Skip to main content

Posts

Showing posts from May, 2011

What is friendship?

  What is friendship?  What is the meaning of this relationship? We have often thought answers to these questions, yet we have never come up with an adequate answer. This is because this relationship is an amalgamation of beautiful and complex feelings, which may not often be described in words. Defining a relationship is never easy, as there are so many facets to it. However we don't need a bunch of words to make us realize the deep meaning of friendship. According to George Elliot "Friendship is the inexpressible comfort of feeling safe with a person, having neither to weigh thoughts nor measure words." This heartwarming expression captures the essence of friendship. When two people share a strong bond of mutual understanding, respect and love it lays the foundation stone for an everlasting friendship. This bond just gets stronger with time; the trust between the two people grows and so does the attachment.This is the beauty of the relationship and is the essential

हास्य उधळून निघालो

हास्य उधळून निघालो दु:ख कुरवाळून निघालो ती लाजली जराशी स्वप्नांत होरपळून निघालो हात धरला तीने स्पर्शात विरगळून निघालो चेहरा लपवला हातात चंद्र माळून निघालो मिठीत घेतलं अलगद कापसात पिंजून निघालो भार ओठांचा दिला ओठांना अमृत चगळून निघालो बट सावरली केसांची मेघात जळून निघालो “काय करतोस” पुटपुटली भावना आवळून निघालो लाजून “ईश्य” म्हणाली शब्दात पोळून निघालो “येते मी आता” मी अश्रूं गिळून निघालो - सुरेश भट

Lyf moves fast,so stay in touch..♥

‎1 day v all wil b sitting n thinking hard abt lyf..... Hw it changed frm simple colege lyf 2 strict professional lyf Hw pocket money changed 2 huge monthly paycheques, Bt gvs less happiness. Hw a few local jeans changed 2 new branded wardrobe, Bt less occasions 2 use them. Hw a single plate of samosa changed 2 a full pizza, Bt hunger is less. Hw a bike alwys in reserve changed 2 a car alwys on, Bt less places 2 visit. Hw 2 save evry single rupee 2 rechrg cel phon changed 2 postpaid conectn, Bt les ppl 2 talk 2. Lyf moves fast,so stay in touch..♥

हसत माझा मला परत दे श्वास तु

एकदा हास तु, एकदा हास तु, हसत माझा मला परत दे श्वास तु || ध्रु || ऐक आतातरी पुस ही आसवे बोल माझ्या सवे बैस माझ्यासवे का तुझा जाळिशी व्यर्थ मधुमास तु हसत माझा मला परत दे श्वास तु || १ || वेदनेला कुणी हाक मारु नये, भेटलेल्या सुखा दुर सारु नये, विसर ही काळजी विसरुनी आभास तु, हसत माझा मला परत दे श्वास तु || २ || एकटे मी तुला आठवावे किती, गीत वेडे तुझे गुणगुणावे किती, दे जरासा तुझा मधुर सहवास तु, हसत माझा मला परत दे श्वास तु || ३ || - सुरेश भट

हासताना प्राण गेला का तुला आले रडे?

हासताना प्राण गेला का तुला आले रडे? हे पहा हे लोक सारे कोरडेच्या कोरडे! का अशी मागून ही ढाळशी तू आसवे? संपलो केव्हाच मी त्या तुझ्या स्वप्नासवे. तारकांनाही न आता खूण माझी सापडे! तू असा छेडू नको अंतरीचा जोगिया; हो चिता माझी पुन्हा लागली जागावया. ही पहा ही राख माझी वारियासंगे उडे! एकदा नेञी तुझ्या चांदणे मी वेचले; एकदा ओठी तुझ्या गीत माझे गुंफिले. आज अस्थाईच माझी अंतऱ्यापाशी अडे! - सुरेश भट

हा असा चंद्र अशी रात फ़िरायासाठी

हा असा चंद्र अशी रात फ़िरायासाठी तूच नाहीस इथे हात धरायासाठी ! चेहरा तो न इथे, ही न फ़ुलांची वस्ती, राहिले कोण आता सांग झुरायासाठी ! कालचे तेच फ़िके रंग नकोसे झाले दे तुझा ओठ नवा रंग भरायासाठी ! आडवी एक तिथे भिंत मनाची आली दार होतेच कुथे आत शिरायासाठी ! नेहमीचेच जुने घाव कशाला मोजू ये गडे आज उभा जन्म चिरायासाठी ! - सुरेश भट

