दोन ध्रुवांवर दोघे आपण तू तिकडे अन् मी इकडे वाऱ्यावरती जशी चुकावी रानपाखरे दोहिकडे दिवस मनाला वैरि भासतो तारा मोजित रात गुजरितो युगसम वाटे घडीघडी ही कालगती का बंद पडे ? वसंतासवे धरा नाचते तांडव भीषण मज ते गमते गजबजलेल्या जगात जगतो जीवन एकलकोंडे नि:श्वसिते तव सांगायाला पश्चिमवारा बिलगे मजला शीतल कोमल तुझ्या करांचा सर्वांगी जणु स्पर्श घडे स्मृति-पंखांनी भिरभिर फिरते प्रीतपाखरू तुझ्याच भवते मुक्या मनाचे दु:ख सागरा सांग गर्जुनी तू तिकडे तोच असे मी, घर हे तेही तोच सखी, संसार असेही तुझ्यावाचुनी शून्य पसारा प्राण तिथे अन् देह इथे