Skip to main content

Posts

Showing posts from November, 2011

फराज

अबके हम बिछड़े तो शायद, कभी ख्वाबों में मिलें जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिलें ढूँढ बिछड़े हुए लोगों में वफा के मोती ये खज़ाने तुझे मुमकिने ख़राबों में मिलें तू खुदा है न मेरा इश्क फ़रिश्तों जैसा दोनों इंसाँ हैं तो क्यों इतने हिजाबों में मिलें ग़मे दुनिया भी ग़मे यार में शामिल कर लो नश्शा बढ़ता है शराबें जो शराबों में मिलें आज हम दार पे खींचे गए जिन बातों पर क्या अजब कल वो जमाने को निसाबों में मिलें अब न वो मैं हूँ, न तू है, न वो मंजिल है फ़राज़ जैसे दो साए तमन्ना के सराबों में मिलें : अहमद फराज

रंगुनी रंगांत साऱ्या

रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा! कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे; मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा! राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी; हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा! कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ? सांगती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा  चालणार पांगळा अन् पाहणारा आंधळा ! माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी  माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा ! :   सुरेश भट

मित्रा

एका जागी नाही असे फार थांबायचे नाही गुंतून जायचे, नाही गुंतून जायचे दूरातल्या अदृष्टाशी तुझी झाली आणभाक तुझ्या काळजात एक आर्त छळणारी हाक रक्त इमानी तयाने असे नाही भुलायाचे नाही गुंतून जायचे, नाही गुंतून जायचे घट्ट रेशमाची मिठी तुला सोडावी लागेल जन्मगाठ जिवघेणी तुला तोडावी लागेल निरोपाचे खारे पाणी कुणा दिसू न द्यायचे नाही गुंतून जायचे, नाही गुंतून जायचे होय, कबूल; तुलाही हवा कधीचा निवारा गर्द झाडाची सावली आणि चंदनाचा वारा पण पोरक्या उन्हात, सांग कोणी पोळायचे? नाही गुंतून जायचे, नाही गुंतून जायचे  : सुधीर मोघे 

कितीक हळवे, कितीक सुंदर

कितीक हळवे, कितीक सुंदर किती शहाणे आपुले अंतर त्याच जागी त्या येऊन जाशी -माझ्यासाठी... माझ्यानंतर अवचित कधी सामोरे यावे अन श्वासांनी थांबुन जावे परस्परांना त्रास तरीही- .. परस्परांविण ना गत्यंतर मला पाहुनी दडते, लपते आणिक तरीही इतुके जपते वाटेवरच्या फुलांस माझा लावून जाते हळूच अत्तर  भेट जरी ना या जन्मातून  ओळख झाली इतुकी आतून  प्रश्न मला जो पडला नाही  त्याचेही तुज सुचते उत्तर  मला सापडे तुझे 'तुझेपण'  तुझ्याबरोबर माझे 'मीपण'  तुला तोलुनी धरतो मी अन  तू ही मजला सावर सावर  मेघ कधी हे भरून येता  अबोल आतून घुस्मट होता  झरते तिकडे पाणी टपटप  अन इकडे ही शाई झरझर  : संदीप खरे 

मी अंधार होऊन लपले होते

मी अंधार होऊन लपले होते दर्‍यांत, खोर्‍यांत, गुहागुफ़ांत झाडावेलींच्या कुंजाकुंजात माझे अंधारपण संरक्षीत. मी वाळू होऊन दडले होते नदीत, सरोवरात, सागराच्या अथांग सखोलतेत माझे लहानपण जपून ठेवीत. मी पाचोळा होऊन विखुरले होते रानावनात, धुळीत एकांतात बसलेल्या वृक्षांच्या मुळाजवळ माझे पिवळेपण लपवीत. तू आलास माझ्या कणाएवढ्या मीपणावर न्याहाळणार्‍या आर्द्र नजरेतून समर्पण शिंपडीत थबकलास. आता अंधार चांदण्यांनी लहरतो आहे, वाळूवर मोत्यांचे पाणी चढते आहे पाचोळ्याच्या पिवळ्या शिरांत हिरवी कळ तटतटते आहे मला भीति वाटते आहे; म्हणून मी अंधार होऊन लपते आहे तुझ्या डोळ्यात, तुझ्या मनात, माझ्यापासून तुझे संरक्षण करण्यासाठी.  : इंदिरा संत 