उजाडल्या वरी सख्या निघूनी जा घराकडे,

उजाडल्या वरी सख्या निघूनी जा घराकडे, अजुनही उशीवरी टिपूर चांदणे पडे… उगीच वेळ सारखी, विचारतोस काय तू , पून्हा पून्हा मिठीतही शहारतोस काय तू … पुन्हा अशी हवी तशी कुणास रात्र सापडे ? अजून कुंतलात या तुझा न जीव गुंतला, अजून पाकळ्यातला मरंदही नही संपला… अजूनही कसे तुझे लबाड ओठ कोरडे…. अजून थांब लागली जगास झोप आंधळी दिसेल या नभातही हळूच रात्र सावळी… तुला मला विचारुनी फुटेल आज तांबडे ! उजाडल्या वरी सख्या निघूनी जा घराकडे, अजुनही उशीवरी टिपूर चांदणे पडे… :  एल्गार,  : सुरेश भट

तरुण आहे रात्र अजूनि, राजसा निजलास का रे

तरुण आहे रात्र अजूनि, राजसा निजलास का रे एवढयातच त्या कुशीवर, तू असा वळलास का रे अजूनही विझल्या न गगनी, तारकांच्या दीपमाळा अजून मी विझले कुठे रे, हाय तू विझलास का रे सांग या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू उमलते अंगांग माझे, आणि तू मिटलास का रे बघ तुला पुसतोच आहे, पश्चिमेचा गार वारा रातराणीच्या फुलांचा गंध तू लूटलास का रे उसळती हृदयात माझ्या, अमृताच्या धूंद लाटा तू किनार्‍या सारखा पण कोरडा उरलास का रे ओठ अजूनि बंद का रे, श्वास ही मधुमंद का रे बोल शेजेच्या फुलावर, तू असा रुसलास का रे - सुरेश भट

मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग

मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग राजसा किती दिसात, लाभला निवांत संग… त्या तिथे फुलाफुलात, पेंगते अजून रात हाय तू करु नकोस, एवढयात स्वप्न भंग… दूर दूर तारकांत, बैसली पहाट न्हात सावकाश घे टिपून एक एक रुपरंग… गार गार या हवेत घेऊनी मला कवेत मोकळे करुन टाक एकवार अंतरंग… ते तुला कसे कळेल, कोण एकटे जळेल सांग का कधी खरेच, एकटा जळे पतंग… काय हा तुझाच श्वास, दरवळे इथे सुवास बोल रे हळू उठेल, चांदण्यावरी तरंग…. - सुरेश भट

मलमली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे

मलमली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे मोकळ्या केसात माझ्या, तू जीवाला गुंतवावे.. लागुनि थंडी गुलाबी, शिरशिरी यावी अशी ही राजसा माझ्यात तू अन् मी तुझ्यामाजी भिनावे.. कापर्‍या माझ्या तनूची तार झंकारुन जावी रेशमी संगीत स्पर्शाचे, पुन्हा तू पेटवावे.. रे तुला बाहुत माझ्या, रुपगंधा जाग यावी मी तुला जागे करावे, तू मला बिलगून जावे… - सुरेश भट

मी अश्रूंच्या डोहामध्ये बुडलो नाही

मी अश्रूंच्या डोहामध्ये बुडलो नाही तसा वेदनेला ही मी आवडलो नाही अता किनारे आणि बंधने कशास मजला पापण्यांत जर कधी कुणाच्या अडलो नाही मान्य मला मी इथे यायला नकोच होते उजाड स्वप्ने बघून ही गडबडलो नाही मी सूर्याचे वार झेलले छाती वरती कधी सावलीआड स्वतःच्या दडलो नाही दूर तुला जाताना येथे पहात होतो निघून गेले प्राण तरी तडफडलो नाही फूल कसे हे फुलण्या आधी सुकून गेले कलेवरावर कधी मनाच्या रडलो नाही काल भेटली तेव्हा ती पूर्वीगत हसली मी ही अन रडताना मग अवघडलो नाही शब्द म्हणाले सर्व भावना निघून गेल्या हाय कधी अर्थाला मी सापडलो नाही - सुरेश भट

कोण जाणे कोण हे जवळून गेले?

कोण जाणे कोण हे जवळून गेले? चांदणे रक्तामध्ये मिसळून गेले! जिंकला होता जरी मी डाव तेव्हा, दान जे पडले मला उधळून गेले! भेटण्यासाठी कुणी आलेच नाही… लोक आलेले मला चघळून गेले! हे खरे की, मी जरा चुकलोच तेव्हा, लोकही वाटेल ते बरळून गेले! लागली चाहूल एकांती कुणाची? कोण माझ्या लोचनी तरळून गेले? काय माझ्या मालकीचे अर्थ होते? शब्द माझे भाबडे हुरळून गेले! या दुपारी मी कुणाला हाक मारु? ओळखीचे चेहरे वितळून गेले! कोणता कैदी इथे कैदेत आहे? रंग भिंतींचे कसे उजळून गेले! पाठमोरा मी जरी झालो,तरीही सूर्य येणारे मला कवळून गेले! - सुरेश भट

काय जे समजायचे ते शेवटी समजून गेलो!

