गुलाबी थंडीचे दिवस . हळुवार स्वप्नांचे दिवस. आयुष्य थांबून राहिल्याचा गोड भास... श्वासांचे प्रबंध करण्याचे वय.. रेशीम धाग्यांनी गुंफलेलं अलवार नातं .... ऋतूंचे सोहळे साजरे करतानाच हळव्या पानगळीत हरवलेलं मन - सैरभैर ... संपलेपणाची बोच - स्वप्नांच निर्माल्य , एक एक शुष्क पान जीवापाड जपण... मनाच्या चोरकप्यात ! कुठल्यातरी एकांत अन हव्याहव्याशा उदास क्षणी हा मनोहारी चोरकप्पा अलगद उलघडायचा - एक चाळा म्हणून कि , पुनः प्रत्ययाचा आनंद म्हणून काहीच आकळत नाही . ...... ऋतूचक्राबरोबर पुन्हा फिरून येणारया बहरासाठी पानापानांनी गळून जायचं ... आपल्याच दिमाखात .....बहराच्या स्वागतासाठी कि एक अटळ सत्य म्हणून ??? मनाची बेचैनी अधिकच वाढते ....सायंकाळी लांबच लांब पंगत जाणाऱ्या सावल्यांची मनभर धास्ती वाटून राहते उगाचच...... पानगळीच्या या हळव्या क्षणी आपण सोबत असावं आधीचाच जीव टांगणीला लागलेला....अनामिक पानगळीन जीव गलबलून जातो ... मनभर आठवणींच काहूर दाटताना फांदी फांदी डोळ्यादेखत निष्पर्ण होते ..... ......दुःख पानगळीच नसतंच मुळी . पानगळीचे संदर्भ असतात तुटलेल्या स्वप्नांशी , पानगळीच्या ऋतूत एक-एक पान ग