Skip to main content

एवढे लक्षात ठेवा

उंची न आपुली वाढतेफारशी वाटून हेवा ।
श्रेय ज्याचे त्यास द्यावेएवढे लक्षात ठेवा ॥

ती पूर्वजांची थोरवीत्या पूर्वजांना गौरवी ।
ती न कामी आपुल्याएवढे लक्षात ठेवा ।।

जाणते जे सांगतीते ऐकून घ्यावे सदा ।
मात्र तीही माणसेएवढे लक्षात ठेवा ॥

चिंता जगी या सर्वथाकोणा न येई टाळता ।
उद्योग चिंता घालवीएवढे लक्षात ठेवा ॥

विश्वास ठेवावाच लागेव्यवहार चाले त्यावरी ।
सीमा तयाला पाहिजेएवढे लक्षात ठेवा ॥

दुप्पटीने देतसे जोज्ञान आपण घेतलेले ।
तो गुरूचे पांग फेडीएवढे लक्षात ठेवा ॥

माणसाला शोभणारेयुद्ध एकच या जगी ।
त्याने स्वतःला जिंकणेएवढे लक्षात ठेवा ॥


: विं. दा. करंदीकर 

Comments

Popular posts from this blog

भंगु दे काठिन्य माझे

भंगु दे काठिन्य माझे
आम्ल जाऊं दे मनींचे;
येऊ दे वाणीत माझ्या
सूर तूझ्या आवडीचे.

ज्ञात हेतूतील माझ्या
दे गळू मालिन्य,आणि
माझिया अज्ञात टाकी
स्फूर्ति-केंद्री त्वद्‌बियाणे.

राहु दे स्वातंत्र्य माझे
फक्त उच्चारातले गा;
अक्षरा आकार तूझ्या
फुफ़्फ़ुसांचा वाहु दे गा.

लोभ जीभेचा जळू दे
दे थिजु विद्वेष सारा
द्रौपदीचे सत्व माझ्या
लाभु दे भाषा शरीरा.

जाऊ दे कार्पण्य ’मी’चे
दे धरू सर्वांस पोटी;
भावनेला येऊ दे गा
शास्त्रकाट्य़ाची कसोटी.

खांब दे ईर्ष्येस माझ्या
बाळगू तूझ्या तपाचे;
नेउं दे तीतून माते
शब्द तूझा स्पंदनाचे

त्वसृतीचे ओळखू दे
माझिया हाता सुकाणू;
थोर यत्ना शांति दे गा
माझिया वृत्तीत बाणू.

आण तूझ्या लालसेची;
आण लोकांची अभागी;
आणि माझ्या डोळियांची
पापणी ठेवीन जागी.

धैर्य दे अन्‌ नम्रता दे
पाहण्या जे जे पहाणे
वाकुं दे बुद्धीस माझ्या
तप्त पोलादाप्रमाणे;

घेऊ दे आघात तीते
इंद्रियद्वारा जगाचे;
पोळू दे आतून तीते
गा अतींद्रियार्थांचे

आशयाचा तूच स्वामी
शब्दवाही मी भिकारी;
मागण्याला अंत नाही;
आणि देणारा मुरारी.

काय मागावे परी म्यां
तूहि कैसे काय द्यावे;
तूच देणारा जिथे अन्‌
तूंच घेणारा स्वभावे!!

- बा. सी. मर्ढेकर


असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर

असेजगावेछाताडावरआव्हानाचेलावुनअत्तर नजररोखुनीनजरेमध्येआयुष्यालाद्यावेउत्तर
नकोगुलामीनक्षत्रांचीभीतीआंधळीताऱ्यांची आयुष्यालाभिडतानाहीचैनकरावीस्वप्नांची असेदांडगीईछाज्याचीमार्गतयाला

शब्द

घासावा शब्द । तासावा शब्द  ।
तोलावा शब्द । बोलण्यापूर्वी  ।।

शब्द हेचि कातर । शब्द सुईदोरा ।
बेतावेत शब्द  । शास्त्राधारे ।।

बोलावे नेमके ।  नेमके , खमंग खमके ।
ठेवावे भान । देश , काळ, पात्राचे ।।

बोलावे बरे । बोलावे खरे ।
कोणाच्याही मनावर । पाडू नये चरे ।।

कोणाचेही वर्म । व्यंग आणि बिंग ।
जातपात धर्म । काढूच नये ।।

थोडक्यात समजणे । थोडक्यात समजावणे ।
मुद्देसूद बोलणे । हि संवाद  कला ।।

शब्दांमध्ये झळकावी । ज्ञान, कर्म , भक्ती ।
स्वानुभावातून जन्मावा । प्रत्येक शब्द ।।

शब्दांमुळे दंगल । शब्दांमुळे मंगल ।
शब्दांचे हे जंगल । जागृत राहावं ।।

जीभेवरी ताबा । सर्वसूखदाता ।
पाणी , वाणी , नाणी । नासू  नये ।।

: संत तुकाराम