मोरपिसासारखी दोन बोटे डोळ्यावर फिरवून
ती माझ्यापुढे नाचवीत
एकदा तू म्हणालीस:
एक बोट धर पाहू.
मी विचारले : का? कशासाठी ?
तू म्हणालीस : मुकाट्याने बोट धर आधी.
सुलताना रझियाच्या गुलामाच्या आदबीनं
मी तुझे बोट धरले.
बोट सोडवून घेतलेस आणि टाळी वाजवलीस.
तेव्हा मात्र दचकलो:
हा तर शिरच्छेदाचा संकेत.
माझे भय कधीही खोटे बोलत नाही.
तू म्हणालीस : बिचारा तू
न धरलेल्या बोटावर तुझे नाव होते !!!!
: वसंत बापट
Comments
Post a Comment