Skip to main content

Posts

Showing posts from May, 2013

कहाणी

एका परीची कहाणी  जिच्या डोळा आले पाणी  परी कधी रडत नसते  फुलत असते , हसत असते  तिथे दुखः कुठून येणार ? तिच्यासाठी यक्ष गाणार  फुलांमधून दव प्यावे  स्वप्नातच गुंगत जावे  अवती भवती झरयांची गाणी  हि तर होती परयांची राणी  दाह नाही .... आग नाही  दुःखाची जाग नाही  एक दिवस काय झाले ? नदीकाठी कोण आले ? त्याच्या डोळ्यात स्वप्न होते  पाय धुळीने भरले होते  तीच होती त्याची खुण संपली नाही वाट अजून  परी तिथे का आली ? मागोमाग का गेली ? वाजले नाही तिचे पाऊल ? - सावलीसारखी तिची चाहूल  का आली त्याच्यापाशी ? पृथ्वीवरच्या माणसाशी  परी कधी बोलत नसते  हि का हसली ? हि का बोलली ? पुन्हा पुन्हा तिने जावे  डोळे भरून त्याला प्यावे  कधी कधी स्तब्ध राही  नुसती पाण्याकडे पाही  शब्द असून अबोल होते  सांगण्यासाठी काहीच नव्हते  तरी सांगून संपत नव्हते  माणूस म्हणे ," कशासाठी  छळ माझा? सुखासाठी ? ऐकले आहे परया अशा  माणसांना करतात पिश्या  मग खिदळत जातात उडून  माणूस बसतो मरणात रुतून..." यावर परी स्तब्ध रा