काही योजून मनाशी
दणादणा आली रात्र
रिघे दारागजांतून
काळी हत्तीण मोकाट.
देते भिंतींचा धडक :
कोसळला चिरा चिरा ;
उस्कटल्या कौलाराच्या
केला खापरीचा चुरा ;
नीट लाघव वस्तूंचा
डाव टाकला मोडून :
इथे पलंगाचा खूर
तिथे भग्न पानदान;
उधव्स्तान्त उभी तृप्त
काळ्या मत्सराची गोण :
कशी तिला कळायची
माझ्या श्रीमंतीची खूण !
: रात्र
: रंगबावरी
: इंदिरा संत
Comments
Post a Comment