Skip to main content

Posts

Showing posts from April, 2013

अन प्रेमासाठी मिटून घेते ओठ ......

मी नखलत नाही शिरा कोवळ्या ओल्या  दुमडून कडांना दुखवत नाही देठ .....  मी फक्त ठेवते उजेड हिरवा आत  अन प्रेमासाठी मिटून घेते ओठ ......  : अरुणा ढेरे 

जेव्हा मी ....

जेव्हा मी या अस्तित्व पोकळीत नसेन तेव्हा एक कर तू निःशंकपणे डोळे पूस. ठीकच आहे, चार दिवस- उर धपापेल, जीव गुदमरेल. उतू जणारे हुंदके आवर, कढ आवर. उगिचच चीर वेदनेच्या नादी लगू नकोस खुशाल, खुशाल तुला आवडेल असे एक घर कर मला स्मरून कर, हवे तर मला विस्मरून कर. - नारायण सुर्वे

एक हात तुझा एक हात माझा

एक हात तुझा एक हात माझा  जसा शब्द खुजा शब्दापाशी  एका हृदयाला एकच क्षितीज  आकाशाचे बीज तुझ्या पोटी  एका कुशीसाठी एकाचे निजणे  बाकीची सरणे स्मशानात  : ग्रेस