Skip to main content

Posts

Showing posts from January, 2015

ब्लँक कॉल

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन आणि कळतच नाही बोलतय कोण बोलतच नाही मुळी पलीकडे कोणी ऐकू येत रहातं फक्त डोळ्यातलं पाणी …( १ ) कळताच मलाही मग थोडंसं काही मीही पुढे मग बोलतंच नाही फोनच्या तारेतून शांतता वाहते खूप खूप आतून अजून काही सांगते …( २ ) नदी नि शेतं नि वार्याची गिरकी ढगाची विजेने घेतलेली फिरकी वाळूवर काढलेली पाण्याची चित्रं “ तुझा ” पुढे मी खोडलेला “ मित्र ” …( ३ ) टपला नि खोड्या नि रुसवे नि राग एकदा तरी सहज म्हणून शहाण्यासारखं वाग हसायचे ढीगभर नि लोळून लोळून बोलायचे थोडेच पण घोळून घोळून …( ४ ) वडाचे झाड आणि बसायला पार थंडीमधे काढायची उन्हात धार कॉफी घेउन थोडेसे बोलायचे कडू हसताना पहायचे येते का रडू …( ५ ) बोलायचे गाणे आणि बोलायची चित्रं नुसतीच सही करुन धाडायची पत्रं क्षणांना यायची घुंगरांची लय प्राणांना यायची कवीतेची सय …( ६ ) माणूस आहेस “ गलत ” पण लिहितोस “ सही ” पावसात भिजलेली कवीतांची वही पुन्हा नीट नव्याने लिहीत का

उन्हं उतरणीला आली

की घराकडे ओढीने परतणा - या गायींसारखी मी तुझ्या ओढीने त्या उतरत्या पाय - यांच्या खोल विहिरीशी येते ! एका गडद संध्याकाळी त्या विहिरीत उतरताना मी तुला पाहिलं होतं परतताना मात्र कधीच पाहिलं नाही . त्याच हिरव्या ओल्या अंधारात मी कध्धीची वाट बघतेय तुझी . . . . या तो तुम आ जाओ या मुझे बुला लो ! – माधवी भट

केव्हातरी मिटण्यासाठीच

केव्हातरी मिटण्यासाठीच काळजामधला श्वास असतो वाट केव्हा वैरीण झाली तरी झाडे प्रेमळ होती लाल जांभळे भेटून गेली साथीत उरली निळी नाती काळोखाच्या गुहेतदेखील धडपडणारे किरण होते पेटविलेल्या दीपालींना वादळवारयात मरण होते असणे आता असत असत नसण्यापाशी अडले आहे जिव्हाळ्याच्या चिता पेटवीत बरेच चालणे घडले आहे माथ्यावरचा आभाळबाबा सवाल आता पुसत नाही पृथ्वी झाली पावलापुरती अल्याड पल्याड दिसत नाही – कुसुमाग्रज

तेंव्हा आपण भेटू

ढगांचे पुंजके जेंव्हा आकाशाच्या निळ्याभोर छताला लगडलेले असतील …… तेंव्हा आपण भेटू ……. मौनाच्या तलम अस्तराखाली जेंव्हा बेभान संवाद वाहत असतील ……. तेंव्हा आपण भेटू …… या राकट देहावर जेंव्हा तुझ्या पदरातून चांदणं पाझरत असेल …… तेव्हा आपण भेटू … कुणाच्यातरी तोंडून एकमेकांच नाव ऐकल्यावर उगाच बावरल्यासारखं होईल ……. श्वास आखुड होतील ….. तेंव्हा आपण भेटू …… चारचौघांत एकमेकांपासून अगदी गुन्हेगारासारखं तोंड लपवावसं वाटेल !! तेंव्हा आपण भेटू ……. जेंव्हा “ झोप का येत नाही ?” ह्या प्रश्नावर तुझ्याकडे उत्तर नसेल ! तेंव्हा आपण भेटू ……. मनात येईल तेंव्हा नकोच …..

