Skip to main content

Posts

Showing posts from October, 2016

शून्य शृंगारते

आतां सरी वळवाच्या ओसरू लागल्या , भरे निळी  नवलाई जळीं निवळल्या . गंधगर्भ भुईपोटी ठेवोन वाळली भुईचंपकाची पाने कर्दळीच्या तळी . कुठे हिरव्यांत फुले पिवळा रुसवा , गगनास मेघांचा हा पांढरा विसावा . आतां रात काजव्यांची माळावर झुरे , भोळी निर्झरी मधेंच बरळत झरे . धुके फेसाळ पांढरे दर्वळून दंवे शून्य शृंगारते आतां होत हळदिवें . : जोगवा : आरती प्रभू
disawar satta king