Skip to main content

Posts

Showing posts from January, 2019

शपथ तुला आहे

दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे  मनातल्या मोरपिसाची , शपथ तुला आहे  बकुळीच्या झाडाखाली , निळ्या चांदण्यात हृदयाची ओळख पटली , सुगंधी क्षणांत त्या सगळया बकुळ फुलांची , शपथ तुला आहे शुभ्रफुले वेचित रचिला , चांद तू जुईचा म्हणालीस , चंद्रोत्सव हा सावळया भुईचा फुलातल्या त्या चंद्राची , शपथ तुला आहे भुरभुरता पाऊस होता , सोनिया उन्हात गवतातून चालत होतो , मोहूनी मनात चुकलेल्या त्या वाटेची , शपथ तुला आहे हळूहळू काजळताना सांज ही सुरंगी तुझे भास दाटूनी येती , असे अंतरंगी या उदास आभाळाची , शपथ तुला आहे

आततायी अभंग

कारे नाडवीसी | आपुल्या मनासी ; पोषितो कुणासी ?| जगी कोण ? महारोग्यापोटी | पोरांची खिल्लारे ; जीवन तया रे | कोण देतो ? कोणे केली बाळा | दु:खाची उत्पत्ती वाढवी श्रीपती | पाप-पुण्य कोणी दिली भूक ? | कोणे दिले रोग? दारिद्र्याचे भोग दिले कोणी ? दु:खाच्या अनंता | भोगितो संसार ; येई भागाकार | आत्मरुपे. आत्म्याचे हे गुह्य | ब्रह्माला ना ठावे ; त्याच्या वंशा जावे | तेव्हा कळे. जन्माच्या प्रश्नाला | मृत्युचे उत्तर; देई विश्वंभर | दुजे काय? : विं दा करंदीकर

देता का थोडेसे शब्द उसने !!

सांगायला माझ्या जिवाचे दुखणे देता का थोडेसे शब्द उसने !! मी शब्द जपून वापरले कधीच केले नाहीत वायफळ खर्च तरीही आज मागावं लागतय कर्ज मी शब्दांची केली पूजा पण जेव्हा आला परतफेड करायचा मोका तेव्हाच नेमका दिला यांनी मला धोका आवडत नाही मला शब्दांचे रूसणे देता का थोडेसे शब्द उसने !! सुखात शब्द साथ देतात प्रेमातही बरोबर असतात आज दु : खातच शब्द तोटके पडले आज माझे मन एकटेच रडले गायला हे रडगाणे देता का थोडेसे शब्द उसने !! परत करीन मी तुम्हाला हे शब्द शब्द फुटत नाहीत , रडूच फुटतय शब्द गेल्यामुळे जीव तीळ - तीळ तुटतोय आज शब्दबध्द करायला रडणे देता का थोडेसे शब्द उसने !! – ग्रेस

आषाढबन

इथलेच पाणी, इथलाच घडा, मातीमध्ये – तुट्ला चुडा. इथलीच कमळण, इथलीच  टिंबे पाण्यामध्ये – फुटली बिंबे. इथलेच उ:शाप, इथलेच शाप, माझ्यापशी – वितळे पाप. इथलीच उल्का, आषाढ-बनात, मावलतीची – राधा उन्हांत. : ग्रेस

घडवीन असे मी वृत्त

घडवीन असे मी वृत्त प्राणांच्या अलगद खाली अन करीन पाऊस इथला शब्दांच्या पूर्ण हवाली . मावळत्या सूर्यफुलांचा तू गळ्यात घेशील हार खडकावर पडते जैसी अज्ञात जलाची धार : ग्रेस

कारे नाडवीसी | आपुल्या मनासी

कारे नाडवीसी | आपुल्या मनासी ; पोषितो कुणासी ?| जगी कोण ? महारोग्यापोटी | पोरांची खिल्लारे ; जीवन तया रे | कोण देतो ? कोणे केली बाळा | दु : खाची उत्पत्ती वाढवी श्रीपती | पाप - पुण्य कोणी दिली भूक ? | कोणे दिले रोग ? दारिद्र्याचे भोग दिले कोणी ? दु : खाच्या अनंता | भोगितो संसार ; येई भागाकार | आत्मरुपे . आत्म्याचे हे गुह्य | ब्रह्माला ना ठावे ; त्याच्या वंशा जावे | तेव्हा कळे . जन्माच्या प्रश्नाला | मृत्युचे उत्तर ; देई विश्वंभर | दुजे काय ? : विं दा करंदीकर 

आता उनाड शब्द वळावयास लागले

आता उनाड शब्द वळावयास लागले ! सारे लबाड अर्थ कळावयास लागले ! केले न मी उगीच गुन्हेगार सोबती आरोप आपसूक टळायास लागले ! आली पुन्हा मनात नको तीच चिंतने .. काही मवाळ चंद्र ढळायास लागले ! घायाळ मी असून रणी खूप झुंजलो ज्यांना न घाव तेच पळायास लागले ! माझ्या मिठीत सांग मला पाप कोणते ? हे चांदणे व्यर्थ चळायास लागले ! माझ्याच झोपडीस कुठे आग लागली ? सारे गरीब गाव जळाव्यास लागले ! केलास हा सवाल नवा तू कसा मला ? आता जुने सवाल छळायास लागले ! कोणी नभात सूर्य विकायास काढला ? येथे प्रसन्न ऊंन्ह मळायास लागले ! आणू तरी कुठून रडायास आसवे ? डोळ्यामधून रक्त गळायास लागले ! जात्यात गात गात उडी मीच घेतली … आयुष्य सावकाश दळावयास लागले : सुरेश भट 

जपानी रमलाची रात्र

तुझे विजेचे चांदपाखरू दीप - राग गात रचीत होते शयनमहाली निळी चांदरात रतीरत कुक्कुटसा कुंडीवर आरोहूनी माड चोच खुपसुनी फुलवीत होता पंखांचे झाड अद्भुत पंख्यासम भिंतीवर आंदोलुनी छाया लावित होत्या ताप जगाचा नकळत विसराया धूप ऊसासत होता कोनि रजताच्या पात्री विचित्र रेशिमचित्रे होती रसावली गात्री तुझा पियानो यक्ष जळातील होता निजलेला मनात गुंफित स्पर्श - सुखांच्या स्वप्नांचा झेला अन् म्युसेची कवने होती माझ्या हातात प्रतिचरणाला करित होती धूम्रवेल साथ जळत ऊसासत होते त्यासह अंतरात काही होता चिमणा श्वान लोकरी घोटाळत पायी तोच वाजल्या तुझ्या सपाता सळसळला घोळ आलीस मिरवीत जाळीमधुनी नागिणीचा डौल करांतुनी तव खिदळत आले स्तनाकार पेले जळता गंधक पांच उकळता याही रंगलेले अभिष्ट चिंतुनी आम्ही त्यांचे भिडवियले काठ सुरेहुनी तु गडे भाजिले ओठांनी ओठ स्पर्शे तुझिया आणि पियानो थरारला सारा मज सम त्याच्या कानशिलाच्या झणाणल्या तारा गंधर्वांच्या दुहिता जमल्या करित पुष्पवृ
disawar satta king