Skip to main content

Posts

Showing posts from April, 2020

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे कर्तव्यदक्ष भूमी सीता-रघुत्तमाची रामायणे घडावी येथे पराक्रमाची शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वतांचे येथे नसो निराशा थोड्या पराभवाने पार्थास बोध केला येथेच माधवाने हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे येथेच मेळ झाला सामर्थ्य-संयमाचा येथेच जन्म झाला सिद्धार्थ गौतमाचा हे क्षेत्र पुण्यदायी भगवन् तथागताचे हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे सत्यार्थ झुंज द्यावी या जागत्या प्रथेचे येथे शिवप्रतापी नरसिंह योग्यतेचे येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे जनशासनातळीचा पायाच 'सत्य' आहे येथे सदा निनादो जयगीत जागृताचे : ग. दि. माडगूळकर 

प्रीतीविण

प्रीतीविण प्रासाद गमे शून्य जीवाला  येईल चितेचीच कळा इंद्रमहाला ! प्रीतीविण पुष्पांतिल लोपेल सुगंध  प्रीतीविण ज्योत्स्नेत पहा दाहक ज्वाला  प्रीतीस नको तक्खत नको ताजमहाल  प्रीतीस हवी प्रीती , वृथा खंत कशाला ? प्रीतीत फुले जीवन, प्रीतीत सुखाशा ,  प्रीतीविण दावानल ग्रासेल भवाला ! प्रीतीसह मागावर येईल वसंत  प्रीतीविण अन जीवन शोषेल उन्हाळा ! वक्षावर विश्रान्त तुझ्या होईल माथा  बाहुत तुझ्या रक्षक लाभेल दुशाला ! हातात सख्या , घालुनिया हात प्रवासा  ये संगती, प्रीतीवर ठेवून हवाला ! : प्रीतीविण  : विशाखा  : कुसुमाग्रज