काय जे समजायचे ते शेवटी समजून गेलो! मी तुझ्या आशेत सारी जिंदगी उधळून गेलो! चारचौघांसारखे मज बोलणे जमलेच नाही, सांग तू आता शहाण्या, काय मी बरळून गेलो? मी अता घेणार नाही माप श्वासांच्या गजांचे… जन्मठेपेतून माझ्या आज मी निसटून गेलो! का तुम्ही ठेवाल माझी याद येणाऱ्या पिढ्यांनो? मी तुम्हासाठीच तेव्हा कोरडा बहरून गेलो! आज कैशी आपुली ही भेट ताटातूट झाली? भेटतांना ऐन वेळी मी कुठे हरवून गेलो? मी चुका केल्या तरीही काय हे नाही परेसे? मी करोडो माणसांची अंतरे उजळून गेलो! जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला- मी इथे हे अमृताचे रोपटे रुजवून गेलो! - सप्तरंग, सुरेश भट

सुखाच्या सावल्या साऱ्या कश्या वेडावुनी जाती

सुखाच्या सावल्या साऱ्या कश्या वेडावुनी जाती जसा मी फोडतो टाहो तश्या ह्या तोडती नाती कधी वाटे पुढे जावे सुखाला दुःख सांगावे सुखाची पाहुनी दुःखे अता माझी फुटे छाती उभा कापूर जन्माचा उडाला आरतीआधी कश्या ह्या सांजवेळेला दिव्यांच्या कोरड्या वाती - सुरेश भट

मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो !

मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो ! तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो ! असेच रोज नाहुनी लपेट उन्ह कोवळे, असेच चिंब केस तू उन्हात सोड मोकळे तुझा सुगंध मात्र मी इथे हळुच हुंगतो ! अशीच रोज अंगणी लवून वेच तु फुले, असेच सांग लजुनी कळ्यांस गूज आपुले; तुझ्या कळ्या,तुझी फुले इथे तिपुन काढतो ! अजून तू अजाण ह्या, कुवार कर्दळीपरी; गडे विचार जणत्या जुईस एकदा तरी : “दुरुन कोण हा तुझा मरंद रोज चाखतो?” तसा न राहिला अता उदास एकटेपणा; तुझी रुपपल्लवी जिथे तिथे करी खुणा; पहा कसा हवेत मी तुझ्यासवे सळाळतो ! - सुरेश भट

सांगा कुणीतरी या आकाशखाजव्यांना-

सांगा कुणीतरी या आकाशखाजव्यांना- “मातीच मोक्श देई कंगाल नागव्यांना!” आहे जरी उभा मी निष्पर्ण माळरानी या स्वप्नपाखरांच्या रोखू कसा थव्यांना? आली नव्या जगाची आली पहाट आली आता उन्हात आणू पाळीव काजव्यांना! येती जरी समोरी सारे नकोनकोसे मीही नकोनकोसा झालो हव्याहव्यांना साधाच मी भिकारी, माझी रितीच झोळी गावात मान त्यांच्या श्रीमंत जोगव्यांना! प्रत्येक आतड्याचा मी पीळ होत आहे ते मात्र गाठ देती त्यांच्याच जानव्यांना! - सुरेश भट

मी असा त्या बासरीचा सूर होतो!

मी असा त्या बासरीचा सूर होतो! नेहमी ओठांपुनी मी दूर होतो! प्रीतही आली फुलांच्या पावलांनी हाय, मी चिंध्यांत माझ्या चूर होतो! राहिल्या आजन्म चिंतामुक्त चिंता… मी घरोब्याचे जुने काहूर होतो! तू किती केलास भेटीचा अचंबा.. भूतकाळाचा जणू मी धूर होतो! मी न साधी चौकशी केली घनांची ऐन वैशाखातला मी पूर होतो! कोणत्या स्वप्नास आता दोष देऊ? जीवनाला मीच नामंजूर होतो! तेवते आहेस तू पूजेत कोठे? एकदा मीही तुझा कापूर होतो! - सुरेश भट

सूर मागू तुला मी कसा ?

सूर मागू तुला मी कसा ? जीवना तू तसा, मी असा ! तू मला, मी तुला पाहिले एकमेकांस न्याहाळिले दुःख माझातुझा आरसा ! एकदाही मनासारखा तू न झालास माझा सखा खेळलो खेळ झाला जसा ! खूप झाले तुझे बोलणे खूप झाले तुझे कोपणे मी तरीही जसाच्या तसा ! रंग सारे तुझे झेलुनी शाप सारे तुझे घेउनी हिंडतो मीच वेडपिसा ! काय मागून काही मिळे ? का तुला गीत माझे कळे ? व्यर्थ हा अमृताचा वसा ! गीत – सुरेश भट संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर स्वर – अरुण दाते

दुभंगून जाता जाता मी अभंग झालो !

