली ? पाचूचं बेट गाठलंन थेट तिथं तरी त्याची झाली का भेट ? सगळीकडे हेच दुसऱ्यांना पेच धुक्यातून गेलं कि दवाची ठेच : परयांच्या गप्पा : विं   दा करंदीकर

तू बोलत नाहीस

तू बोलत नाहीस .. .. .. त्यातून मी एक अलाहिदा अर्थ काढला त्याचीच ही गाणी झाली , काही कहाण्या , एक - दोन अनोळखी संवाद , अर्धेमुर्धे दर्शन .. मग मला समजले हेच तुझे बोलणे होते .. सहज मनमोकळे , पहाटेच्या अरुवारीचे . ~ पु . शि . रेगे