कोवळ्या अंधारी

कोवळ्या अंधारी दर्याच्या किनारी बसते तशीच, एकटी एकटी. एकटी कशी  –  तुझ्या विचारात्; तुझ्या विचारात रंगता रंगता येते मनाला अशी काहीशी ओढाळ मस्ती पाहती वरून सप्तर्षी चोरून काढावी खोडी हळूच त्याची; ओढावी दाढी व्याध  - मंगळ  - अभिजितांचे रंगेल खडे आणावे चोरून तुझ्या शर्टाची होतील बटणे बोटचाळ्याला कृत्तिकासमूह घेऊन हातात होऊन अल्लड मांडावा खेळ सागरगोट्यांचा  –  पांचाखाचाचा मस्तीत येणार्‍या ताठर लाटेचा ओढावा पदर्; आणि लपावे वाळुच्या आड शिरावे थेट दर्याच्या कुशीत आणि निथळावे अंगावरून खारट पाणी  – पाण्याचे थेंब अशी काहीशी ओढाळ मस्ती येते मनाला तुझ्या विचारात रंगता रंगता  : इंदिरा संत 

एक दिवस

जीव लागत नाही माझा असा एक दिवस येतो कधी अधुनमधुन केव्हा लागोपाठ भेट देतो अशा दिवशी दुरावलेले उजाड सारे आसपास घर उदास बाग उदास लता उदास फ़ुले उदास वाटते आयुष्य अवघे चार दिवसांचेच झाले कसे गेले कळले नाही हाती फ़ार थोडे आले दोन दिवस आराधनेत दोन प्रतिक्षेत गेले अर्धे जीवन प्रयत्नात अर्धे विवंचनेत गेले आस हरपलेली असते श्वास थकले वाटतात अश्रू बाहेर गळत नाहीत आत जळत राहतात.  : अनिल 

चाफ्याच्या झाडा....

चाफ्याच्या झाडा.... का बरे आलास आज स्वप्नात? तेव्हाच तर आपले नव्हते का ठरले? दु:ख नाही उरलं आता मनात फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा रंग तुझा रंगतोय माझ्या मनात केसात राखडी पण पायात फुगडी मी वेडी भाबडी तुझ्या मनात चाफ्याच्या झाडा.... नको ना रे पाणी डोळ्यात आणू ओळख़ीच्या सुरात, ओळखीच्या तालात हादग्याची गाणी नको म्हणू तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात खेळलोय ना जसे काही घोड्यावर तुझ्याच फांद्यांवर बसून आभाळात हिंडलोय ना चाफ्याच्या झाडा.... चाफ्याच्या झाडा.... पानात, मनात खुपतंय ना काहीतरी चुकतंय, कुठेतरी दुखतंय तुलाही कळतंय.... कळतंय ना.... चाफ्याच्या झाडा.... चाफ्याच्या झाडा हसून सजवायचं ठरलय ना कुठं नाही बोलायचं, मनातच ठेवायचं फुलांनी ओंजळ भरलीये ना ... : पद्मा गोळे 

