Skip to main content

Posts

Showing posts from May, 2016

अंतराय

आर्द्र हवी चंद्ररात  मेघावळ रजतरंग  किणकिणत्या किरणांवर  स्वरगंधित अंतरंग ! आणि दूर मिटलेली  क्षितिजाची शून्य नजर  तृप्तीने तुटलेला  रात्रीचा भव्य प्रहर …  जळ दिठीत निजलेले  ओंजळीत फक्त पाय  तू जळता माझा हो  तेजस्वी अंतराय ! : अंतराय  : सांजभयाच्या साजणी  : ग्रेस 

उपननी उपननी

उपननी उपननी आतां घ्या रे पाट्या हातीं राहा आतां उपन्याले उभे तिव्हारीवरती चाल ये रे ये रे वार्या , ये रे मारोतीच्या बापा नको देऊं रे गुंगारा पुर्या झाल्या तुझ्या थापा नही अझून चाहूल नको पाडूं रे घोरांत आज निंघाली कोनाची वार्यावरती वरात ? ये रे वार्या घोंघावत ये रे खयाकडे आधीं आज कुठें रे शिरला वासराच्या कानामधी ! भिनभिन आला वारा कोन कोनाशीं बोलली ? मन माझं हारखलं पानं झाडाची हाललीं ! वारा आलारे झन्नाट्या झाडं झुडपं डोललीं धरा मदनाच्या पाट्या खाले पोखरी चालली देवा , माझी उपननी तुझ्या पायी इनवनी दैवा , तुझी सोपवनी माझ्या जीवाची कारोनी : बहीणाबाई चौधरी

आला आला शेतकर्या

आला आला शेतकर्या पोयाचा रे सन मोठा हातीं घेईसन वाट्या आतां शेंदूराले घोटा आतां बांधा रे तोरनं सजवा रे घरदार करा आंघोयी बैलाच्या लावा शिंगाले शेंदुर लावा शेंदूर शिंगाले शेंव्या घुंगराच्या लावा गयामधीं बांधा जीला घंट्या घुंगरू मिरवा बांधा कवड्याचा गेठा आंगावर्हे झूल छान माथां रेसमाचे गोंडे चारी पायांत पैंजन उठा उठा बह्यनाई , चुल्हे पेटवा पेटवा आज बैलाले नीवद पुरनाच्या पोया ठेवा वढे नागर वखर नहीं कष्टाले गनती पीक शेतकर्या हातीं याच्या जीवावर शेतीं उभे कामाचे ढिगारे बैल कामदार बंदा याले कहीनाथे झूल दानचार्याचाज मिंधा चुल्हा पेटवा पेटवा उठा उठा आयाबाया आज बैलाले खुराक रांधा पुरनाच्या पोया खाऊं द्या रे पोटभरी होऊं द्यारे मगदूल बशीसनी यायभरी आज करूं या बागूल आतां ऐक मनांतलं माझं येळीचं सांगन आज पोयाच्या सनाले माझं येवढं मांगन कसे बैल कुदाळता आदाबादीची आवड वझं शिंगाले बांधतां बाशिंगाचं डोईजड नका हेंडालूं बैलाले माझ

माझं इठ्ठल मंदीर

माझं इठ्ठल मंदीर अवघ्याचं माहेर माझं इठ्ठल रखूमाई उभे इटेवर टाय वाजे खनखन मुरदुगाची धुन तठे चाललं भजन गह्यरी गह्यरीसन टायकर्याचा जमाव दंगला दंगला तुकारामाचा अभंग रंगला रंगला तुम्ही करा रे भजन ऐका रे कीर्तन नका होऊं रे राकेस सुद्ध ठेवा मन आता सरला अभंग चालली पावली ‘ जे जे इठ्ठल रखूमाई ईठाई माऊली ’ शेतामंधी गये घाम हाडं मोडीसनी आतां घ्या रे हरीनाम टाया पीटीसनी उभा भक्तीचा हा झेंडा हरीच्या नांवानं हा झेंडा फडकावला ‘ झेंडूला बोवानं ’ आतां झाली परदक्षीना भूईले वंदन ‘ हेचि दान देगा देवा ’ आवरलं भजन आतां फिरली आरती भजन गेलं सरी ‘ बह्यना ’ देवाचीया दारीं उभी क्षनभरी :   बहीणाबाई चौधरी

देव्हारा

हृदयात आहे माझ्या  एक एकांत कोपरा  चिमुकला तुझ्यासाठी  तेथे चंदेरी देव्हारा  संसाराच्या कोलाहली  नाही संवाद आपुला  नाही प्रेमभाव कधी  अक्षरांत आकारला  स्पर्शातून स्मितातून  अपेक्षा न ओसंडल्या  फुलल्या न नेत्रांतून  भावपुष्पाच्या पाकळ्या  नदीकिनारी न कधी  केले कूजन मंजुळ  चांदण्यात रचिले ना  कधी स्वप्नांचे देऊळ  व्यक्ततेच्या पलीकडे  माझे भावनापुजन  पार्थिवाच्या पलीकडे  तुझे - माझे मीलन ! : देव्हारा  : मराठी माती  : कुसुमाग्रज 
disawar satta king