Skip to main content

Posts

Showing posts from August, 2014

ही फुले

ही फुले गळत पाकळ्या नभी जांभळ्या भरून ये दाट डोळ्यात काजळी जड झाली गं रात .

प्रदक्षिणा

कुणी पूजिते कुणाला चित्तगंधीच्या फुलांनी , धुंद विजेच्या परागं गंध आगळा उन्मनी . कुणी उतरते पूजा तपी चाफ्याच्या मुळाशी दिसामाशी वाढणाऱ्या निर्माल्याच्या राशी राशी …. राशीतील चंद्र्धारा काय शोषिल्या मुळांनी ? चाफा उतत मातत उधळला रोमरोमी पाने धावली दिशांशी   , तुरे पोचले आकाशी आणि भिडला दर्वळ अंतराच्या उराशी इथे चाफ्याच्या तळाशी ऊनसावलीची जाळी , पावलांची प्रदक्षिणा संथ उमटू लागली . : प्रदक्षिणा : चित्कळा : इंदिरा संत

फुल फुलतां एकदा

फुल फुलतां एकदा पुन्हा कळीपण नाही , उघडल्या पाकळीला पुन्हा मिट ठावी नाही आळवावा गंधराग उधळावे आत्मतेज ओघळता शोभवावी रेतीमातीची कि शेज : फुल फुलतां एकदा : बाहुल्या : इंदिरा संत

एक तुझी आठवण

एक तुझी आठवण : उभी भरतीची लाट मला घेऊनिया जाई तुझ्या पावलांशी थेट ; एक तुझी आठवण : वीज येते सळाळून आणि माझी मनवेल कोसळते थरारून : एक तुझी आठवण : सुगंधित वाऱ्यावरी येतां येतां धुंदवून तोल जाताना सावरी ; एक तुझी आठवण : मुक्त झाली माझ्यातून माझ्या इवल्या विश्वाला झाली गगन निर्गुण … : एक तुझी आठवण : : बाहुल्या : इंदिरा संत

येणारा तो

कुठे फुलला मोगरा … इथे दरवळ पोचला : येणारा तो येत आहे खुण मिळाली मनाला . डाव्या पापणी नको गं अशी वाजवू नौबत , अरे अधूऱ्या हृदया नको धावू धडाडत . मनकर्णिके नको गं अशी उगा उतावळी : तो न माझा सखा स्वामी , मी न त्याची चाफेकळी उन्हे भेटती आकाशा , वारा भेटे अवकाशा : तशीच हि आहे भेट , व्हा न बाजूला कशा . : येणारा तो : बाहुल्या : इंदिरा संत

निळेसावळे

निळेसावळे   आभाळ भरून ओथंबून तसे माझे शब्द …. घनगर्द ओठांवर येता येता पांढरे भक्क झाले , हलक्या हलक्या कवड्या झाले , खुळखुळ वाजायला लागले , पांढरेशुभ्र बगळे होऊन ओठांवरून उडून गेले …. तेव्हा मीच मनाचे ओठ घट्ट मिटून टाकले क्षितीजासारखे . : निळेसावळे : चित्कळा : इंदिरा संत
disawar satta king