Skip to main content

Posts

Showing posts from February, 2016

पाणीच पाणी

तृप्त पाणी तुष्ट पाणी कोंडलेले रुष्ट पाणी वाकडे नाल्यानद्यांचे वेगवेडे पुष्ट पाणी बावडीचे खोल काळे पारदर्शी मग्न पाणी कोकरुसे नाचणारे खेळणारे नग्न पाणी उंच काळ्या फत्तरींचे पांढरे फेसाळ पाणी सागराच्या मस्तकीचे आंधळे विक्राळ पाणी पावली घोटाळणारे लाडके तांबूस पाणी साळीच्या काट्यांप्रमाणे टोचरे पाऊस पाणी पाणीयाच्या उत्सवी या मातले पाणीच पाणी आणि त्यांच्या प्रत्ययाने मीही पाणी मीही पाणी :  बोरकर

संस्कृती

अखेरत:  संस्कृती म्हणजे माझ्या मनाचं सामर्थ्य जे अपार आहे त्याला किनारा घालण्याचं. विश्वात्मक ईश्वरतेला मंदिराचा... मूर्तीचा... मृत्यूच्या अतीर सागराला मोक्षाचा... भक्तीचा... प्रेमाच्या मुक्त उर्मीला नात्याचा... सक्तीचा... ही संस्कृती मला तारते आहे मारतेही आहे. :  कुसुमाग्रज

येणं जाणं

आल्या आल्या म्हणतेस, आता पुन्हा कधी जाणार नाही, जाता जाता म्हणतेस, आता पुन्हा कधी येणार नाही.       येणं जाणं कुणास ठाऊक       घडेल कसं       वार्‍यावरती तरंगणारी       सारीच पिसं नसतानाही भरपूर असतेस एव्हढंच तुला कळणार नाही :  कुसुमाग्रज

खेळ

आणि लक्षात ठेव हा एक खेळ आहे खेळाच्याच नियमांनी बांधलेला निर्मळ बिलोरी आनंदात सांधलेला आघात करायचा पण रक्‍त काढायचं नाही जीव ओतायचा पण जीवन हरपायचं नाही विसर्जित व्हायचं पण स्वत्व गमवायचं नाही आणि आपल्या अंतरंगातील पंच तटस्थ समयसूज्ञ साक्षी थांबा म्हणतील त्या क्षणी थांबायचं आणि जवळ जमलेले -- चंद्राचे तुकडे घेउन -- आपापल्या अंधारात विलीन व्हायचं :  कुसुमाग्रज

निवास

खुप खुप वर्षांपूर्वी आकाशाशी माझा करार झाला आणि आकाशगंगेतील ती छोटी तारका, निळ्या पारव्या प्रकाशाचा, पिसारा फुलवणारी, माझ्या मालकीची झाली तेव्हापासून पृथ्वीवर जेव्हा ज्वालामुखीच्या उद्रेकांनी उसालेली उद्यानं दग्ध होतात किंवा कोकीळांची कूजनं बाकीच्या प्रपातात, गोठून पडतात, तेव्हा माझा निवास त्या तारकेवर असतो, व्यवहारापुरत मी येथे वावरत असलो तरी :  कुसुमाग्रज 

चार होत्या पक्षिणी त्या

चार होत्या पक्षिणी त्या रात्र होती वादळी चार स्वप्ने बांधणारी एक होती साखळी दोन होत्या त्यात हंसी राजहंसी एक ती आणि एकीला कळेना जात माझी कोणती शुभ्र पंखांतून त्यांच्या वीज होती साठली ना कळे एकीस की माझी लियाकत कोठली तोडुनी आंधी तुफाने चालल्या ती चालली तीन होत्या दीपमाळा एक होती सावली तोच आला तीर कोठुन जायबंदी हो गळा सावलीला जाण आली जात माझी कोकिळा कोकिळेने काय केले? गीत झाडांना दिले आणि मातीचे नभाशी एक नाते सांधले  मी सुरांच्या अत्तराने रात्र सारी शिंपिली साधनेवर वेदनेवर रागदारी ओतली  ती म्हणाली, एकटी मी राहिले तर राहिले  या स्वरांचे सूर्य झाले, त्यात सारे पावले  (वीज म्हणाली धरतीला) :  कुसुमाग्रज

एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात

एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात धरेवरी अवघ्या फिरलो , निळ्या अंतराळी शिरलो कधी उन्हामध्ये न्हालो , कधी चांदण्यात वने , माळराने , राई , ठायी , ठायी केले स्नेही तुझ्याविना नव्हते कोणी , आत अंतरात फुलारून पंखे कोणी , तुझ्यापुढे नाचे रानी तुझ्या मनगटी बसले कुणी भाग्यवंत मुका बावरा , मी भोळा पडेन का तुझिया डोळा ? मलिनपणे कैसा येऊ , तुझ्या मंदिरात गीत - ग . दि . माडगूळकर

ऐ उम्र !

