हंभरून वासराले चाटती जव्हा गाय.... तव्हा मले तिच्यामंदी दिसती माझी माय.... आया-बाया सांगत व्हत्या, व्हतो जव्हा तान्हा.... दुस्काळात मायेच्या माझे आटला व्हता पान्हा.... पिठामंधी पाणी टाकून मले पाजत जाय.... तव्हा मले पिठामंदी दिसती माझी माय.... कन्या-काट्या येचायाला माय जाई राणी.... पायात नसे वहाण तिच्या फिरे अनवाणी.... काट्या-कुटयालाही तिचे मानत नसे पाय.... तव्हा मले काट्यानमंदी दिसती माझी माय.... बाप माझा रोज लावी मायेच्या माग टुमण.... बास झाल शिक्षाण आता घेउदे हाती काम.... शिकून शाण कुठ मोठा मास्तर होणार हाय.... तव्हा मले मास्तरमंदी दिसती माझी माय.... दारु पिऊन मायेले मारी जव्हा माझा बाप.... थरथर कापे आन् लागे तिले धाप.... कसायाच्या दावणीला बांधली जसी गाय.... तव्हा मले गाईमंदी दिसती माझी माय.... बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आल पाणी.... सांग म्हणे राजा तुझी कव्हा दिसलं राणी.... भरल्या डोळ्यान कव्हा पाहीन दुधावरची साय.... तव्हा मले साईमंदी दिसती माझी माय.... गो म्हणुन म्हणतो आनंदान भरावी तुझी वटी.... पुन्हा एकदा जनम घ्यावा माये तुझे पोटी.... तूझ्या चरणी ठेऊन मा