Skip to main content

Posts

Showing posts from 2021

प्रिय लिखकर....

 प्रिय लिखकर....  नीचे लिखदू नाम तुम्हारा  कुछ जगह बीचमे छोड ... नीचे लिखदू सदा तुम्हारा  लिखा बीचमे क्या ? ये तुम्हे पढना हैं  कागजपर मनकी भाषाका अर्थ समाजना हैं  जो भी अर्थ निकालोगी तुम ... वो मुझको स्वीकार हैं  झुके नैन , मौन अधर , कोरा कागज ... अर्थ सभिका प्यार हैं !!!!

अस्तानंतर

जाणतो मी अस्तकाली  या नभाचे सत्व सारे  मावळे सूर्यासवे .  जाणतो की धूसरावर  वाहती खग सांजवेळी  ती नभाची असावे.  गर्द झाडांच्या तळाशी  सावल्या हलती , नभाच्या  भितीचे थरकाप ते .  वादळे करती जळावर  वा गुहेतून नाद भीषण  हुंदके आलाप ते.  जाणतो या मद्यरात्री  जी तमावर प्रकट होते  तारकांची संपदा.  या नभाचा या तमाचा  तो प्रकाशाशी उद्याच्या  एक दुर्दम वायदा .  : अस्तानंतर  : छंदोमयी  : कुसुमाग्रज    

तुझ्या भेटीलागी

 तुझ्या भेटीलागी  सिद्धता हो सांग  मृत्तिकेचे पांग  तोडले मी ।। अहंतेचे ऐने  सौहृदाचे आर्त  जुन्या बाजारात  लिलावाले ।। लक्ष संबंधाचे  खणले तणाव  उध्वस्थ पाडाव  धरेवर ।। कीर्द खतावण्या  सोडल्या पाण्यात  राखल्या गाण्यात  नोंदी काही ।। घेणे होते थोडे  देण्यास न पार  निर्लज्ज नादार  जाहलो मी ।। दिवाळखोरीचा  देहलीला दीप  तेजाची तिरीप  तेवढीच ।। चंद्राचे शारद सूर्याचे दहन  केले विसर्जन  नभामाजी ।। आकाशगंगेत  पृथ्वीवर बया  माती गेली न्हाया  आणली ती ।। जिन्याच्या कुटाशी  केली झटापट  त्याचे वायफट  केरामद्ये ।। देहतेचे  सौध  मनाची गोपुरे  लाल बंदीघरे  वासनांची ।। त्यांच्याही दाराशी  राजीनामा दिला  सहीशिक्का केला  करारास ।। पावसाळी घना - परी पूर्ण आता  होऊनिया रिता  थांबलो मी ।। बिस्मिलाच्या फक्त  सनईचे स्वर  काही बरोबर  घेऊ द्यावे ।। : भेटीलागी  : छंदोमयी  : कुसुमाग्रज 

डोळ्यापरीस लहान

डोळ्यापरीस लहान  आज वाटते आकाश  रात्र -दिवसाचा काळ  झाला निमिष निमिष  मन सुटून चालले  शरीराच्या मिठीतून : विश्वापल्याडचे काहीं  काय गेले त्या स्पर्शून ?  : डोळ्यापरीस लहान  : रंगबावरी  : इंदिरा संत 

भातुकली

 आज रुसले आकाश  मुळी पाहीना वाकून ,  आज रुसलाही वारा :  पोर बसलें दाटून .  उन्हें बसली हटून  अंधाराच्या कोपऱ्यात ,  रागावल्या चंद्रम्याने  केला गट्टी फुचा बेत.  मन मुळीच रमेना  तुम्हा साऱ्यांच्या संगती :  संपविली भातुकली  म्हणूनच हातोहातीं;  मांडलेला खेळ आता  आता हवाच मोडाया :  जोडलेली नाती आता  आता हवीत तोडाया.  : भातुकली  : रंगबावरी  : इंदिरा संत 

ओठांतून गेला शब्द

ओ ठांतून गेला शब्द ,  गेली वाक्यें एकाएकीं ..... काय होते मी माझ्याशी  अशी बोलत सारखी ! एका व्याकुळ लाटेने  गेले सर्वस्व धुवून :  तेजसरल्या वातीची  गळे काजळी गोठून ! भिंती गेल्या दूरदूर :  किती स्फुंदले स्फुंदले ;  आज एकटेपणाने  मला शेवटी जिंकले ! : ओठांतून गेला शब्द : रंगबावरी  : इंदिरा संत 

