Skip to main content

Posts

Showing posts from March, 2012

क्षितिज जसे दिसते

क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी देहावरची त्वचा "आंधळी छिलून घ्यावी कोणी गाय जशी हंबरते  तसेच "व्याकुळ" व्हावे बुडता बुडता सांजप्रवाही अलगद भरूनी यावे : ग्रेस 

फूल...

फूल... हिममंद कनांचा खांब  जसे प्रतिबिम्ब  जडावे नयनी, मेघांवरचा रंग मालवून  दूर निघाले कोणी... दूर निघाले कोणी, अवघे--- ---दुःखच नेत्री जडले अंबर वरती विरले सांज-विसरल्या रात्रिंपाशी  प्रानच मदिरा प्याले... प्रानच मदिरा प्याले, नुरला-- ---दूर नदीचा पुल  भूलच सगळी भूल धुलिंत हरवला चन्द्र कुणाचा  धुलच झाली फूल... -ग्रेस 

कधी पांघरावे मीही

कधी पांघरावे मीही  माझा रक्ताचे प्रपात, गूढ़ घावांचे किनारे  मीच तोडावे वेगात.. असा आंधळा आवेग मीच टाळावी बंधने , विश्वनिर्मितीचा रात्री मला छेदावे श्रद्धेने . अशा लाघवी क्षणांना  माझा अहंतेचे टोक. शब्द फुटण्याचा आधी ऊर दुभंगते हांक......... -ग्रेस

पीठ गळे जात्यातून

पीठ गळे जात्यातून  तसं पाणी डोळ्यांतून आई करपले हात  तुझे भाकरी भाजून..... शिळ्या भाकरीचा उभा  माझ्या संसाराचा जीव  तुझ्या ओवीच्या शब्दानं मला केलं चिरंजीव..... पानझड : ना . धों. महानोर 

सूर्यनारायणा नित नेमाने उगवा

सूर्यनारायणा नित नेमाने उगवा  अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा  मोडक्या घराच्या ब्रीन्दावनाशी सांजेला  दिव्याचा आधार जडो त्यांच्या संसाराला  ओंजळीन भरू देगा पाखरांच्या चोची  दुःखात पंखाना असो सावली मायेची  आबादानी होवो शेत भरू दे दाण्यांचे  तुझ्या पालखीला शब्द बांधू तुकोबाचे    : पानझड  : ना. धों. महानोर .

माझेच मला झाले काही न कळेनासे.....

एकेक ऋतू जाई लावून तुला मेंदी  एकेक फुलाचा हा शृंगार तुझ्यासाठी  दारात जरी आला आषाढ तुझा ओला  गाता न मला आला मल्हार तुझ्यासाठी..... माझेच मला झाले काही न कळेनासे..... घेतात कशी गीते आकार तुझ्यासाठी...... : सुरेश भट