वेड आधी सांग कोणी लाविले? आणि डोळा गुज कोणी दाविले नेणता पक्षी मला पाहुनी तू भोवती जाले खुभीने टाकिले शीळ ती अद्यापि या कानी घुमे ज्या शिळेने प्राण माझे ओढिलें पार गेली मोकळीकीची स्मृती पाठ दास्याचे तुवा जेव्हा दिले मी ममत्वे रंगलो गेही तुझ्या मी न जाई पाश होताही ढिले आणि आत्ता पारख्या सृष्टीत या का मला वाऱ्यावरी तू सोडिले ? काय राने पाचूची आत्तां मला ? काय हे आकाश मौजेचे निळे ? : माधव ज्युलिअन