येता पाऊस पाहुणा

येता पाऊस पाहुणा आलं हिरवं उधाण डोंगरतुन फुटलं हिरवळीचं धरण रान हिरव्या लोंढ्यात जाता अवघं वाहून पानं पाउस पिऊन गेली नवीन होऊन ऊन पकडाया सर आली धावत दारात कशी रमली दोघंही पाठशिवीच्या खेळात पाणी वाहते लावुनी अंगी मातीचं उटणं तरी नभाने राखलं कसं त्याचं निळेपण रेषा आखुनि पानात थेंब डाव मांडतात छेड काढता झुळूक आपसांत भांडतात उतरवून लकेरी निळ्या कागदाच्या वर तळं पसरत गेलं काठ सोडुन बाहेर टाळ्या वाजवत गेली फुलपाखरं मजेत जणू फुलंच निघाली देठावरूनी उडत सारी पाखरे उतारु करतात किलबिल दिला झाडाने ऋतुला गर्द हिरवा कंदील!  नलेश पाटील 

लिलीची फ़ुले

लिलीची फ़ुले तिने एकदा चुंबिता, डोळां पाणी मीं पाहिलें. लिलीची फ़ुले आतां कधींही पाहतां, डोळां पाणी हें सांकळे.  : पुं: शि. रेगे 

सोना

सोनफुलांची राकट हातीं जरि सांगड साजेना, ओंजळ घाली ठकवुनि जवळी नउ नवसाची सोना.  : पुं: शि. रेगे 

निःशब्द वादळ

नदी किनारीं वारा भरारा. चंचल अंचल. सावळी चाहूल. उरी थरारे नवी नव्हाळी. जुळलीं, भुललीं ह्रदये दोन. नदी किनारीं वारा भरारा. गवती पातीं लपती कांठी. तरंग सारंग पाण्यावरती. उसळे, कोसळे निःशब्द वादळ  : पुं: शि. रेगे 

कशी तुज समजावू सांग

कशी तुज समजावू सांग का भामिनी उगीच राग हास्याहुनि मधु रुसवा हेमन्ती उष्ण हवा सन्ध्येचा सा.ज नवा हा का प्रणयानुराग चाफेकळी केवि फुले ओष्ठकमल जेवि उले भोवती मधुगंध फळे का प्रसन्नवदन राग वृत्तीचा होम अमुप त्यात जाळु दे विकल्प होउनिया निर्विकल्प अक्षय करु यज्ञयाग ओठांचे फेड बंध गाइ गडे मुक्तछंद श्वासांचे करू प्रबंध हृदयांचे मधुप्रयाग काव्य: बा. भ. बोरकर 

कळत जाते तसे

कळत जाते तसे कशी जवळचीही होतात दूर? जुने शब्द सुने होऊन वाजतात कसे बद्द निसूर? कळत जाते तसे कसे ऊन पाण्यात खिरून जाते? वाकुड सावल्यात वाट चुकून चांदणे कसे झुरुन जाते? कळत जाते तसे कश्या मूर्ती सार्‍या झिजून जातात? पापण्यांमधले स्नेह थिजून ज्योती कशा विझून जातात? कळत जाते तसे कशी झाडे पाखरे जीव लावतात? शब्द सारे मिटून कसे तळ्यामध्येच पेंगू लागतात? कळत जाते तसे कश्या दूरच्या घंटा ऐकू येतात? दूरचे रंग, दूरचे गंध प्राण कसा वेधून घेतात? कळत जाते तसे का रे एकटा एकटा होतो जीव? रागरोष सरून कशी आपलीच आपणा येते कीव : बा. भ . बोरकर 

पावसात जागला समुद्रराग सावळा

पावसात जागला समुद्रराग सावळा लाट लाट दाटते भरुन भाव कोवळा काठ काठ ढासळे, पिसाट माड स्फुंदती आंधळ्या ढगांतूनी प्रकाशबिंदू सांडती हाक ये दूरुन एक झाकळून टाकते गाढ गूढ आठवांत मूक वेल वाकते माखते चराचरी अथांग गांग गारवा आगळा जगास ये उदास रंग पारवा धूसरे सरींत दूर, सूरसूर व्याकळे भाव की अभाव हा करी सुगंध मोकळे कोण ही व्यथा अशी सुखास लाज आणते सागरार्थ कोणत्या उसासुनी उधाणते  : बा. भ . बोरकर 

