Skip to main content

Posts

Showing posts from July, 2014

सारा स्वार्थाचा गलबला

सारा स्वार्थाचा गलबला भाऊबंध झाले गोळा आणि पसार होताना संसाराचा चोळामोळा जीवानाची टांगाटोळी किती सोसू कशी सोसू ? डोळे जाळून पापण्या आता उरले ना आसू मळा बहराला यावा तेव्हा चेकुट काढले वाळवंटाच्या वाटांशी घर मोडीत निघाले अवघे आयुष्य देतांना काही राहिले न देवा तुझ्या अस्तित्वाच्या ठायी आता देई गा विसावा : पानझड : ना . धों   .

मन

मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर किती हाकलं हाकलं फिरी येते पिकावर मन मोकाट मोकाट त्याले ठायी ठायी वाटा जशा वाऱ्यान चालल्या पान्यावर्हल्यारे लाटा मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोन उंडारल उंडारल जस वारा वाहादन मन जह्यरी जह्यरी याच न्यार रे तन्तर आरे इचू साप बरा त्याले उतारे मन्तर मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात आता व्हत भुइवर गेल गेल आभायात मन चप्पय चप्पय त्याले नही जरा धीर तठे व्हयीसनी ईज आलं आलं धर्तीवर मन एव्हड एव्हड जस खाकसचा दाणा मन केवढ केवढ ? आभायात बी मायेना देवां , कसं देलं मन आस नही दुनियात आसा कसा रे तू यॊगि काय तुझी करामत ! देवा आस कस मन आस कस रे घडल कुठे जागेपनी तुले अस सपन पडल ! : बहिणाबाई चौधरी

संवाद

उन्हे ओली सांज भोळी डोळे डोळ्यांचे मागणे कळलेले जुळलेले मौन फुलांचे सांगणे नभ भोर चंद्र कोर जळी आभाळ वाहते कुणी तरी कोठे तरी उगी जीवास वाहते ! : संवाद : भटके पक्षी : मंगेश पाडगावकर

रंध्रात पेरिली मी आषाढ दर्द गाणी

रंध्रात पेरिली मी आषाढ दर्द गाणी उन्मादल्या सरींची उमजून घे कहाणी पुसणार तू कुणाला मिटलीत सर्द दारे धारांत नाहणारी धरतीच गे ईमानी पानातुनी मनाच्या माझेच हे शहारे मातीत मातलेला आवेगही तुफानी सोसून सोसवेना गात्री अलक्ष्य धारा प्राशून पाप येते डोळ्यांत मूढ पाणी प्राणांत हूड वारे हलतेच झाड आहे त्यानीच ढाळलेली तू माळिली विराणी

तळ्याकाठी

अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते जिथे शांतता स्वत : च निवारा शोधीत थकून आली असते जळाआतला हिरवा गाळ निळ्याशी मिळून असतो काही गळून पडत असताना पान मुळी सळसळ करीत नाही सावल्यांना भरवीत कापरे जलवलये उठवून देत उगीच उसळी मारून मासळी मधूनच वर नसते येत पंख वाळवीत बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो दूर कोपर्यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो हृदयावरची विचाराची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते ! :  तळ्याकाठी - अनिल

जोगवा

इथे आलो होतो        मागाया जोगवा आयुष्याचा ठेवा       तुझ्या दारी जाईचा मांडवा       कारल्याचे वेल संसाराची सल       कशी सांगू ? विधिनिषेधाची      झाली दाटादाटी मनाची झिंजोटी     कोणा सांगू ? कशासाठी देवां       दयावा दोष कोणा आपुला परगणा     दुष्काळाचा असो सोबतीला     तुक्याचा अभंग हाचि अंगसंग        कैवल्याचा माझी दुबळ्याची      होवो आठवण कधी सोडवण          करा देवा : पानझड : ना . धों .

HFD wedu :)

  tera mera manva kaise ek huye re tera mera manva kaise ek huye re mai kahta tu jagat rahiyo mai kahta tu jagat rahiyo tu rehta hai soyi re tera mera manva kaise ek huye re tera mera manva kaise ek huye re mai nirmohi rahiyo tu jata hai mohi re mai nirmohi rahiyo tu jata hai mohi re jugat jugat samjhvat mana kahi amanat soi re jugat jugat samjhvat mana kahi amanat soi re tera mera manva kaise ek huye re tera mera manva kaise ek huye re mai kahta aankhan dikhi tu kahta sagar ki dekhi mai kahta aankhan dikhi tu kahta sagar ki dekhi mai kahta surjavan hari mai kahta surjavan hari tu rakho urjai re tera mera manva kaise ek huye re tera mera manva kaise ek huye re satguru dara nirmal vaha vah me kaya dhoyi re satguru dara nirmal vaha vah me kaya dhoyi re kahat kabir suno bhai sado kahat kabir suno bhai sado tab hi vyatha hoyi re tera mera manva kaise ek huye re tera mera manva kaise ek huye re

ते किती लपवले तरिही

ते किती लपवले तरिही मज नकळत कळते कळते पाकळ्यात दडले तरिही गन्धातून गूढ उकलते मातीत गाढ निजलेले जरि बीज न नयना दिसते घन वळता आषाढाचे मज नवखी चाहूल येते रात्रीच्या घन अन्धारी जरि गहनच सगळे असते ते निःशब्दाचे कोडे मज नक्शत्रान्तून सुटते श्रावणात चित्रलिपीचे जरि अर्थ न कळति पुरते तरि ऋतुचक्रापलिकडचे प्राणात उमलते नाते लहरीन्तून थरथरणार्या जरि भुलवित फ़सवित पळते पावसात उत्तररात्री मज अवचित लय उलगडते प्रतिबिम्बच अस्फ़ुट नुसते जरि शब्दातुन भिरभिरते मौनात परि ह्रदयीच्या कधी पहाट होऊनी येते दुरात पलीकडे जेव्हा ह्ळू गगन धरेला मिळते ते अदभूत मज कळल्याची वेदनाच नुसती उरते ते किती लपवले तरिही मज नकळत कळते कळते पाकळ्यात दडले तरिही गन्धातून गूढ उकलते