दुभंगून जाता जाता मी अभंग झालो ! चिराचिरा जुळला माझा, आत दंग झालो ! सल जुनेच सलता सलता सुखावून गेले ! अन्‌ हळूच गुणगुणती हे वळ न मोजलेले ! कशी कथा सरता सरता पूर्वरंग झालो ! किरण एक धरुनी हाती मी पुढे निघालो ! अन्‌ असाच वणवणताना मी मला मिळालो ! सर्व संग सुटले; माझा मीच संग झालो ! ज्ञानदेव लिहुनी गेले ओळओळ भाळी ! निमित्तास माझे गाणे, निमित्तास टाळी ! तरू काय ? इंद्रायणिचा मी तरंग झालो ! कुठे दिंड गेली त्यांची कळेना बिचारी ! मी इथेच केली माझी सोसण्यात वारी ! ’पांडुरंग’ म्हणता म्हणता ’पांडुरंग’ झालो ! गीत – सुरेश भट संगीत – गजानन वाटवे स्वर – गजानन वाटवे

आताच अमृताची बरसून रात गेली

आताच अमृताची बरसून रात गेली आताच अंग माझे विझवून रात गेली मजलाच हाय माझे जपता न भान आले मजलाच ऐनवेळी उधळून रात गेली उरले जरा जरासे गगनात मंद तारे हलकेच कूस माझी बदलून रात गेली अजूनी सुगंध येई दुलईस मोगर्‍याचा गजरा कसा फुलांचा विसरुन रात गेली गीत – सुरेश भट संगीत – रवि दाते स्वर – सुरेश वाडकर

समजावुनी व्यथेला समजावता न आले !

समजावुनी व्यथेला समजावता न आले ! मज दोन आसवांना हुलकावता न आले ! सर एक श्रावणाची आली … निघुन गेली… माझ्या मुक्या ञुषेला पण बोलता न आले? सुटला कधी न जो मी मज घातला उखाणा; माझ्याच उत्तराला मज शोधता न आले! चुकवुनही कसा हा चुकला न शब्द न माझा देणे मलाच माझे नाकारता न आले ! लपवीत गीत माझे पळ काढला तरीही ह्रुदयांतल्या विजांना झिडकारता न आले! केले जरी खुलासे मीही नकोनकोसे, जगणे अखरे माझे मज टाळता न आला! - सुरेश भट

शेवटी वेदमंत्रांनी अन्याय एवढा केला

शेवटी वेदमंत्रांनी अन्याय एवढा केला मशहूर ज्ञानया झाला….गोठ्यातच जगला हेला अडवून जरी शब्दांनी भरपूर खुशामत केली दारात वर्तमानाच्या मी अर्थ उद्याचा नेला! घासते घरोघर भांडी स्वप्नांची राजकुमारी वणवणतो पोटासाठी हा राजपुत्र अलबेला ही कुण्या राजधानीची कापती अजुन खिंडारे? का कुणी कलंदर येथे गुणगुणत सुळावर गेला? पुसतात जात हे मुडदे मसणात एकमेकांना कोणीच विचारत नाही-”माणूस कोणता मेला?” जर हवे मद्य जगण्याचे….तर हवी धुंद जन्माची तू विसळ तुझ्या रक्ताने हृदयाचा फुटका पेला! - एल्गार, सुरेश भट

कुठलेच फूल आता मजला पसंत नाही

कुठलेच फूल आता मजला पसंत नाही कळते मला अरे हा माझा वसंत नाही हा कालच्या विषाचा दिसतो नवीन प्याला समजू नकोस माझ्या फसण्यास अंत नाही जमवूनही तुझ्याशी माझेतुझे जमेना इतका तुझ्याप्रमाणे मी शोभिवंत नाही मी सोडणार नाही हे गाव आपल्यांचे सारीच माणसे अन् कोणीच संत नाही थकुनी किती प्रवासी पडले धुळीत मागे.. रस्त्यास वाहणार्‍या कसलीच खंत नाही मजला दिलेस कां तू वरदान विस्तवाचे? दुनिये, अता रडाया मजला उसंत नाही दारात दु:खितांच्या मी शब्द मागणारा (तितकी अजून माझी कीर्ती दिगंत नाही) मी रंग पाहिला ह्या मुर्दाड मैफलीचा.. कुठल्याच काळजाचा ठोका जिवंत नाही! – एल्गार, सुरेश भट

आसवांच्या सरी बोलती

आसवांच्या सरी बोलती मी न बोले, तरी बोलती ऐक डोळेच माझे अता ओठ काहीतरी बोलती संत मोकाट बेवारशी सांड संतापरी बोलती बांधती चोर जेव्हा यशे “ही कृपा ईश्वरी”- बोलती शांत काटे बिचारे परी ही फुले बोचरी बोलती तेच सापापरी चावती जे असे भरजरी बोलती रोग टाळ्या पिटू लागले “छान धन्वंतरी बोलती !” झुंजणारे खुले बोलती बोलणारे घरी बोलती - एल्गार, सुरेश भट

मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते!

मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते! कुठेतरी मी उभाच होतो… कुठेतरी दैव नेत होते! वसंत आला पुढे, तरीही सुगंध मी घेतलाच नाही! उगीच का ताटवे फुलांचे मला शिव्याशाप देत होते? कुठेतरी पाहिले तुला मी, जरी तुझे नाव आठवेना… करू तरी काय? हाय, तेंव्हा खरेच डोळे नशेत होते! असूनही बेचिराख जेंव्हा जगायचे श्रेय जिंकले मी, कितीतरी लोक आसवांची प्रमाणपत्रेच घेत होते! जरी जिवाला नकोनकोशी हयात हासून काढली मी निदान जे दु:ख सोसले, ते सुखात होते! मजेत होते! बघून रस्त्यावरील गर्दी कशास मी पाहण्यास गेलो? धुळीत बेवारशी कधीचे पडून माझेच प्रेत होते! मला विचारू नकोस आता, कुठून हे शब्द आणले मी? तुझेच आलाप काल रात्री उसासणार्या हवेत होते! - झंझावात, सुरेश भट

हा ठोकरून गेला, तो वापरून गेला..

हा ठोकरून गेला, तो वापरून गेला.. जो भेटला मला तो वांधा करून गेला! वेशीवरी मनाच्या आले सवाल सारे माझा सवाल माझ्या ओठी विरून गेला माझ्याविना फुलांची दिंडी निघून गेली काटाच प्यार आता जो मोहरून गेला चाहूल ही तुझी की, ही हूल चांदण्याची? जो चंद्र पाहिला मी तोही दुरून गेला! केव्हाच आसवांची गेली पुसून गावे.. स्वप्नामधेच माझा रस्ता सरून गेला बोलू कुणास देई आकांत हा सुखाचा? मागेच दु:खितांचा टाहो मरून गेला! कानात कोठडीच्या किंचाळला झरोका- “बाहेर एक कैदी तारा धरून गेला!” आजन्म ही तुझी मी केल्यावरी प्रतीक्षा.. माझाच भास माझ्या अंगावरून गेला! - एल्गार, सुरेश भट

चुकलेच माझे!

मी कशाला जन्मलो? – चुकलेच माझे! ह्या जगाशी भांडलो! – चुकलेच माझे! मान्यही केलेस तू आरोप सारे, मीच तेव्हा लाजलो! – चुकलेच माझे! सांग आता, ती तुझी का हाक होती? मी खुळा भांबावलो! – चुकलेच माझे! भोवतीचे चेहरे सुतकीच होते, एकटा मी हासलो – चुकलेच चालताना ओळखीचे दार आले.. मी जरासा थांबलो! – चुकलेच माझे! पाहिजे पूजेस त्यांना प्रेत माझे! मी जगाया लागलो! – चुकलेच माझे! वाट माझ्या चार शब्दांचीच होती.. मी न काही बोललो! – चुकलेच माझे! कवी: सुरेश भट

येणारा दिवस मला हेटाळत हसणारच

येणारा दिवस मला हेटाळत हसणारच जाणारा दिवस मला जाताना डसणारच वरवरच्या बोलण्यात गेली बघ रात्र सरून मावळता चंद्र तुझे नाव मला पुसणारच देताना हृदय तुला केला मी हा विचार- ‘घेणारा घेणारच! देणारा फसणारच! ‘ हारूनही लाखवार माझी झाली न हार मी माझ्या स्वप्नांना फिरफिरून पिसणारच! माझे घर वार्‍याचे अन् पायच पार्‍याचे मी जगास रस्त्यावर गाताना दिसणारच! काही भलतेच लोक तेव्हा करतील शोक तेव्हाही मी त्यांच्या आसवांत नसणारच! - सुरेश भट

माझिया गीतात वेडे

माझिया गीतात वेडे दु:ख संतांचे भिनावे; वाळल्या वेलीस माझ्या अमॄताचे फूल यावे ! आशयांच्या अंबरांनी टंच माझा शब्द व्हावा; कोरडा माझा उमाळा रोज माधुर्यात न्हावा ! स्पंदने ज्ञानेश्वराची माझिया वक्षांत व्हावी; इंद्रियांवाचून मीही इंद्रिये भोगून घ्यावी ! एकनाथाने मलाही बैसवावे पंगतीला; नामयाहाती बनावे हे जिणे गोपाळकाला ! माझियासाठी जगाचे रोज जाते घर्घरावे; मात्र मी सोशीन जे जे ते जनाईचे असावे ! मी तुक्याच्या लोचनांनी गांजल्यासाठी रडावे; चोख वेव्हारात मझ्या मी मला वाटून द्यावे ! ह्याविना काही नको रे एवढे दे पांडुरंगा ! ह्याचसाठी मांडीला हा मी तुझ्या दारात दंगा ! - रंग माझा वेगळा, सुरेश भट