माँ

  मैंने रोते हुए पोंछे थे किसी दिन आँसू मुद्दतों माँ ने नहीं धोया दुपट्टा अपना लबों पे उसके कभी बद्दुआ नहीं होती बस एक माँ है जो मुझसे ख़फ़ा नहीं होती अब भी चलती है जब आँधी कभी ग़म की ‘राना’ माँ की ममता मुझे बाहों में छुपा लेती है मुसीबत के दिनों में हमेशा साथ रहती है पयम्बर क्या परेशानी में उम्मत छोड़ सकता है जब तक रहा हूँ धूप में चादर बना रहा मैं अपनी माँ का आखिरी ज़ेवर बना रहा किसी को घर मिला हिस्से में या कोई दुकाँ आई मैं घर में सब से छोटा था मेरे हिस्से में माँ आई ऐ अँधेरे! देख ले मुँह तेरा काला हो गया माँ ने आँखें खोल दीं घर में उजाला हो गया इस तरह मेरे गुनाहों को वो धो देती है माँ बहुत ग़ुस्से में होती है तो रो देती है मेरी ख़्वाहिश है कि मैं फिर से फ़रिश्ता हो जाऊँ माँ से इस तरह लिपट जाऊँ कि बच्चा हो जाऊँ हादसों की गर्द से ख़ुद को बचाने के लिए माँ ! हम अपने साथ बस तेरी दुआ ले जायेंगे ख़ुद को इस भीड़ में तन्हा नहीं होने देंगे माँ तुझे हम अभी बूढ़ा नहीं होने देंगे जब भी देखा मेरे किरदार पे धब्बा कोई देर तक बैठ के तन्हाई में रोया कोई यहीं रहूँगा कहीं उम्र भर न जाउँगा ज़मीन माँ है

आवडीने भावे हरिनाम घेसी

  आवडीने भावे हरिनाम घेसी , तुझी चिंता त्यासी सर्व आहे || १ || नको करू खेद कोणत्या गोष्टीचा | पती लक्ष्मीचा जाणतसे || २ || सकळ जीवांचा करितो सांभाळ | तुज मोकलिल ऐसे नाही || ३ || जैसी स्थिती आहे तैशापरी राहे | कौतुक तू पाहे संचिताचे || ४ || एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा | हरिकृपे त्याचा नाश झाला || ५ || : संत एकनाथ 

ब्रम्हा विष्णू आणि महेश, सामोरी बसले

  ब्रम्हा विष्णू आणि महेश , सामोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले || धृ ||   माय उभी हि गाय होवुनी , पुढे वासरू पाहे वळूनी कृतज्ञेतेचे श्र्वान बिचारे पायावर झुकले || १ ||   चरण शुभंकर फिरता तुमचे , मंदिर बनले उभ्या घराचे घुमटा मधुनी हृदय पाखरू , स्वानंद फिरले || २ ||   तुम्हीच केली सारी किमया , कृतार्थ झाली माझी काया तुमच्या हाती माझ्या भवती , औदुंबर बसले || ३ ||

निष्प्रेम

 आता नसून आहे , तेव्हा तुला नकोसे  शृंगारसाज झाले आताच का हवेसे ?  तेव्हा असून बाग नव्हता फुलांस गंध ,  हृदयास का धरावे गजरे अतास बासे ? तेव्हा असून आग तापू दिली न तयार ,  आता जीवास मार देतेस का मुकेसे? तेव्हा असून सज्ज खेळू दिले न रंग ,  आता उदास होशी काळ्यानिळ्या प्रकाशे ? पाऊस श्रावणाचा तेव्हा उन्हास येतां  गेलीस कोरडी कां होऊन कां असेसे ? कंठात चातकाची तेव्हा तहान होती ,  डोळ्यात मीठपाणी आत्ता कशास ऐसें ? आता नसून आहे , तेव्हा असून नव्हतो,  सलगी कशास आता ? निष्प्रेम हे उसासे ! : निष्प्रेम  :नक्षत्रांचे देणे  : आरती प्रभू 

बहरला पारिजात दारीं

 बहरला पारिजात दारीं  फुले का,  पडती शेजारी ?  माझ्यावरती त्यांची प्रीती  पट्टराणी जण तुला म्हणती  दुःख हें , भरल्या संसारी ! ।। असेल का हें नाटक त्यांचे ,  मज वेडीला फसवायचे ? कपट कां , करिती चक्रधारी ? ।। वारा वाही जगासारखा  तिलाच झाला पाठीराखा  वाहतो , दौलत तिज सारी ! ।। : गदिमा  : निवडक गदिमा  : संपादक : वामन देशपांडे 

विठ्ठलाचे पायीं ,

 विठ्ठलाचे पायीं , थरारली वीट  राउळींची घाट , निनादली ।। ज्ञानोबाच्या दारीं , शरारे पिंपळ  इंद्रायणी -जळ, खळाळलें  ।। उठला हुंदका , देहूच्या वाऱ्यात  तुका समाधीत , चाळवला ।। सज्जनगडात , टिटवी बोलली  समाधी हालली,  समर्थांची ।। एका ब्राम्हणाच्या , पैठणीपुरीत  भिजे मध्यरात्र , आसवांनी ।। चालत्या गाडीत , सोडून पार्थिव  निघाला वैष्णव , वैकुंठासी ।। संत - माळेतील, मणी शेवटला  आज ओघळला , एकादशी ।। : ग दि मा  : निवडक गदिमा  : संपादन : वामन देशपांडे 

सुधागड

 किल्ला : सुधागड  जिल्हा : रायगड  डोंगररांग : लोणावळा  श्रेणी : सोपी  जाण्यासाठी लागणारा वेळ : धोंडसे गावातून अडीज तास ,  ठाकूरवाडी मार्गे दीड तास  दिनांक : २५/०८/२०१३, २८/०२/२०१६, ०५/१२/२०२०
disawar satta king