Skip to main content

Posts

Showing posts from September, 2015

या व्याकुळ संध्यासमयीं

या व्याकुळ संध्यासमयीं शब्दांचा जीव वितळतो . डोळ्यांत कुणाच्या क्षितिजें मी अपुले हात उजळतो . तू आठवणींतुन माझ्या कधिं रंगित वाट पसरशी , अंधार - व्रताची समई कधिं असते माझ्यापाशीं ..... पदराला बांधुन स्वप्नें तू एकट संध्यासमयीं , तुकयाच्या हातांमधला मी अभंग उचलुन घेई ..... तू मला कुशीला घ्यावें अंधार हळू ढवळावा ..... संन्यस्त सुखाच्या काठीं वळिवाचा पाऊस यावा !

मोहब्बत एक ख़ुशबू है हमेशा साथ चलती है

मोहब्बत एक ख़ुशबू है हमेशा साथ चलती है कोई इंसान तन्हाई में भी तन्हा नहीं रहता

याद

भली सी एक शक्ल थी.. भली सी उस की दोस्ती.. अब उसकी याद रात दिन... नहीं, मगर कभी कभी....

फिर भी तू इंतज़ार कर शायद

फिर उसी राहगुज़र पर शायद हम कभी मिल सकें मगर शायद जिनके हम मुंतज़िर रहे उनको मिल गए और हमसफ़र शायद जान पहचान से भी क्या होगा फिर भी ऐ दोस्त ग़ौर कर ! शायद अजनबीयत की धुंध छँट जाए चमक उठ्ठे तिरी नज़र शायद ज़िन्दगी भर लहू रुलाएगी यादे - याराने – बेख़बर शायद जो भी बिछड़े वो कब मिले हैं ‘ फ़राज़ ’ फिर भी तू इंतज़ार कर शायद

किती लुटावे डोळ्यांनी

किती लुटावे डोळ्यांनी दिवसांचे निळेपण ; काच रंगेना मनाची , उमटेना निळी धून ; किती खोल घ्यावे श्वास पिण्या काळोखाचे विष ; रिते जरी लाख डोह नाही जहराचा होष ; नाही बासरीची धून , नाही कशी विषबाधा ; अशी कशी ही पापीन …. हसे मीरा , हसे राधा . : किती लुटावे डोळ्यांनी : मृगजळ : इंदिरा संत