तुझे पांगलेले मन

तुझे पांगलेले मन सांग सांग कसे बांधू माझे भंगलेले मन सांग सांग कसे सांधू आले गगन भरुन तसे मन आसवांनी तुझ्यासाठी परी अडे असे पापण्यांत पाणी पक्षी भाळला आभाळा वाट मागची विसरे मौन तुझे तीरसे गे मात्र काळजांत शिरे सांग सांग कशी तुला पुन्हा बोलकी गे करूं कसे पिसावलें चित्त आत्ता मुठीत आवरू  : बा. भ . बोरकर 

व्यथा गात गात

कशाला दिले तू मला लक्ष डोळे उभा तू उभा तू असा पाठ मोरा किती जन्म गेले त्वचेचे तमाला तरी बाहुली रे जपे अश्रु खारा कहाणी मनाची तुझा शब्द पाळी मुक्याने वहातो तमी देहमेणा जरा बाजुला घे कुणी अश्रुबुंथी नवा जन्म येतो पुन्हा त्याच वेणा कुठे दूर झाल्या तुझ्या पायवाटा जळे उंबर्‍याशी दिवा रात रात धुक्याच्या दिशेला खिळे शून्य दृष्टि किती ऊर ठेवू व्यथा गात गात :  आरती प्रभू 

माळ

हिरव्या माळापुढे निळा गिरि गिरवित काळी वळणे काही छप्पर झाले लाल अधिकच धूर दरीतून चढतच नाही पुसून गेले गगन खोलवर काठावरति ढग थोडासा थोडासा पण तीच हेळणा पिवळा झाला फ़क्त कवडसा हिरव्या माळापुढे निळा गिरि मावत नाही इतुका फ़िक्कट अबरळ्त चाललि पुढेच टिटवी माळ ओसरे मागे चौप : आरती प्रभू 

दु : खभोर संधिकाल सूर्यबिम्ब सागरात

दु : खभोर संधिकाल सूर्यबिम्ब सागरात रंग केशरातला जळे हवेत, गारव्यात नभात चांदणी सले हले दिठीत चंद्रही, वृत्तभार शब्दही फुलातला सुगंधही गाव चार पाउलेच पार देउळातले, कृतज्ञ सांजवातीला सुजाण सत्य पावले! झाड झाड पाखरात, पाखरात दंग झाड, झर्‍यात विर्घळे जसा सच्छिद्र दूरचा पहाड. एक हाक एक धाक एक मृत्युचा निनाद स्वप्न सांधती तुझे जुने नवे तुझे प्रवाद... राहुटीत या इथे समुद्र सर्व झाकतो, अलौकिकात सांडतो नि लौकिकात मांडतो... निळी सुदीर्घ शांतता तुझ्यातलीच आर्तता तुझ्या कुशीत जन्मते तुझी जुनीच देवता... शिल्प हेच देखणे तुझ्याच अस्थी तासणे तुझ्या नभातलेच दे मला विदग्ध चांदणे....  : ग्रेस 

ग्रेस

नदीच्या दिशेने जरी वाट गेली तिलाही असे सागराची क्षुधा इथे प्राण माझे तळाशी निमाले तुझी आर्जवे कोण ऐकी अता  :  ग्रेस 

