Skip to main content

Posts

Showing posts from March, 2013

सोडले कालच्या किनारयाला

सोडले कालच्या किनारयाला  वादळे घेतली निवारयाला घेतले मी नवे पुन्हा फासे  हारण्याची नशा झुगारयाला..... 

आयुष्‍य तेच आहे

आयुष्‍य तेच आहे अन् हाच पेच आहे बोलु घरी कुणाशी तेही सुनेच आहे तू भेटसी नव्‍याने बाकी जूनेच आहे केलीस याद तु ही का हे खरेच आहे - संगीता जोशी

किती सोसाव्या साजणा

किती सोसाव्या साजणा  तुझ्या ओळखीच्या कळा तुझ्या सहज स्वप्नात  माझ्या वेदनेच्या वेळात  वाट शपथांची वळे दाट विश्वासाचे रान  किती विस्ताराव्या हाका  तुझे हलेचना पान  कशी अक्षरे भोगावी  तुझ्या खेळी जाती बळी  रक्त चांदण्यात न्हाती  गर्द कवितांची तळी.... : अरुणा ढेरे  : यक्षरात्र