Skip to main content

Posts

Showing posts from June, 2014

सांग तू आहेस का ?

त्या फुलांच्या गंधकोषी , सांग तू आहेस का ? त्या प्रकाशी तारकांच्या , ओतिसी तू तेज का ? त्या नभांच्या नीलरंगी होऊनिया गीत का ? गात वायूच्या स्वरांने , सांग तू आहेस का ? मानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का ? वादळाच्या सागराचे घोर ते तू रुप का ? जीवनी या वर्षणारा तू कृपेचा मेघ का ? आसमंती नाचणारी , तू विजेची रेघ का ? जीवनी संजीवनी तू , माऊलीचे दूध का ? कष्टणार्या बांधवांच्या रंगसी नेत्रात का ? मूर्त तू मानव्य का रे , बालकांचे हास्य का ? या इथे अन त्या तिथे रे , सांग तू आहेस का ? गीतकार : सूर्यकांत खांडेकर

आसवे

मैत्रीचे नाते होते अपुले जेंव्हा लागून ओढणी सहवासाची तेंव्हा मनी दाटून आल्या गोड भावना नाना अन एकांती मी ढाळीयले अश्रुना . मग जलस्नात त्या फुलांसारखे झाले मन माझे ताजे प्रसन्नतेने भरले . मी विवाहमाला तुझ्या घातली कंठी मजकडे पाहसी स्वर्ग आणुनी नेत्री त्या गभीरमंगल समयी डोळ्यांमधुनी निखळली आसवे : भरली मांगल्यानी घट सौख्याशेचा हृदयी आला भरून : जणू त्यातील आले उसळुनी बिंदू दोन . अन तेव्हापासून कितीकदा नयनात साठली आसवे , ओघळली जोमांत . जे आले अश्रू उसळून आनंदाने जाहली तयांची फुले तुझ्या स्पर्शाने ; त्या अश्रुफुलांचा गंध जई दरवळला संसार भासला मधुसुमनांचा झॆला ! मन गेले केव्हा दुः खाने व्याकळून ; असहायपनाने   भरुनी आले नयन तव नजर बोलतां परी शांत गंभीर हो इंद्रधनूपरी आर्त , पालटे नूर . जी तुझ्याचसाठी आली अन ओघळली , स्पर्शाने तुझिया फुलली , खुलली , हसली , ती आता आसवे कुठे जाहली गुप्त जी ढाळून व्हावे दुग्ध चित्त ह

स्वर वेडी

किलबिलताना रानपाखरे  स्वरबिंदूची सतारशिंपण  झेलून घेते अंगागावर  मी तरफांच्या तारा होऊन , गाजगाजता प्रचंड पिंपळ  काठाशी मी वाट पाहते : स्वरमेळाचीलाट अनावर  येता तिजवर झोकून देते  धुसर वेळी कधी लागतो  सूर जिव्हाळी पैलतीरावर : क्षणात होऊन विश्ववेगळी  पाय टाकते मी डोहावर ! : स्वर वेडी  : रंगबावरी  : इंदिरा संत 

साज

त्या दिवशीचा साज अजूनही  तसाच आहे अंगावरती ….  जळलहरींची सपात शामल  जुई -जाईची किनार जीवर , रेशीमपिवळे वस्त्र उन्हाचे  किरण जरीचे भरपदरावर ; सोनमखमली  कातीव चोळी , मोरपिसांची कुसर भुजांवर , बावरलेली काजळरेखा , सावरलेला बकुळवळेसर  त्या दिवशीचा साज अजूनही  तसाच आहे अंगावरती ….  : साज  : रंगबावरी  : इंदिरा संत 

सावध

आज अखंड मी जागी रात्र धरून डोळ्यात … आज अखंड सावध : कुठे पाखरू उडेल,  झेप तिरप्या पंखांची : कुठे रात्र डहुळेल  आज अखंड मी जागी : कुठे काजवा झुकेल , ओझरता झोत त्याचा: कुठे रात्र उजळेल ; उभा रक्ताचा  पहारा : कुठे फुटेल पाहत, कुठे दवाने भिजेल  पापणीचा कृष्णकाठ  आज अखंड मी जागी  रात्र धरून डोळ्यात …  : सावध  : रंगबावरी  : इंदिरा संत 

हाक

गेले विसरून डोळे , विसरून गेले कान केव्हाच मी केले त्यांना  कर्मकांडाच्या स्वाधीन ; आज क्षितिजापल्याड  कोण उभे ते दिसेना ; हाक ऐकली तरीही  कोणाची ते आकळेना ; ओठावरी आले विष, आल्या वेदना डोळ्यात  हाक आभाळा एवढि  गोठवीत हुंदक्यात .  : हाक  : रंगबावरी  : इंदिरा संत 

अवंढा

गिळला एक अवंढा  आणिक कथिले सारे , गिळला एक अवंढा  आणि समजले सारे, गिळला एक अवंढा  आणिक गीळले सारे .  अता न उरले काही  जे आहे सांगायचे , अता न उरले काही  जे आहे समजायाचे , अता न उरले काही  जे आहे सोसायाचे .  ते दिवस: बहर जाईचे , हे: आभाळ भुंडे बघणे , त्या आर्त चांदण्या रात्री , हि काळझोप नच ढळणे ; ते होते माझे जीवन , हि आता नुसती श्वसने ! : अवंढा  : रंगबावरी  : इंदिरा संत 

अस्वस्थ

किती कडाडली  वीज , किती घोंगावला वारा , किती झपाटले मेघ , किती कोसळल्या धारा ; झाकोळलेल्या फांद्यातून  फिक्या उन्हाचे ओहोळ , आता स्वस्थ भुरी हवा  आणि अस्वस्थशी वेळ ; ओल्या गर्द मातीवर  जर्द पाकळ्यांचे मौन , पानापानाच्या टोकाशी  अस्वस्थसा मुका कण .  :अस्वस्थ  : रंगबावरी  : इंदिरा संत 

डोळ्यापरिस लहान

डोळ्यापरिस  लहान  आज वाटते आकाश ; रात्र दिवसाचा काळ  झाला निमिष निमिष ! मन सुटून चालले  शरीराच्या मिठीतून ; विश्वापल्याडचे काही  काय गेले त्या स्पर्शून ? : डोळ्यापरिस  लहान  : रंगबावरी  : इंदिरा संत 

फुलवेडी

नको टाकुस उसासा  अशी दारात राहून: वळचणीच्या अबोलीचा  रंग जाईल उडून ; अशा शून्य नजरेने  नको राहू खिडकीशी : वेध घेऊन डोळ्यांचा  जाई होईल ग बाशी  नको घालू येरझारा , नको थांबू इथे तिथे  तुझ्या पदरझळीने  ताजी पाकळी गळते ; हवा फुलांचा शेजार  बाई , हासत रहावे; काळजाच्या कुपीमध्ये  हवाबंद दुःख व्हावे  : फुलवेडी  : रंगबावरी  : इंदिरा संत 

शीण

किती  चालावे चालावे  कधी कधी येतो शीण : वाटे घ्यावासा विसावा  कुठे कुणाशी थांबून … असे वाटता काहीसे  काही वाटेनासे होते;   भुते फुटती पायांना  वाट भिऊन पळते … : शीण  : रंगबावरी  : इंदिरा संत 

लिहून थोडे

लिहून थोडे लहान व्हावे  पघळावे  अन…  जीवकळेला .  जीभ माळवून घ्यावी कंठी ;       अथांग व्हावे  श्वासाश्वासातून तळाला .  : लिहून थोडे  : जोगवा  : आरती प्रभू 
disawar satta king