उष:काल

झाला उष:काल राणी ! हिमबिंदू बिलगुनी फुलांना पानांना बसती हलती हळु वार्‍यावरती जोजवती जणु नवथर बाला ही बाळे चिमणी झाला उष:काल राणी ! निळवंतीच्या फुलू लागल्या कळ्या कुंपणावरी येऊनी रात्रीच्या प्रहरी परत जायचे विसरूनि गेल्या वनदेवी कोणी झाला उष:काल राणी ! माणिकमोत्यांची पायाशी घालुनि बरसात बसे संन्यस्त पारिजात वाहु लागला सुगंध वारा तो वातावरणी झाला उष:काल राणी ! वनराईतुन उठू लागली करीत किलबिल ती पाखरे, अन गगनी जाती सोन्याच्या दर्यात गलबते जणु गोजिरवाणी झाला उष:काल राणी ! इंद्रनील ओटीत घेउनी शिंपीत भवताली आली निर्झरणी, आली खळाळते खडकावर हंसापरी शुभ्र पाणी झाला उष:काल राणी ! किनारती कनकाच्या धारा उदयगिरीवरती जगावर अभिनव ये क्रांती समूर्त झाली महाकवींची काय दिव्य वाणी झाला उष:काल राणी ! स्वप्नांचा खजिना घेउनी लगबगिने रात्र गेली, चुकोनिया मात्र उषास्वप्न हे उरले मागे तुजसाठी रमणी झाला उष:काल राणी ! 

वाटा ...............

वाटा लालगर्द पांगाराच्या फुलांच्या , वाटा काळ्याभोर भुसभुशीत , वाटा सनयींची मिंड घेणाऱ्या , वाटा चढणीच्या दमछाक करणाऱ्या , वाटा चपळ खारी , वाटा रवंथ करणाऱ्या सुस्त  म्हशी , वाटा भाताच्या लोंब्या हुंगीत जाणाऱ्या, वाटा सरींच्या झिम्मा झेलणाऱ्या, वाटा पहिल्यावहिल्या भेटीच्या , वाटा चांदण्याच्या मिठीच्या, वाटा काजूच्या मोहराने घमघमलेल्या , वाटा भांगातल्या पिंजरेच्या, वाटा तिरप्या नजरेच्या , वाटा मातीच्या वासाच्या , वाटा गर्भारशी , वाटा बालपणीच्या कोवळी उन्हे जपणाऱ्या , वाटा चिंचांनी गाभूळणाऱ्या , वाटा हिरव्यागार पुस्तकातल्या पीसासारख्या, वाटा बोबडकांद्याच्या , वाटा अवखळ फांद्यांच्या , वाटा आजींच्या गोष्टींसारख्या खिळवणाऱ्या ,  वाटा पिवळ्या पोकळीच्या भिरभिरणाऱ्या, वाटा झपाटलेल्या झाडांच्या , वाटा गोमटेश्वर माडाच्या , वाटा कातरवेळी एकटे परतताना भ्यायलेल्या , वाटा न परतण्यासाठी गेलेल्या , वाटा आपणहून उंबरठ्याकडे  येणाऱ्या,  वाटा पायांअगोदर  फुटणाऱ्या , वाटा अकारण तुटणाऱ्या , वाटा पावलांचा झुगार खेळणाऱ्या , वाटा चांदण्याच्य

सांजवेळी अंगणी होतील व्याकुळ सावल्या

क्षितीजावरी थांबेन मी तू हाक मजला दे जरा  वाऱ्यातुनी लाटांतुनी तू हाक मजला दे जरा  सांजवेळी अंगणी होतील व्याकुळ सावल्या  सूर तू होऊन तेव्हा माळव्यातून ये जरा दाही दिशांतून गर्जुनी येतील जेव्हा वेदना  होऊन तू हुंदका माझ्या उरातून ये जरा वादळे नेतील मजला दूर जेव्हा वाहुनी  तू किनारा होऊनी  मजला दिलासा 

थोतांड

थोतांड खपविण्यासाठी थोर उभे पंडित तांडे: वांझोट्या बौधिकतेचे  सजवून कागदी मांडे  शब्दांच्या गुंत्यामद्ये संदर्भ उवांची दाटी; शेरांच्या शेंदूर यांच्या  मर्जीतील दगडांसाठी  ठरवितात कविता कुठली  बडवूनिया बाष्कळ घंटा   नाटकी निरर्थक भाषा  हो भूषण यांच्या कंठा  केवढे भाग्य कि कविता  थांबली न कुबड्यांसाठी : जाणते ओढ रुजण्याची  हि पाऊस ओली माती... : मंगेश पाडगावकर  : भटके पक्षी 