पागोळीसारखी

पागोळीसारखी झरते उदास लागून आतली झड राही .. सावळ्या छायेला पांघरू ये नभ आतले मळभ दाट होई .. दिशा सारवल्या कालवले सारे सुहृदाला भूल दूर नेई .. भिजता पापणी ‘ पूस ’ म्हणणारे जवळ आपूले कोणी नाही ..

तू नसशील

अंगणभर विखुरलेल्या गुलमोहोराच्या लालजर्द पाकळ्यांतून हलकेच पावलं टाकतानाही तुला कसेसे होई पहिल्या पावसाच्या धुंद वृष्टीत सचैल भिजताना तुझ्या नसानसातून आनंदाचे हुंकार उमटत दूरदूरुन आलेल्या गीतलहरींनी तुझ्या छातीतले इमानी दु : ख भरभरुन वाहू लागे . एकदा सोनेरी संधीप्रकाशात झळ्झळती केतकी साडी नेसून गच्चीवर मी तुझ्यासमोर आले तेव्हा एकटक न्याहाळत कवितेतल्यासारख तू म्हणाल होतास , “ आता मी कोणता संधीप्रकाश पहायचा ? ” हे सारे उद्याही तसेच असेल ……. ऋतुचक्राचे आस आपल्या गतीने फिरत राहतील संधीप्रकाशाचा सोनेरी लावण्यात अवघा आसमंत न्हाउन निघेल . आणि पहिल्या पावसाच्या बेभान वृष्टीत धरतीचा कण न् कण पुळकीत होउन नाचू लागेल हे सारे तसेच असेल फक्त तू नसशील ……… तू नसशील मात्र गुलमोहोराच्या ओसडंत्या पाकळ्यांतून वेदनेची लालजर्द आसवं तुझ्या आठवणीसाठी वाहतच राहतील . – अनुराधा पोतदार

ओलेत्या पानात

ओलेत्या पानात , सोनिया उन्हात भरुन मेघ आले डहाळी जणू नवी नवरी हळद रंग ओले साद ओली पाखराची , ओढ जागे पावसाची डोहाळे या मातीला , सूर बोले थेंबातला वाटा आता कस्तुरी , गंध उमले कोंबातला थरारे मन , वारे नविन , सृजन रंग न्हाले स्वप्न लहरे नवे कांचनी , धून हरवे रानातूनी राधिका झाली बावरी , जन्म लहरे मुरलीवरी तृप्ती निराळी , उजळीत डोळी , स्वर हे कुठून आले हरपून दाही दिशा , ओढाळ झाल्या कशा शिणगार करती ऋतू , प्रीत स्पर्शात जाई उतू अभिसार न्यारा , हळवा शहारा , अरुपास रुप आले

पाऊस

पावसाच्या धारा येती झरझरा झांकळलें नभ , वाहे सोंसाट्याचा वारा रस्त्याने ओहोळ जाती खळखळ जागजागीं खाचांमध्ये तुडुंबले जळ ढगावर वीज झळके सतेज नर्तकीच आली गमे लेवुनिया साज झोंबे अंगा वारे काया थरथरे घरट्यांत घुसूनिया बसली पाखरें हर्षलासे फार नाचे वनीं मोर पानांतून हळूं पाहे डोकावून खार पावसाच्या धारा डोईवरी मारा झाडांचिया तळी गुरे शोधिती निवारा नदीलाही पूर लोटला अपार फोफावत धांवे जणू नागीणच थोर झाडांची पालवी चित्ताला मोहवी पानोपानी खुलतसें रंगदार छबी थांबला पाऊस उजळे आकाश सूर्य येई ढगांतून , उधळी प्रकाश किरण कोंवळे भूमीवरी आले सोनेरी त्या तेजामध्यें वस्तुजात खुले सुस्नात जाहली धरणी हांसली , वरुणाच्या कृपावर्षावाने सन्तोषली – शांता . शेळके