दोन गुरू : नाना पाटेकर ------------------- वयाच्या तेराव्या वर्षी ,1963 ला नोकरीला लागलो . दुपारी शाळा संपली की घरी असेल - नसेल ते खाऊन दोनच्या सुमारास आठ किलोमीटर चालत जायचं . रात्री नऊ - साडेनऊ ते दहा वाजता पुन्हा आठ किलोमीटर चालत यायचं . घरी पोहोचायला साडेअकरा , कधीकधी बारा वाजायचे . पुन्हा सकाळी पावणेसहाला उठून शाळेला . नोकरीचे महिन्याला 35 रुपये आणि रात्रीचं एक वेळचं जेवण मिळायचं . जाताना एकदा आणि येताना एकदा असं दोन वेळा स्मशान लागायचं . कधीच भूत दिसलं नाही . पोटातली भूक भुतापेक्षा भयाण होती . कुठल्याही शाळेत न मिळणारा धडा , परिस्थिती शिकवत होती . हळूहळू कशाचीच भीती वाटेनाशी झाली . मरायचं नव्हतं . येणाऱ्या दुखऱ्या क्षणांना बेदरकार होऊन सामोरा जात होतो , पर्याय नव्हता . रात्रीचं एक वेळचं जेवण गिळताना भाऊ आणि आई - वडिलांची आठवण यायची . ‘ त्यांनी काही खाल्लं असेल का ?’ असा वांझोटा विचार मनात यायचा आणि भुकेच्या वावटळीत भिरकावला जायचा . अपरात्री परतत असताना रस्ता निर्म