Skip to main content

Posts

Showing posts from October, 2009

मन मनास उमगत नाही

मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा? स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा? मन थेम्बान्चे आकाश, लाटांनी सावरलेले मन नक्षत्रांचे रान, अवकाशी अवतरलेले मन गरगरते आवर्त, मन रानभूल, मन चकवा, मन कालोखाची गुंफा, मन तेजाचे राउळ, मन सैतानाचा हात, मन देवाचे पाउल, दुबल्या गळक्या झोळीत हां सूर्य कसा झेलावा? चेहरा- मोहरा याचा, कधी कोणी पाहिला नाही धनि अस्तित्वाचा तरीही, याच्याहुन दूसरा नाही, या अनोळखी नात्याचा कुणी कसा भरवसा द्यावा? मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा? स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा? : सुधीर मोघे