Skip to main content

Posts

Showing posts from August, 2020

भेट हवी जर

  भेट हवी तर ...... खुशाल जा तू.  करील स्वागत हासून द्वारी ,  चहाबरोबर आणखी काही  देईल सुगरण ...... आग्रहवेडी.  बोलायाला विषय काहीही :  विचार तिजला  नाव वेलीचे बागेमधल्या  विचार तिजला  भिंतीवरच्या चित्राविषयी.  विचार तिजला  वाचलेत का अमुके पुस्तक......  विचारतांना  लक्ष ठेव पण . नको विचारू  भलतेसलते :  बैठकीतली आरामखुर्ची  मिटलेली पण उभी भिंतीशी :  नको विचारू त्याचे कारण.  खुंटीवरती बकुळवळेसर  सुकलेला पण :  नको विचारू त्याचा हेतू  खिडकीमधल्या दगडावरती  रंगित मासा :  आठवेल तुज तो " मोबे डिक ":  नको विचारू एक शब्द पण  विचारशील जर असले काही  करील डोळे थोडे बारीक ,  बघेल तिकडे दूर कुठेतरी,  हसेल थोडी, म्हणेल आणिक ,  " सहज ..... उगीचच ..... अशीच गंमत . "  असेच काही  विचारील अन प्रश्न अचानक ,  "आवडते का मटण तुम्हाला? " बोलत राहील  डबडबला जरी घाम कपाळी - " ह्या कवितेची जात निराळी."  "हवा किती ही निरभ्र सुंदर " बोलत राहील...  तशीच होईल स्तब्ध अचानक ,  त्यानंतर पण किती बोलशील ,  तिला न ऐकू येईल काही  निरोप घेशील ,  स्तब्ध तरीही तशीच येईल  दारापा

मुकी जास्वंद

  म्हणावें तू बोलू नको  आणि मीहि व्हावे मूक ;  म्हणावे तू येऊ नको  मीहि व्हावे रुख .  आज एका शब्दासाठी  तुझे आभाळाचे कान  आणि माझ्या स्वागताला  उभी बाहूंची कमान ! - कळायची आता तुला  जास्वदींची शापकथा  पाय तिचे पाळेमुळे  मुकी पुष्पे लक्ष गाथा.  : मुकी जास्वंद : रंगबावरी  : इंदिरा संत  

डोळाबंद

आली अमृताची आठवण  आली तुझी आठवण:  साठवाया रक्तामध्यें  डोळे घेतले मिटून ;  उभी अस्वस्थशी रात्र  गळ लावून चंद्राचा : हरवले काही त्याचा  शोध घेतसे केव्हाचा;  फुलांतून मेघांतून  धुळींतून वाहे वारा :  हरवले कांही त्याचा  शोध घेतसे सैरावैरा;  हरवले त्यांचे कांही  काही घनदाट धुंद :  कसे सापडे त्यांना  केव्हाच ते डोळाबंद ! : डोळाबंद  : रंगबावरी  : इंदिरा संत