सरवस्तीच्या नौका या
युगयात्रेस निघाल्या
शुभ्र शिडांच्या पाकळ्या
महाशून्यांत फुलल्या.
करी हर्षाची लावणी
मंद सुगंध समीर
लाल तेजाने कोंदले
निळे नभाचे मंदिर
रत्नाकरात हेलावे
हिऱ्यामाणकांचे पाणी
गाई वत्सल किनारा
आशीर्वचनांची गाणी
चार दिशांच्या देवता
उभ्या देहलीवरती
हाती मेघांची तबके
त्यांत ज्योतींची आरती
अश्या सोहळ्यात झाले
खुले अपाराचे द्वार
तिन्ही काळांचा रंगला
धुंद झपुर्झा समोर
नौका चालल्या चालल्या
दूर बंदरापासून
जीवापासून जाहले
आत्ता वेगळे जीवन
हीन मलीन नश्वर
सारे किनाऱ्यास गळे
दिव्य प्रतिभेची ज्योत
युगायुगांत पाजलें
: नौका
: मराठी माती
: कुसुमाग्रज
Comments
Post a Comment