Skip to main content

Posts

Showing posts from October, 2010

मैत्री

ध्यानि मनी नसताना.... एका क्षणी.. आयुष्यात मैत्री प्रवेशते... हिरव्या श्रावणात.. हातावर रंगलेल्या.. मेंदी सारखी.. आयुष्यभर.. आठवत रहाते...! मैत्री म्हणजे.. एकमेकांना समजणं.. आणि समजावणं असतं... मैत्री म्हणजे.. कधी कधी.. स्वत:लाच आजमावणं असतं.... घट्ट लावलेलं मनाचं दार.. मैत्रीत अलगद उघडतं.. हळ्व्या मनात जपलेलं 'अलगुज' अवचित ओठांवर येतं.. मैत्री मधुनच जन्म घेतं.. निखळ प्रेमाचं रोपटं... ' प्रेम '! परमेश्वरानं माणसाला दिलेली.. सर्वात सुंदर गोष्ट ! मित्राचा 'सखा' आणि मैत्रीणीची 'सखी'... मैत्रीतुनच फुलतात नाती.. फुलपाखरासारखी... इंद्रधनुष्यी रंग लेवुन.. फुलपाखरु आकाशात झेपावते.. हिरव्या श्रावणातली मेंदी.. आणखीनच रंगत जाते.........
disawar satta king