अरे ,वेड्या सोनचाफा , काय तुझा रे बहर : नाही पाहिलीस माझी चाफेकळी सोनगौर ! आणि तूही पारिजाता , किती आरास मांडली : खुदूखुदू हासणारी नाही पाहिलीस बाळी ! बहरला आज दोघे : हासू आले आठवून … कितीवेळा मी दोघांची द्रुष्ट टाकिली काढून ! रुख्याफिक्या बहराला गेले होते मी भाळूनी ; कुठे चाफा - पारिजात , कुठे माझी पुष्पराणी ! एक हाती सोनचाफी , एक हाती पारिजात लक्ष मुठी ओवाळल्या तिची काढावया द्रुष्ट!!!!! : अरे ,वेड्या सोनचाफा : रंगबावरी : इंदिरा संत