मी एका मित्राला नेहमी सांगायचो , अजून ही सांगतो , भेटत जा रे सगळ्यांना , भले तो मित्र / नातेवाईक वाईट असो चांगला असो ! " हृदय सर्वांचं एका सारखच असतं , बुद्धीशी ' कनेक्ट ' झालं की ' लोचा ' होतो !" ( सदर कवितेच्या शेवटच्या कडव्याचा संदर्भ ...) ऐ उम्र ! कुछ कहा मैंने , पर शायद तूने सुना नहीँ .. तू छीन सकती है बचपन मेरा , पर बचपना नहीं ..!! हर बात का कोई जवाब नही होता हर इश्क का नाम खराब नही होता ... यु तो झूम लेते है नशेमें पीनेवाले मगर हर नशे का नाम शराब नही होता ... खामोश चेहरे पर हजारों पहरे होते है हंसती आखों में भी जख्म गहरे होते है जिनसे अक्सर रुठ जाते है हम , असल में उनसे ही रिश्ते गहरे होते है .. किसी ने खुदासे दुआ मांगी दुआ में अपनी मौत मांगी , खुदा ने कहा , मौत तो तुझे दे दु मगर , उसे क्या कहु जिसने तेरी जिंदगी की दुअा मांगी ... हर इंन्सान का दिल बुरा नही होता हर एक इन्सान बुरा नही

येते भरून आभाळ

येते भरून आभाळ  वारा नाचतो पानांत , वाऱ्यासंगत झुलते  मालावारली दौलत ; निळ्या पिसांची कि रास  झाले दूरचे डोंगर , पिकलेल्या केळ्यांचे की  कुठे उन्हाचे लोंगर ; पाहून हे नाचणारे  आज कुठे मोरपण ? पाहून हे जावे भान  असे कुठे ते उन्मन ? : येते भरून आभाळ  : बाहुल्या  : इंदिरा संत 

देखा हुआ सा कुछ है तो सोचा हुआ सा कुछ

देखा हुआ सा कुछ है तो सोचा हुआ सा कुछ हर वक़्त मेरे साथ है उलझा हुआ सा कुछ होता है यूँ भी , रास्ता खुलता नहीं कहीं जंगल - सा फैल जाता है खोया हुआ सा कुछ साहिल की गीली रेत पर बच्चों के खेल - सा हर लम्हा मुझ में बनता बिखरता हुआ सा कुछ फ़ुर्सत ने आज घर को सजाया कुछ इस तरह हर शय से मुस्कुराता है रोता हुआ सा कुछ धुँधली - सी एक याद किसी क़ब्र का दिया और ! मेरे आस - पास चमकता हुआ सा कुछ : निदा फाज़ली

दृष्ट

मोठे मोठे तुझे डोळे  त्यांत मावते आभाळ  पापणीच्या काठावरी  उन्हांपावसाचा खेळ  तुझ्या मोठाल्या डोळ्यात  अमा-पौर्णिमेचा मेळ , आणि तुझ्या दिठींमध्ये  पर्वकाळाची झळाळं  मोठ्या डोळ्यांच्या हरिणी  दृष्ट कोणाची लागली ? चंद्रसूर्य तोलणारी  पापणी का भारावली ? भाळी उतरे पाउस, गालावरी आली उन्हें  उमलत्या ओठावरी  ओले हासरे चांदणे  मोठ्या डोळ्यांच्या हरिणी  दृष्ट कोना गं लागली ? अवसेची काळी वीज  कुण्या वृक्षाने झेलली ? : दृष्ट  : बाहुल्या  : इंदिरा संत 

दोन कणिका

तुझ्या नेत्रामध्ये  आवसेची रात्र  पापण्याच्या आत  गहिरली  दिव्यावीन तीत  भ्रमलो भ्रमलो  अखेरीस आलो  पाण्यापाशी .  ……….  आंब्यावरचे कोकीळ गाणे  पहाट शेजेवर अवतरले  बर्फावरती वसंत पेरीत  मनात फिरले .  देहामधल्या तिठ्यातिठ्यावर  चंद्रदिव्यांचे पेटवूनी सर  पंखावर अरुणोदय झेलीत  पुनश्च फांदीवर आंब्याच्या  जाऊनी बसले  : दोन कणिका  : छंदोमयी  : कुसुमाग्रज 

तेव्हाही

जेव्हा मी नसेन  तेव्हाही असेन  तुझ्या पापणीच्या आत  अवघडलेल्या  एका थेंबांमध्ये, आणि आजच्यासारखाच  तेव्हाही हसेन  आणि म्हणेन , अजूनही मी  अवघडच .  : तेव्हाही  : छंदोमयी  : कुसुमाग्रज 

मेणा

चारसहा कोकिळा  पहाटवेळी गातात  किनखापी स्वरांचा  एक मेणा बांधतात  मरणाच्या वेशीवर  उनाडनाऱ्या मला  मेनामध्यॆ घालून  पृथ्वीवर आणतात  : मेणा  : छंदोमयी  : कुसुमाग्रज 

आनंदलोक

माझ्या आनंदलोकात  चंद्र मावळत नाही  दर्या अथांग प्रेमाचा  कधी वादळात नाही  माझ्या आनंदलोकात  केले वसंताचे घर  आंब्याआंब्याच्या फांदीला  फुटे कोकिळेचा स्वर  सात रंगांची मैफल  वाहे इथे हवेतून  येथे मरणही नाचे  मोर पिसारा होऊन  : "आनंद" नाटकातून  : छंदोमयी  : कुसुमाग्रज 

पळस

मेघांच्या पळसाचा  अस्तावर जाळ  अस्ताच्या कंठात  माणकांची माळ  माणकांच्या माळेला  केशराचे पाणी  केशराच्या पाण्यात  बालकवींची गाणी  बालकवींच्या गाण्यात  एक उदास पक्षी  पक्षांच्या पंखांवर  श्रावणाची नक्षी  श्रावणाच्या नक्षीत  देवळाचे कळस  कळसावर पुन्हा  मेघांचे पळस  : पळस  : छंदोमयी  : कुसुमाग्रज 
disawar satta king