पहाटेला आलेली ही ओळखीची सर ओले ओले करणारी फुलांत केसर...... किती दूर गेले फूल : आली डोळ्यावर भूल, एकाएकी पाकळ्यांना पडला विसर... पहातो मी पुन्हा पुन्हा कुठे दिसतील का खुणा : गवतात मावळली फुलांची कुसर..... जीव लावियेला असा घेता परत ये कसा????? पापण्यात जग झाले धुक्याने धूसर..... : ओळखीची सर :भटके पक्षी : मंगेश पाडगावकर .