प्रश्न आणि उत्तर

डोळे कशासाठी ? तुला साठवून मिटून घेण्यासाठी ... आला भरून पाऊस , नको एकटा जाऊस. सरी कशासाठी ? तुला बिलगुन भिजून जाण्यासाठी..... नाव तुझे मनातले  चांदणेच रानातले, शब्द कशासाठी ? तुला आठवून भरून येण्यासाठी..... वेल मोहरून आली , फुले अंगभर झाली . वारा कशासाठी ? गंध वनातून पाखरू होण्यासाठी..... असा तुझा भरवसा  चांदण्याचा कवडसा. ओठ कशासाठी ? उरी थरारून जुळून गाण्यासाठी..... : मंगेश पाडगावकर  : भटके पक्षी 

रात्रभर आपण चालत आहोत...

रात्रभर आपण चालत आहोत... पहाट होईल तेव्हा आपण कुठे असू ? पायांतले त्राण राहून ठेव. कुठेही असलो तरी पहाट होणारच. तू धीर धर. आपण धीर धरू. रात्रभर आपण चालत आहोत... माझा हात हातात धर. भिऊ नकोस. एक गोष्ट सांगतो  जी झाडाने पाखराला सांगितली होती : झाड म्हणाले,"अंधार असतो म्हणजे प्रकाश नसतो. पण प्रकाश येतोच आणि मग अंधार उरत नाही." पाखराने गोष्टऐकली आणि ते विश्वासाने झोपले . हि गोष्ट फक्त रात्रभर चालणाऱ्यासाठीच आहे. रात्रभर आपण चालत आहोत... चालताना आपण काळोखात  या गोष्टीची सोबत असेल  जी झाडाने पाखराला सांगितली होती. आणि झाडे पाखरांशी खोटे बोलत नाहीत. म्हणून तर झाडाना फुले येतात. रात्रभर आपण चालत आहोत... पहाट होईल तेव्हा आपण जागे असू. तेव्हा आपण कुठे असू? कुठेही असलो तरी पहाट असणारच . कुठेही असलो तरी आपण प्रकाशातच असू . उडणाऱ्या पाखरांच्या पिसांना फुलांचा हळुवार वास असेल. माझा हात तुझ्या हातात असेल . सर्वत्र सर्वत्र निरामय पहाट असेल. रात्रभर आपण चालत आहोत...चालणार आहोत.......   : मंगेश पाडगावकर  : भटके पक्षी 

नाव

उडणाऱ्या पाखराला नाव नसते, त्याला असतात फक्त दिशा; जाईल तिथे नजरेची फांदी असते, माझेपणात जखडलेले झाड नसते. तरीही आपल्या खिडकीच्या चौकटीतून  दिसणारे आभाळ केवळ आपलेच असते  आणि आपल्या आभाळातून उडणाऱ्या पक्ष्याला  अगदी आपले असे नाव असते : जे तुझे एक नाव माझ्या ओठांवर  केवळ माझ्या मनात हाक घालण्यासाठी . : भटके पक्षी  : मंगेश पाडगावकर 

त्या झपाटलेल्या रानात

पाण्यात खोल कोसळले  आभाळ रंगबेभान, मी तुझ्या संगती होते  लावून दिव्यापरी प्राण... मग काळोखत गेलेल्या  त्या झपाटलेल्या रानात  हळुवार तुझी मी होते  घेऊन दिवा प्राणात  काळोख नदिपरी वाहे, आभाळ किर्र पाण्यात, कोमेजून गेला नाही  तो दिवा : अजून गाण्यात.... : मंगेश पाडगावकर : भटके पक्षी 
disawar satta king