उशीरा उशीरा

कधी बोललो मी उशीरा उशीरा, कधी दान पडले उशीरा उशीरा आयुष्य अवघे चुकामुक आहे, मला हे समजले उशीरा उशीरा मला मागते ती दटावून आता, तिचे चित्र माझ्या खिशाआतले ते तिने पहिले हे तिचे श्रेय नाही, जरा मी लपवले उशीरा उशीरा !! जिवा गुंतवू पाहिले मी अवेळी, नको त्या स्थळी अन नको त्या प्रसंगी तिला सर्व वेळीच लक्षात आले, मला फार कळले उशीरा उशीरा अता प्राक्तनाचा उजाडेल तारा, किती जागुनी वाट मी पाहताहे कधी ना कळे नीज लागून गेली, सितारे झळकले उशीरा उशीरा किती पाहिली स्वप्न मी बेईमानी, अता खेदखंती कराव्या कशाला? मला सत्य आधीच ठाऊक होते, पुरावे गवसले उशीरा उशीरा ! गड्या, जिंदगी हाय जमलीच नाही, तिला मी-मला ती उमगलीच नाही जिण्याचा कधी पीळ गेलाच नाही जरी दोर जळले उशीरा उशीरा !! - नेणिवेची अक्षरे, संदीप खरे

अर्धीच रात्र वेडी अर्धी पुरी शहाणी

अर्धीच रात्र वेडी अर्धी पुरी शहाणी भोळ्या सदाफुलीची ही रोजची कहाणी फुलले पुन्हा पुन्हा हा केला गुन्हा जगाचा ना जाहले कुणाची पत्त्यामधील राणी येता भरून आले जाता सरून गेले नाही हिशेब केले येतील शाप कानी आता न सांध्य तारा करणार रे पहारा फुलणार नाही आता श्वासात मूढ गाणी शापू तरी कशाला या बेगडी जगाला मी कागदी फुलांनी भरतेच फुलदाणी गीत – विं. दा. करंदीकर संगीत – यशवंत देव स्वर – पद्मजा फेणाणी-जोगळेकर

रडण्याचेंही बळ नाही...

रडण्याचेंही बळ नाही; हसण्याचेही बळ नाही; मज्जा मेली; इथें आतां जीवबाची कळ नाही. संस्कृतीला साज नाही. मानवाला माज नाही; आज कोणा, आज कोणा, जीवनाची खाज नाही. इथें आतां युद्ध नाही; इथें आतां बुद्ध नाही; दु:ख देण्या, दु:ख घेण्या इथे आतं शुद्ध नाही. भावनेला गंध नाही; वेदनेला छंद नाही; जीवानाची गद्य गाथा वाहतें ही; बंध नाहीं! चोर नाही; साव नाही; मानवाला नांव नाही; कोळ्शाच भाव तेजीं कस्तुरीला भाव नाही. जागतें कैवल्या नाही; संशयाचे शल्य नाही; पापपुण्या छेद गेला. मुक्ततेला मूल्य नाही. जन्मलेल्या बाप नाही; संचिताचा ताप नाही; यापुढे या मानवाला अमृताचा शाप नाही. —-जाणीवेची याच साधी राहिली मागें उपाधीं; – या जडाच्या जांभया हो ना तरी आहे समाधी! - “मृदगंध” विंदा करंदीकर,

मी बोलले न काही नुसतेच पाहिले

मी बोलले न काही नुसतेच पाहिले हृदयात दाटलेले हृदयात राहिले परतून हाय जाण्या ओठांत शब्द आले डोळ्यांतले इषारे डोळ्यांत कैद झाले मी बंद पापण्यांनी हे सर्व साहिले देऊन सर्व काही नाही दिलेच काही ज्याला हवे कळाया कळलेहि त्यास नाही माझ्याच अंतरी मी हे फूल वाहिले निःशब्द आसवांनी समजाविले मनाला की शाप वेदनेचा प्रीतीस लाभलेला माझ्याच मी मनाशी हे गीत गायिले गीत – मंगेश पाडगावकर संगीत – विश्वनाथ मोरे स्वर – सुमन कल्याणपूर

आतां उजाडेल !

खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार लहरींत किरणांची कलाबूत मोहरेल आतां उजाडेल ! शुभ्र आनंदाच्या लाटा गात फुटतील आतां मृदु गळ्यांत खगांच्या किलबिल पालवेल आतां उजाडेल ! वारा हसेल पर्णांत मुग्ध हिरवेपणांत गहिंवरल्या प्रकाशी दहिंवर मिसळेल आतां उजाडेल ! आनंदात पारिजात उधळील बरसात गोड कोवळा गारवा सुगंधांत थरालेल आतां उजाडेल ! फुलतील नकळत कळ्यांतले देवदूत निळा-सोनेरी गौरव दिशांतून उमलेल आतां उजाडेल ! निळें आकाश भरून दाही दिशा उजाळून प्रकाशाचें महादान कणाकणांत स्फ़ुरेल आतां उजाडेल ! आज सारें भय सरे उरीं जोतिर्मय झरे पहाटेचा आशीर्वाद प्राणांतून उगवेल आतां उजाडेल ! - मंग॓श पाडगांवकर

तिची का रंगते मेंदी नका मागू खुलासा

तिची का रंगते मेंदी नका मागू खुलासा तिच्या रंध्रांत मी अद्यापही आहे जरासा जरी नाहीत भेटी , बोलणे नाही अता जगाच्या उंबऱ्याला लंघणे नाही अता कुणाला ना कळू देताच ती स्मरते मला मनाचा एक कप्पा राखलेला .. आपलासा कसा दाबून ठेवी हुंदका ती कोण जाणे कसे ते बंद झाले ओठही शिवल्याप्रमाणे कधी बेबंद झाले जर जुने आनंदगाणे जगाला ऐकु जाई फक्त तो हळवा उसासा किती पायांत बेड्या घातलेल्या आपल्यांनी असे जखडून नेले ती जणू की “बंदिनी” तरी पाहून गेली एकदा मागे वळूनी मला जगण्या पुरेसा एक तो आहे दिलासा - मंगेश पाडगांवकर

जरि या पुसून गेल्या साऱ्या जुन्या खुणा रे

जरि या पुसून गेल्या साऱ्या जुन्या खुणा रे हा चंद्र पाहताना होते तुझी पुन्हा रे त्या बावऱ्या कळीने ते स्वप्न पाहिलेले वेड्या क्षणास एका सर्वस्व वाहिलेले छळतो अजून जीवा तो लाजरा गुन्हा रे ते श्वास कापरे अन्‌ आभास सावल्यांचे रे चांदणेच झाले डोळ्यांत बाहुल्यांचे अन्‌ सूर सूर झाल्या त्या सर्व भावना रे नाही विचार केला, मी पाहिले न मागे आले तुझ्याकडे मी तोडून सर्व धागे का घालिता उडी ही घर आठवे कुणा रे ? मी घातली उडी हा नच दोष रे कुणाचा चुरडे कळी मनाची हा खेळ प्राक्तनाचा स्वप्ने विरुन येते हातात वंचना रे हरवून स्वप्न गेले, अश्रूच आज जागे वेडी तुझी कळी ही बघते वळून मागे का पापण्यांत मिटते निःशब्द वेदना रे ? गीत – मंगेश पाडगावकर संगीत – यशवंत देव स्वर – शोभा जोशी

डोळ्यांत सांजवेळी, आणू नकोस पाणी

डोळ्यांत सांजवेळी, आणू नकोस पाणी त्या दूरच्या दिव्यांना, सांगू नको कहाणी कामात गुंतलेले असतील हात दोन्ही तेव्हा नको म्हणू तू, माझी उदास गाणी वाटेवरी खुणेच्या, शोधू नको फुले ती ना ठेविते फुलांची माती इथे निशाणी कळणार हाय नाही, दुनिया तुला मला ही मी पापण्यांत माझ्या, ही झाकिली विराणी कवी : मंगेश पाडगावकर 

श्वास

खिडकीतून चांदण आत येत नाही  तो नुसताच भास असतो  खर तर..... चांदण्यासारखा भासणारा  तो तुझा भारावलेला श्वास असतो  : मंगेश पाडगावकर 

तरीही उरते बाकी

होतेका ते नुसते येणे आणिक जाणे होत्या का त्या नुसत्या गप्पा क्षेमकुशल अन स्मरणे ; होते का ते नुसते फिरणे - करड्या चढणीवरुणी हिरवी उतरण घेणे होते का ते नुसते बघणे क्षितीजावरची चित्र लिपी अन पायाखालील गवतावरची तुसें रेशमी निवांतवेळी आभाळाच्या पाटीवरती हिशोब मांडू बघता उरते बाकी चंद्र घेतला जरी हातचा तरीही उरते बाकी. - इंदिरासंत

