Skip to main content

Posts

Showing posts from October, 2017

कनवाळू

सुक्या मडकीत । पाणी ओले राही  दाण्यांतली लाही । सुखरूप  घटकेचे आलों । तरी घट फोडू  ढुंगावर ओढू । नभ ओले  कातड्याचे जोडे । तैसेच हे डोळे  देवें  बनविलें । आम्हांमापें  मनातले दाणे । भाजाया खापर  त्याच्यात वापर । भिक्षेसाठी  नाही कसा म्हणू । ईश्वर कृपाळू  येतें  मुळूमुळू । रडू सुके  : कनवाळू  : दिवेलागण  : आरती प्रभू 

हसूनीच विसरावें.

कष्ट घेत अंगावर      हसूनही हासवावें  आणि उगाच उथळ      बोलूनही बोलवावे  - कसे तुही म्हणावे त्या      किती धीराचे जीवन  समाधीचं जीवनाची ,      वर तगर ढळते; विसाव्यास गवळण      उर फुटे तो भांडते .  उगाच का असे काही      तुला तरी कळवावे  तुझे अजाण कौतुक      हसूनीच विसरावें.  : हसुनीच विसरावे  : मेंदी  : इंदिरा संत 

का कळते

मातीची खोल ओढ      गगनाचा एक वेध  पाण्याचे गडद मौन ,      वाऱ्याचे  अधिरेपण .....      हे असले , कां कळते .....  जीवाचा करून धूप      तुजभवती घमघमते - हे असलें , का कळते .....  : का कळते  : मेंदी  : इंदिरा संत 

घुंगुर

टाकून अवघा तोल तुझ्यावर      ढगाढगांतुन चालायचे ; कुंपणतारावरून विजेच्या      खुशाल पाऊल टाकायाचे .  -तूंच लाविली ओढ अशी ही .      धूळ निघाली उंच उंच वर ; जमिनीवरून सुटले पाऊल      गळले पायांमधले घुंगुर .  : घुंगुर  : मेंदी  : इंदिरा संत 

साथ

हा रस्त्यावरचा      दीप क्षीण तेजात  ठेवतो एकटा      भीषण काळोखात .  -तिष्ठते कुणीतरी      समोरच्या खिडकीत  केव्हढी तयाची      सोबत आणि साथ .  : साथ  : मेंदी  : इंदिरा संत 

गंध

हिरव्याशा गवतात      हळदिवी फुले , हलकेच केसरांत      दूध भरू आले .  उभ्या उभ्या शेतांमध्ये      सर कोसळली  केवड्याची सोनफडा      गंधें ओथंबली .  बकुळीच्या आसपास      गंधवती माती ,  उस्कटून रानपक्षी      काही शोधिताती .  : गंध  : जोगवा  : आरती प्रभू 

गर्व

घरादारा गर्व  गर्व तुळशीचा  तुळशीला गर्व  वाती - रांगोळीचा.  रांगोळीला गर्व  सवाष्ण हाथांचा , हाथानां अन गर्व  मंजुळ चुड्यांचा .  घरादारा गर्व  केळीच्या बनाचा,  संसाराला गर्व  शीतलपणाचा.  गर्व ऐसा थोर  दिवेलागणीचा , ओटीवर हसे  झोपाळा कड्यांचा  ओशाळला राजा  चौदा चौकड्यांचा .  : गर्व  : नक्षत्रांचे देणे  : आरती प्रभू 

एकजणे

मौनाचा तो रंग । तुझे डोळेपण  काजळा ग देणं । लागे ज्योती  दिस विसाविता ।मनचि पांगले  मोगरीचे कळे  । ठायीं  ठायीं  साद न ये घालू । उरीच्याही लयी  नाद वाहों  जाई  । चहोकडे  पुष्पशेजेपरी । आगीचं अंथरू  मी - तू पण करूं । पांघरूण  होतील ग अंगें । राख एके ठायीं  तुझीमाझी येई । वेगळू  का ? ऐशा वसतीची  । आम्ही एकजणे  पाठमोरें होणें । डोळापणी  : एकजणे  : दिवेलागण  : आरती प्रभू 

स्वगत

एका रिमझिम गावी  भरून आहे हृदयस्थ  तान  पण  स्वगत विसरून तिथे  जाता आले पाहिजे  चालून जाता येण्यासाठी  पायतळी आहे माती  पण  जाणे न जाणे तरी कुणाच्या हाती ? : स्वगत  : दिवेलागण  : आरती प्रभू 

शांताकार

ऐलथडी आले । रंग रंग रंग । जाहले पतंग । वेडेपिसे । पैलथडी गेले । न्हावोनिया  रंग । जाहले पतंग । हळदिवे । व्याले ऐलपैल । दिवे दिवे दिवे । पतंगाचे थवे । शांताकार । : शांताकार  : दिवेलागण  : आरती प्रभू 
disawar satta king