Skip to main content

Posts

Showing posts from August, 2022

आता विसाव्याचे क्षण

आता विसाव्याचे क्षण माझे सोनियाचे मणी सुखे ओवीत ओवीत त्याची ओढतो स्मरणी काय सांगावे नवल दूर रानीची पाखरे ओल्या अंगणी नाचता होती माझीच नातरे कधी होती डोळे ओले मन माणसाची तळी माझे पैलातले हंस डोल घेती त्याच्या जळी कशी पांगल्या प्रेयसी जुन्या विझवून चुली आश्वासती येत्या जन्मी होऊ तुमच्याच मुली मणी ओढता ओढता होती त्याचीच आसवे दूर असाल तिथे हो नांदतो मी तुम्हांसवें :बा भ बोरकर