तुला विसरण्यासाठी

तुला विसरण्यासाठी पट सोंगट्या खेळते; अकांताने घेता दान पटालाही घेरी येते! असे कसे एकाएकी फासे जळले मुठीत कशा तुझ्या आठवणी उभ्या कट्टीत.. कट्टीत! दिला उधळुन डाव आणि निघाले कुठेही जिथे तुझे असें… तुजे असे कांही नाही! द्रुष्टी ठेविली समोर, चालले मी ’कुठेही’त; कुठेही च्या टोकापाशी उभी मात्र तुझी मुर्त! वाट टाकली मोडुन आणि गाठला मी डोह; एक तोच कनवाळु माझे जाणिल ह्रुदय! नांव तुझे येण्याआधी दिला झोकुन मी तोल; डोह लागला मिटाया तुझी होऊन ओंजळ!! - इंदिरा संत

तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा

तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा पाण्यांत ओंजळीच्या आला चुकून मीन चमकून हो तसाच गाण्यांत अर्थ यावा शिंपीत पावसाळी सर्वत्र या लकेरी यावा अनाम पक्षी, स्पर्शू मलाच यावा. देतां कुणी दुरून नक्षत्रसे इषारे साराच आसमंत घननीळ होत जावा. पेरून जात वाळा अंगावरी कुणी जो, शेल्यापरी कुसुंबी वाऱ्यावरी वहावा. तारांवरी पडावा केव्हा चुकून हात: विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा. तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा, घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा - आरती प्रभू

गारठ्याची रात्र...

गारठ्याची रात्र...थंडाई हवेला..... चांदण्याची झील ओल्या जोंधळ्याला  दूर लखलखत्या दिव्यांनी गाव जागे  मी इथे कवळून माझ्या गोधडीला..... कवी : ना. धों . महानोर 

सरलं दळण

सरलं दळण ओवी अडली जात्यात  उभ्या जन्माचा उमाळा  कळ सोसून डोळ्यात..... कवी : ना. धों . महानोर 

You complete my soul

You are my heartbeat. You are my strength. You are the only true love I know. I am yours until the end. You saved me from all of my heartache, You wiped away my tears. You kissed away the bad dreams And blew away my fears. Sometimes I wonder what I did to deserve you. To know you is a mystery. To hold you, my one true wish. And to kiss your lips so softly, Oh... YOU are what true love is. Others can’t understand it, How we fell so fast. Showing all the people, That our love overcomes our past. So, now it comes time, To prove this love so true. Test after test, we show others That we’re stronger together,  Stronger than we ever knew. You are my other half, The missing link of me. You complete my soul, Like no other can ever be.

A Love Story Between Two Friends..♥ :)

A Love Story Between Two Friends..♥ :) (Have you Ever Been in LOVE with your Best friend ?? If yes then this is Something you'll Understand...) ... ...There was a Boy 'n a Girl, They were best friends for years 'n years, They could Talk for hours on the Phone 'n text each other for days, When They were Together; Not a single Sad Thought could cross their Minds, :) everything was Great, But One Day; The Boy did not Answer any Call or Reply to any Text for a Day, The Girl was worried that something was Wrong..:( at night She couldn't Sleep.., She was sitting in her Room Crying, 'n It was then that She Realized how much He Means to Her..♥ :( The next Morning; She woke Up from a Phone call.., It was the Boy..:) Boy : Hey.., Girl : Im so glad that you Called Me, What happened to you yesterday ?? Boy : I was Busy [ The GIRL Understood that; Something was Wrong but could not Ask] Boy : You know..; We should Stop talking..! Girl: What??.., But

पाऊस !

पाऊस ! निसर्गाचा एक उत्कृष्ट विभ्रम. ग्रीष्मानं व्याकुळलेल्या वसुंधरेचं आमंत्रण स्वीकारीत येणारे श्यामल मेघ काळजात घेऊन वावरण्याचं मन ज्याला आहे, त्याला मला काय म्हणायचंय ते समजू शकेल. ज्याला कुणाच्या तरी प्रेमात पडता येतं, ज्याला समरसून झोकून देता येतं आणि ज्याला स्वत:च्या व्यक्तित्वाचा विसर पाडून सृष्टिच्या या भुलभुलय्यात हरवता येतं, तो तर पाऊस जगतो. पाऊस जगता यायला हवा. पाऊस भोगता यायला हवा. पाऊस झेलून ज्यांची फक्त शरीरं भिजतात ते कधी पावसात भिजतच नाहीत. ज्यांना हे तुषार काळजापर्यंत जाणवतात, रक्तातले तरंग ज्यांच्या पापणीच्या काठाला येऊन भिडतात, तेच खरं तर पाऊस अनुभवतात........

Love me because I love you....

A lost young petal Wondering souls I see the dreams you seek Follow me please, if you dare. The Dream is coming For you and me. I returned by your side With a heart in my hand. It is like a bright fire dancing To the slow music turning. My heart as smooth as ivory Has turned to a lonely, sulfur. I retire my heart now to you, Love me because I love you.
disawar satta king