Skip to main content

Posts

Showing posts from March, 2022

सनई

 दूर दूर धुक्यांतून  येते सनई मंजुळ :  मावळत्या चंद्रम्याचा  एक किरण कोमळ  दूर दूर धुक्यांतून  येते सनई मंजुळ :  फुलातुळशीचा गंध ,  वाहे गंधाचा ओघळ ! दूर दूर धुक्यांतून  येते सनई मंजुळ :  गार मोगरीदवाची  माळ गुंफिली सुढाळ ! दूर दूर धुक्यांतून  येते सनई मंजुळ :  दुलईच्या उबेतून  जाग उमलत येई ! अशी जेव्हा येते जाग  माझा भाग्यकाळ येतो :  माझा अवघा दिवस  जाईजुईतून गातो ! : सनई  : रंगबावरी  : इंदिरा संत 
disawar satta king